Fitness

अॅपल सायडर व्हिनेगरचे उपयोग वाचून व्हाल थक्क (Apple Cider Vinegar Benefits In Marathi)

Leenal Gawade  |  Aug 21, 2020
अॅपल सायडर व्हिनेगरचे उपयोग वाचून व्हाल थक्क (Apple Cider Vinegar Benefits In Marathi)

अॅपल सायडर व्हिनेगर अगदी फार पूर्वीपासून वापरले जाते. आरोग्याच्या अनेक तक्रारी दूर करण्यासाठी अॅपल सायडर व्हिनेगर चांगले असते असे सांगितले जाते. अनेक जुन्या दाखल्यांमध्ये काही खास आजारांसाठी अॅपल सायडर व्हिनेगरचा उपयोग केला जाण्याच्या नोंदी आहेत. त्यामुळे अगदी आजही अनेक गोष्टींसाठी अॅपल सायडर व्हिनेगर (Apple Cider Vinegar) चा वापर केला जातो. अगदी एक चमचाभर अॅपल सायडर व्हिनेगर कमालीचे काम करते. जर तुम्हाला व्हिनेगरची चव माहीत असेल तर ती फारच आबंट अशी असते. तर अॅपल सायडर व्हिनेगरची चव देखील आबंट असून त्याला सफरचंदाचा थोडासा वास येतो. आता जाणून घेऊया हे व्हिनेगर नेमके कसे तयार केले जाते आणि या व्हिनेगर चे उपयोग… चला तर करुया सुरुवात 

अॅपल सायडर व्हिनेगर म्हणजे काय? (What Is Apple Cider Vinegar In Marathi)

Instagram

सध्या जगभरात अॅपल सायडरला व्हिनेगरला खूप मागणी आहे. त्यामुळे अगदी सहज उपलब्ध होणारा असा हा घटक आहे. व्हिनेगरमध्ये तुम्हाला वेगवेगळे प्रकार मिळतात. त्यापैकी अत्यंत फायदेशीर असा प्रकार म्हणजे अॅपल सायडर व्हिनेगर. सफरचंदापासून जो रस काढला जातो. त्या रसाला आंबण्याची एक वेगळी प्रक्रिया केली जाते. हा रस आंबला की, मग त्याचा अॅसिडीक असा वास येऊ लागतो. हा रस आंबण्यासाठी आणि त्याचे व्हिनेगरमध्ये रुपात बदलण्यासाठी थोडा वेळ लागतो. तयार झालेले व्हिनेगर अनेक पाश्चात्य देशांमध्ये जेवणासाठी वापरले जाते. आपल्या येथेही काही पदार्थांमध्ये व्हिनेगर घालण्याची पद्धत आहे. अॅपल सायडर व्हिनेगरमध्ये सोडियम, लोह असे घटक असतात.

गर्भाचे वजन वाढण्यासाठी पोषक आहार (Food To Increase Fetal Weight During Pregnancy)

आता जाणून घेऊया व्हिनेगर चे उपयोग (Apple Cider Vinegar Benefits In Marathi)

Instagram

व्हिनेगरचे आरोग्याशी निगडीत अनेक फायदे आहेत. जाणून घेऊया असेच काही व्हिनेगर चे उपयोग

पोटाचा घेर करते कमी (Reduces Belly Fat)

पोटाचा घेर वाढला असेल आणि तो कमी करण्याची इच्छा असेल तर तुमच्यासाठी अॅपल सायडर व्हिनेगर वरदान आहे. जर तुम्ही जीम करत नसाल किंवा व्यायामाशी तुमचा काहीही संबंध नसेल तरी देखील थोडी मेहनत आणि अॅपल सायडर व्हिनेगरच्या सेवनामुळे तुमच्या पोटाचा घेर कमी होतो. एका ग्लासात एक चमचा अॅपल सायडर व्हिनेगर घ्या. रिकाम्या पोटी त्याचे सेवन करा. तुमच्या ओटीपोट आणि पोटावरली चरबी विरघळवण्यासाठी अॅपल सायडर व्हिनेगर मदत करते. पोटच नाही तर तुमचे अतिरिक्त वजन कमी करण्यासाठीही अॅपल सायडर व्हिनेगर मदत करते. 

कॅन्सरला ठेवते दूर (Slows Down The Growth Of Cancer Cells)

अनेक शास्त्रज्ञांनी केलेल्या अभ्यासानुसार अनेक आजारांसाठी अॅपल सायडर व्हिनेगर हे फारच फायदेशीर आहे. कॅन्सरच्या जंतूचा नायनाट करण्याचे काम अॅपल सायडर व्हिनेगर करते. कॅन्सरशी निगडीत कोणतेही घटक शरीरात तयार करण्यास अॅपल सायडर व्हिनेगर मज्जाव करते त्यामुळेच तुम्ही याचे रोज योग्यपद्धतीने सेवन केले तर ते तुमच्यासाठी फायदेशीर ठरु शकते. फक्त तुम्ही योग्य सल्ला घेऊन याचे सेवन करावे म्हणजे तुम्हाला त्याचा फायदा होईल.

