केसांना आपण नेहमी हेल्दी आणि सुंदर बनवण्यासाठी काळजी घेत असतो. केसांच्या बाबतीत आपल्याला थोडीशी चूकही महागात पडू शकते. तुमच्या केसांना कोरडं करणं, त्यामध्ये कोंडा निर्माण होणं, केस डॅमेज होणं, केसगळती अशा अनेक समस्या आपल्याला केसांच्या बाबतीत होत असतात. तुम्ही केसांची काळजी व्यवस्थित घेत असाल तरीही यापैकी कोणत्याही समस्या तुम्हाला होत असतील तर तुम्ही नक्की काळजी घेण्यात काहीतरी चूक करत आहात हे नक्की. सर्वात महत्त्वाची काळजी घ्यायला हवी ते म्हणजे केस धुतल्यानंतर अर्थात ओल्या केसांवर तुम्ही कोणत्याही प्रकारचं स्टायलिंग करणं अथवा स्टायलिंग आयरन करणं टाळायला हवं. त्याची नक्की काय कारणं आहेत ते तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. यामुळे तुमचे केस अधिक प्रमाणात खराब होतात. जाणून घेऊयात नक्की काय आहेत कारणं –
ओल्या केसांंवर नका करू स्टायलिंग
Shutterstock
ओले केस हे अतिशय कमकुवत असतात. जेव्हा तुम्ही त्यावर आयरन करून स्टाईलिंग करता तेव्हा त्याची हिट तुमच्या केसांना अधिक कमकुवत बनवते. त्यामुळे हिट स्टायलिंग करण्यापूर्वी तुमचे केस व्यवस्थित सुकणं गरजेचं आहे. त्याशिवाय केस आयरन करण्यापूर्वी तुम्हाला विंचरून घेण्याचीही आवश्यकता असते. पण तुम्ही ओल्या केसांमध्ये फणी फिरवल्यास, केस दुहेरी आणि अधिक कमकुवत होतात. ज्यामुळे केसगळतीचं प्रमाणही वाढतं.
केसांना तूप लावल्याने होतात ‘अफलातून’ फायदे
केस जास्त धुवू नका
Shutterstock
तुम्हाला तुमचे केस अधिक कोरडे आणि फ्रिजी नको असतील आणि केसांंमध्ये नैसर्गिक तेल टिकून राहायला हवं असेल तर तुम्ही केस जास्त धुवू नका. कारण असं केल्याने केस अधिक प्रमाणात डॅमेज होतात. केस आठवड्यातून किमान तीन वेळा तरी धुवायला हवेत. जर केस जास्तच प्रमाणात तुम्हाला ग्रिसी वाटत असतील तर तुम्ही ड्राय शँपूचा वापर करू शकता. ड्राय शँपू वापरून मात्र तुम्ही आयरन करू नका. नाहीतर केस तुटायला लागतात.
केसांवर आयरनची हिट टाळण्याचा करा प्रयत्न
Shutterstock
आजकाल अनेक हीट स्टायलिंग टूल्स बाजारामध्ये आले आहेत. पण सतत याचा वापर करणं तुमच्या केसांसाठी हानिकारक ठरू शकतं. तुम्ही वेगवेगळ्या आऊटफिट्सवर वेगवेगळे हेअरस्टाईल्स करण्यासाठी याचा वापर करता. पण त्याची सवय करून घेऊ नका. केसांना ड्राय करण्यासाठीही तुम्ही ड्रायरचा वापर करत असल्यास, कूल अथवा मीडियम सेटिंग ठेवा. जेणेकरून तुमच्या केसांना हानी पोहचणार नाही.
केसांना करा कलर आणि हायलाईट घरी
केसांना करकचून बांंधू नका
Shutterstock
बऱ्याच जणींना केस करकचून बांधून ठेवण्याची सवय असते. पण तुम्हाला याची जाणीव आहे का? केस करकचून बांधल्याने केसगळतीची समस्या उभी राहाते. केसांमध्ये किमान थोडीतरी हवा जायला हवी इतकी जागा तुम्ही ठेवायला हवी. त्याचप्रमाणे तुम्ही केसांची पार्टिंगदेखील बदलत राहायला हवी. एकच पार्टिंग ठेवल्यास, तुम्हाला बाल्ड स्पॉट होतो आणि मग ते दिसायलादेखील खराब दिसतं. त्याचप्रमाणे तुम्ही सतत अशावेळी आयरनचा वापर करत राहिलात तर हा स्पॉट अधिक वाढत जातो. कारण तिथल्या केसांना व्यवस्थित पोषण मिळत नाही. तर सतत आयरनचा वापर केल्याने हिट अधिक प्रमाणात त्या जागेला मिळून तिथले केस अधिक प्रमाणात गळायला लागतात. त्यामुळे या गोष्टीची अधिक प्रमाणात काळजी घेणं गरजेचं आहे.
घरगुती उपायांनी मिळवा सुंदर केस
चुकीच्या कंगव्याचा करू नका वापर
Shutterstock
चुकीचा कंगवा वापरल्यास, तुम्हाला केसगळती होणं हे नक्कीच आहे. तसंच केस आयरन करत असतानाही आपल्याला कंगव्याचा उपयोग करावा लागतो. मग अशावेळी केस सतत विंचरले जातात आणि ते तुटण्याची शक्यताही अधिक प्रमाणात निर्माण होते. त्यात जर तुम्ही तुमच्या केसांना साजेसा कंगवा वापरला नाही तर त्याचे अधिक दुष्परिणाम होत केसगळतीही होते. त्यामुळे आयरन करताना या गोष्टीचीही काळजी घ्यायला हवी.
खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop’s मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत.
मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.