Ayurveda

त्वचा कायम टवटवीत राहण्यासाठी फॉलो करा ‘या’ आयुर्वेदिक टिप्स

Trupti Paradkar  |  Jul 4, 2022
ayurvedic tips to get younger and glowing skin in Marathi

तरूण मुलींची त्वचा टवटवीत आणि चमकदार दिसते. मात्र जस जसं वय वाढत जातं तस तसा त्वचेवर परिणाम होऊ लागतो. त्वचा सैल पडल्यामुळे सुरकुत्या, फाईन लाईन्स दिसू लागतात. महिलांना चेहऱ्यावर दिसणारे एजिंग मार्क्स नको असतात. पण त्यासाठी तुम्हाला त्वचेची योग्य निगा राखावी लागते. आयुर्वेदात त्वचेची निगा राखण्यासाठी अनेक उपाय सांगण्यात आलेले आहेत. जर या टिप्स तुम्हीव फॉलो केल्या तर तुमची त्वचा देखील चिरतरूण दिसू लागेल. यासाठी वाचा त्वचेचे विकार आयुर्वेदिक उपाय | Skin Diseases Ayurvedic Remedies In Marathi,

त्वचेवर तूप लावा

तुपाचा वापर स्वयंपाकात केला जातो ज्यामुळे ते तुमच्या आरोग्यासाठी उत्तम असते हे प्रत्येकाला माहीत आहे. पण त्वचेसाठीही तूप खूप महत्त्वाचं ठरू शकतं. आयुर्वेद शास्त्रात त्वचेच्या अनेक समस्यांवर तूप लावण्याचा उपाय सांगण्यात येतो. कारण तुपामुळे त्वचेचं योग्य पोषण होतं. शरीरातील दोष संतुलित ठेवण्यासाठी आणि त्वचा मुलायम करण्यासाठी आहारात आणि सौदर्यप्रसाधनात तूप असायला हवं.

भरपूर पाणी प्या

पाण्यामुळे तुमचे शरीर आणि त्वचा हायड्रेट राहते. शिवाय शरीर आणि त्वचेमधील टॉक्सिन्स बाहेर टाकण्यास मदत होते. यासाठी आयुर्वेदात दररोज चार ते पाच लीटर पाणी पिण्याचा सल्ला देण्यात येतो. शिवाय आयुर्वेदामध्ये शरीर डिटॉक्स करण्यासाठी अनेक उपाय सांगण्यात येतात. जर तुम्हाला तुमची त्वचा टवटवीत ठेवायची असेल तर हे उपाय तुम्ही नक्कीच करायला हवेत. कारण त्यामुळे तुमचे शरीर आतून स्वच्छ होते ज्याचा चांगला परिणाम त्वचेवर होतो. 

नियमित व्यायाम करा 

त्वचा टवटवीत आणि चमकदार ठेवण्याचा आणखी एक प्राचीन उपाय म्हणजे नियमित व्यायाम करणे. योगासने, मेडिटेशन, प्राणायाम अशा व्यायाम पद्धतीचा सराव केल्याने तुमच्या त्वचेवर चांगला परिणाम होतो. शारीरिक आणि मानसिक संतुलन राखण्यासाठी व्यायाम करणे फायदेशीर ठरू शकते. 

त्रिफळा चूर्ण खा

त्रिफळा चूर्ण म्हणजे आवळा, बेहडा आणि हिरड्याचे मिश्रण होय. या तिन्ही आयुर्वेदिक वनस्पती शरीर आणि त्वचेसाठी उत्तम असतात. यात असलेले अॅंटि एजिंग गुणधर्म तुमच्या त्वचा समस्या दूर ठेवतात. शिवाय रक्त शुद्ध करण्यासाठी, हॉर्मोन्स संतुलित ठेवण्यासाठी हे चूर्ण फायदेशीर ठरते. यासाठी सकाळी उपाशीपोटी मध अथवा कोमट पाण्यासोबत त्रिफळा चूर्ण अवश्य सेवन करा. यासाठी जाणून घ्या त्रिफळा चूर्ण फायदे मराठीत (Triphala Churna Benefits In Marathi)

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

Read More From Ayurveda