जाणून घ्या केसतोडवर घरगुती उपाय (Home Remedies For Hair Follicle Boils In Marathi)

पचनशक्ती सुधारते (Improved Digestion)

Instagram

अॅपल सायडर व्हिनेगरसंदर्भात अनेक समज-गैरसमज असल तरी देखील तुमच्या पोटासाठी आणि पोटाच्या विकारांसाठी अॅपल सायडर व्हिनेगर चांगले असते. तुम्हाला जर बद्धकोष्ठता असेल तर तुम्हाला पोट साफ करण्यासाठी अॅपल सायडर व्हिनेगर एकदम चांगला पर्याय आहे. बद्धकोष्ठता किंवा अपचनासाठी तुम्ही जर अॅपल सायडर व्हिनेगर घेणार असाल तर एक ग्लास पाण्यात एक चमचा अॅपल सायडर व्हिनेगर, त्यात एक चमचा मध घाला. या पाण्याचे सेवन केल्यानंतर तुम्हाला याचा फरक नक्की जाणवेल. पोट साफ होण्यासोबत तुमची भूक नियंत्रित करुन तुमचे मेटाबॉलिजम वाढवण्यासाठी तुम्ही याचे सेवन करु शकता. जेवण्याच्या आधी जर तुम्ही हे घेतले तर तुमचे वजन कमी होण्यासही मदत होईल. 

निरोगी ह्रदय (Healthy Heart)

आपल्या शरीरामध्ये चांगले आणि वाईट असे दोन कोलेस्ट्रॉल असतात. अर्थात शरीरात वाईट कोलेस्ट्रॉल वाढले की, मग अनेक त्रास होण्यास सुरुवात होते. उच्च रक्तदाब, ह्रदयरोग होण्याची शक्यता असते. जर तुम्हाला हा त्रास नको असेल तर अशावेळीही अॅपल सायडर व्हिनेगर अगदी सरस ठरते. तुम्ही त्याच्या नित्य सेवनामुळे शरीरातीन वाईट कोलेस्ट्रॉल शरीराबाहेर टाकू शकता. त्यामुळे निरोगी ह्रदयासाठी अॅपल सायडर व्हिनेगरचा उपयोग जरुर करा. ‘

मधुमेहींसाठी फायदेशीर (Beneficial In Diabetes)

मधुमेहींसाठीही अॅपल सायडर व्हिनेगर फारच फायदेशीर असते. रक्तातील इन्सुलिनचे प्रमाण योग्य ठेवण्याचे काम अॅपल सायडर व्हिनेगर असे म्हटले जाते. पण याबद्दलही अनेकांचे दुमत आहे. फार कमी प्रमाणात यावर संशोधन करण्यात आले आहे. त्यामुळे डॉक्टरांशी यासंदर्भात सल्ला घेतल्याशिवाय तुम्ही याचे सेवन करु नका. 

जंतूंचा करते नायनाट (Kills Germs)

Instagram

अनेक ठिकाणी खाद्यपदार्थांमध्येही अॅपल सायडर व्हिनेगर वापरले जाते. आरोग्यासाठी जशी हेल्दी बॅक्टेरीयाची गरज असते. तशाच काही बॅक्टेरीयाची अजिबात गरज नसते. सलाद किंवा अशा काही पदार्थांवर अॅपल सायडर व्हिनेगर घातले जाते. त्यामुळे जंतूचा नायनाट करण्यास मदत मिळते.

त्वचेला डिटॉक्स करते (Detoxes The Skin)

पोट साफ असेल तर तुमच्या अनेक व्याधी आपोआपच कमी होतात. त्वचेवर येणारे पुरळ अनेकदा पोट साफ नसेल तर त्वचेवर पिंपल्स येतात. तुमचे शरीर आतून स्वच्छ झाल्यामुळे तुमच्या त्वचेलाही चमक येते. इतकेच नाही. त्वचेवर अॅपल सायडर व्हिनेगरचा वापरही केला जातो. अॅपल सायडर व्हिनेगर थेट चेहऱ्याला कधीही लावू नका. चेहऱ्याची त्वचा खूप नाजूक असते. जर याचा वापर थेट त्वचेवर केला तर त्वचा जळू शकते. त्यामुळे अॅपल सायडर व्हिनेगर घेऊन त्यात पाणी घाला आणि कापसाच्या साहाय्याने चेहऱ्यावर लावा. तुमच्या त्वचेवर असलेले मोठे पोअर्स त्यामुळे कमी होतील. शिवाय त्वचा डिटॉक्स करायलाही अॅपल सायडर व्हिनेगर मदत करेल.

