Fitness

तुम्हाला हिवाळ्यात दही खायला आवडतं का, मग हे नक्की वाचा

Harshada Shirsekar  |  Dec 5, 2019
तुम्हाला हिवाळ्यात दही खायला आवडतं का, मग हे नक्की वाचा

थंडीचे दिवस सुरू झाले आहेत, या ऋतुमध्ये ठिकठिकाणी स्वादिष्ट अन्नपदार्थांची चव चाखायला मिळते. पण हिवाळ्यात चमचमीत पदार्थ खाण्यासोबत स्वतःच्या आरोग्याचीही तितकीच काळजी घेणं आवश्यक आहे. काही ठराविक अन्नपदार्थांचं सेवन उन्हाळ्यात करणं शरीरासाठी फायदेशीर ठरते. पण हिवाळ्यात त्याच पदार्थांचा समावेश तुम्ही आहारात करत असाल तर आरोग्याच्या बाबतीत सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता आहे. या खाद्यपदार्थांपैकी लोकांच्या अधिक पसंतीचं असते ते म्हणजे दही.

दहीमुळे थंडीचा अधिक होतो त्रास

साधारणतः असं म्हटलं जातं जातं की सर्दी-खोकल्याचा त्रास न होण्यासाठी थंडीमध्ये दही खाणं टाळलं पाहिजे. कारण यामुळे थंडीचा त्रास अधिक होतो. पण ही गोष्ट सत्य आहे का? थंडीच्या दिवसात दही का खाऊ नये आणि खाल्ल्यास नेमकं काय होतं? दहीमध्ये व्हिटॅमिन, प्रोटीन, मॅग्नेशिअम, कॅल्शिअम आणि पोटॅशिअमचं भरपूर प्रमाण असतं. एवढी पोषकतत्त्वे असताना हिवाळ्यात दही वर्ज्य का करावं, असा प्रश्न अनेक जण विचारतात. 

(वाचा : ‘ओम’कार साधनेचे 11 आरोग्यदायी फायदे, गंभीर आजारातून होईल मुक्तता)

दहीसंदर्भात आयुर्वेदात म्हटलंय…

आयुर्वेदनुसार थंडीच्या दिवसात आहारात दहीचा समावेश करू नये कारण शरीरातील ग्रंथींमधून स्त्राव वाढतो. परिणाम कफचा त्रास वाढू लागतो. दह्याच्या सेवनामुळे दमा, सायनस किंवा सर्दी-खोकल्याचा त्रास गंभीर होऊ शकतो. यामुळे आयुर्वेदात हिवाळ्यात विशेषतः रात्री दही न खाण्याचा सल्ला दिला गेला आहे.   

दहीबाबत विज्ञान काय सांगते? 

दह्यामध्ये शरीरास विशेषतः आतड्यांसाठी पोषक असे निरोगी जिवाणू (Healthy Bacteria) असतात. दह्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. दह्यामध्ये कॅल्शिअम, व्हिटॅमिन बी 12 आणि फॉस्फरसचे प्रमाण भरपूर असतं. त्यामुळे थंडीच्या दिवसात दह्याचं सेवन करणं शरीरासाठी फायदेशीर ठरतं. पण ज्यांना श्वसनाचे आजार आहेत त्यांनी संध्याकाळनंतर दही अजिबात खाऊ नये,  यामुळे कफचा त्रास होतो. 

(वाचा : ‘वर्क फ्रॉम होम’ करत आहात, या गोष्टींकडे करू नका दुर्लक्ष)

फ्रीजमध्ये दही ठेव नये 

अॅलर्जी आणि दम्याचा त्रास असणाऱ्यांनी शक्यतो दही खाणं टाळावं. दह्यामुळे त्यांना जास्त त्रास होण्याची शक्यता आहे.  दरम्यान, थंडीमध्ये घरात दही तयार केल्यानंतर फ्रीजमध्ये ठेवू नये. सामान्य तापमानातच दही ठेवून त्याचं सेवन करावं.

जास्त प्रमाणात दही खाऊ नये

थंडीमध्ये दह्याचं सेवन करू नये, असं डॉक्टर सांगत नाही. पण तुम्हाला भीती वाटत असल्यास दही खाण्यापूर्वी त्यांचा सल्ला नक्की घ्यावा. आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ नयेत, यासाठी आपण स्वतःची काळजी घेणे आवश्यक आहे. थंडीच्या दिवसात अधिक प्रमाणात दह्याचं सेवन करू नका. विशेषतः ताप, सर्दी-खोकल्याचा त्रास असेल तर दही अजिबात खाऊ नये. 

(वाचा : गाढ झोप हवी आहे का, रात्री ‘या’ 5 अन्नपदार्थांचं करा सेवन)

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop’s मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.

Read More From Fitness