गर्भधारणा कशी टाळावी, उपाय आणि माहिती (How To Avoid Pregnancy In Marathi)

केसांसाठी अॅपल सायडर व्हिनेगर (Apple Cider Vinegar For Hair)

सुंदर, काळेभोर केस तुम्हाला हवे असतील तर अॅपल सायडर व्हिनेगरचा वापर करायला हवा. केसांचा रंग टिकवून त्यांना स्वच्छ ठेवण्याचे काम अॅपल सायडर व्हिनेगर करते. केसांवर अॅपल सायडर व्हिनेगरचा उपयोग करताना तुम्हाला त्यातही थोडे पाणी घालायचे आहे. केसांवर ते लावायचे आहे. त्यानंतर तुम्ही शॅम्पू करुन तुमचे केस मग स्वच्छ धुवू शकता. केस वाळल्यानंतर तुम्हाला केस अधिक काळेभोर आणि सुंदर दिसतील. यात काही शंका नाही.

केसांचा कोंडा करते कमी (Reduces Dandruff)

Instagram

केसांमध्ये कोंड्याचा त्रास असेल तर तुम्ही अॅपल सायडर व्हिनेगरचा उपयोग करु शकता. अनेकदा कोंड्याचा त्रास हा तेलकट स्काल्पमुळे होतो. स्काल्प तेलकट असेल तर मग अगदी हमखास त्याचा वापर करा. स्काल्पला अॅपल सायडर व्हिनेगर लावा. स्काल्पमधील तेलकटपणा कमी करण्यासाठी याचा उपयोग होतो. तेलकटपणा कमी झाला की, आपोआपच तुमच्या कोंड्याचा त्रास कमी होतो.

त्वचेसाठी अॅपल सायडर व्हिनेगर (Apple Cider Vinegar For Skin)

त्वचा चिर-तरुण राहण्यासाठीही अॅपल सायडर व्हिनेगर फायदेशीर असते. चेहऱ्यावरील सुरकुत्या, डाग, ओपन पोअर्स कमी करुन तुमची त्वचा अधिक सुंदर करण्याचे काम अॅपल सायडर व्हिनेगर करते. तुमच्या त्वचेच्या समस्या कमी झाल्या की, साहजिकच तुमची त्वचा चिर-तरुण दिसू लागते. 

असाही करु शकता अॅपल सायडर व्हिनेगर चा उपयोग (Apple Cider Vinegar Uses In Marathi)

Instagram

अॅपल सायडर व्हिनेगरचे या व्यतिरिक्तही अनेक उपयोग आहेत ते देखील आता जाणून घेऊया 

तुम्हाला पडलेत का प्रश्न (FAQ’s)

1. अॅपल सायडर व्हिनेगर रोज घेऊ शकतो का ? 

अॅपल सायडर व्हिनेगर आपण रोज घेऊ शकतो. पण दिवसातून फक्त एकदा. वजन पटापट कमी करण्यासाठी तुम्हाला त्याचे सतत सेवन करणे योग्य वाटत असेल तर तुम्ही चुकत आहात. अॅपल सायडर घेण्याचीही एक पद्धत आहे. एक ग्लास पाण्यात अगदी एक चमचा अॅपल सायडर व्हिनेगर घेऊन अशा पाण्याचे सेवन करा. तुम्हाला त्याचा त्रास होणार नाही. उपाशी पोटी किंवा जेवणाआधी ते घेतल्यास फारच उत्तम 

2. अॅपल सायडर व्हिनेगर पिण्याची योग्य वेळ कोणती ? 

शक्यतो सकाळी उठल्यानंतर उपाशीपोटी अॅपल सायडर व्हिनेगरचा सल्ला दिला जातो. रिकामी पोटी ते तुमच्या शरीरावर योग्य काम करते. जर तुम्हाला उपाशीपोटी शक्य नसेल तर तुम्ही जेवणाआधी त्याचे सेवन केले तरी चालू शकते. 

3. अॅपल सायडर व्हिनेगरचे सेवन किडनीसाठी खराब असते का ? 

किडनीसंदर्भात तुम्हाला काही त्रास असतील तर तुम्ही अॅपल सायडर व्हिनेगरचे सेवन अजिबात करु नका. कारण व्हिनेगरमध्ये असलेले अॅसिड तुमच्या किडन्यांसोबत जुळवून घेऊ शकत नाही. त्यामुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो. आता अॅपल सायडर व्हिनेगरचा उपयोग करताना या सगळ्या गोष्टींचा विचार करा आणि मगच त्याचा वापर करा. 

Read More From Fitness