मेकअप करणं हा अनेकींच्या जिव्हाळ्याचा विषय असतो. यासाठी प्रत्येकीचा मेकअप किट तिच्या आवडीच्या मेकअप प्रॉडक्टने नेहमीच सज्ज असतो. मात्र दैनंदिन मेकअपसाठी प्रत्येकवेळी फुल कव्हरेज देणाऱ्या मेकअपची गरज नसते. त्यामुळे नॅचरल अथवा नो मेकअप लुक करताना तुम्ही फाऊंडेशन लावणं टाळता. नेहमी लक्षात ठेवा की, फाऊंडेशन हे नेहमी फुल कव्हरेज मेकअपसाठीच वापरलं जातं. मग जर तुम्हाला फुल कव्हरेज मेकअप नको असेल तर अशा वेळी मेकअप बेससाठी कोणकोणते प्रॉडक्ट तुम्ही वापरू शकता यासाठी ही माहिती अवश्य वाचा.
बिना फाऊंडेशनचा मेकअप करण्यासाठी वापरा हे प्रॉडक्ट
फाऊंडेशनमुळे तुमच्या फाईन लाईन्स, सुरकुत्या. डार्क सर्कल्स झाकले जातात ज्यामुळे तुम्हाला फुल कव्हरेज मिळतो. त्यामुळे मेकअप बेससाठी नेहमी फाऊंडेशनच वापरलं जातं. मात्र असे इतर अनेक प्रॉडक्ट आहेत ज्याचा बेस तुम्ही मेकअपसाठी करू शकता.
टिंट्ड मॉईस्चराईझर –
टिंट्ड मॉईस्चराईझर हे एक लिक्विड – क्रिम मेकअप प्रॉडक्ट आहे, ज्यामुळे तुमची त्वचा मॉईस्चराईझ होतेच शिवाय तुमच्या त्वचेचा रंगही एकसमान होतो. यामुळे तुमच्या त्वचेला फाऊंडेशनपेक्षा जास्त नैसर्गिक फिनिशिंग लुक मिळतो. ऑफिससाठी अथवा कोणत्याही साध्या कामांसाठी घराबाहेर पडताना तुमच्या चेहऱ्यावर थोडं टिंट्ड मॉईस्चराईझर आणि ब्लश लावा आणि एक अप्रतिम नॅचलर लुक मिळवा.
सीसी क्रिम –
इंडियन ब्युटी वर्ल्डमध्ये सीसी क्रिम अथवा करेक्टिंग क्रिमच्या एकापेक्षा एक चांगल्या श्रेणी उपलब्ध आहेत. या क्रिममुळे तुमच्या त्वचेतील ब्लेमिशेस अथवा इनपरफेक्शनस पटकन झाकले जातात. हे एखाद्या फाऊंडेशनप्रमाणेच असतं मात्र फाऊंडेशपेक्षा थोडं कमी कव्हरेज देतं. मात्र ते फाऊंडेशनपेक्षा खूपच हलकं असल्यामुळे तुमच्या त्वचेला आरामदायक ठेवतं.
स्कीन टिंट –
जेव्हा तुम्हाला फुल कव्हरेज नको असतं तेव्हा तुमच्या मेकअप बेससाठी तुम्ही स्कीन टिंट वापरू शकता. ते पाण्याप्रमाणे पातळ असून त्यामुळे तुमच्या त्वचेला एक छान सुंदर, नॅचरल, चमकदार लुक मिळू शकतो. फाऊंडेशन नको असेल तर मेकअप बेससाठी हे एक उत्तम प्रॉडक्ट आहे. तुमच्या मेकअप किटमध्ये हे असेल तर तुम्ही कुठेही आणि कधीही झटपट मेकअप करू शकता.
कन्सिलर –
फाऊंडेशनचा वापर टाळण्यासाठी तुम्ही कन्सिलर नक्कीच वापरू शकता. ज्यामुळे तुमचे डार्क सर्कल्स आणि इतर त्वचेच्या समस्या झाकता येतील. मात्र त्यासाठी फुल कव्हरेज देणारे कन्सिलर वापरा. कन्सिलर लावल्यावर ब्युटी ब्लेंडर अथवा मेकअप ब्रश त्वचेवर डॅब करत ते व्यवस्थित ब्लेंड करा. डोळ्यांखाली वापर करण्यासाठी तुमच्या त्वचेच्या रंगापेक्षा एक शेड लाईट रंगाची शेड निवडा.
एचडी पावडर –
सेटिंग पावडरचा वापर नेहमी कन्सिलर लावल्यावर करा. ज्यामुळे ते पटकन सेट होईल आणि त्वचेवर एकसमान दिसू लागेल.
आम्ही सांगितलेल्या टिप्स फॉलो केल्या तर तुम्हाला तुम्हाला तुमच्या फेव्हरेट फाऊंडेशनची आठवणदेखील येणार नाही. कारण तुम्हाला एक छान नॅचरल आणि नो मेकअप लुक मिळेल. यासाठी मॉईस्चराईझर लावल्यावर फेशिअल ऑईल आणि एचडी पावडरचा वापर करा. ज्यामुळे तुमचा नॅचरल लुक परफेक्ट होईल आणि चेहऱ्यावर एक छान ग्लो दिसू लागेल. कधी कधी मेकअप करताना फाऊंडेशनला ब्रेक देण्यासाठी हे प्रॉडक्ट एक छान पर्याय ठरतील.
फोटोसौजन्य – शटरस्टॉक
अधिक वाचा –
न्यूड लिपस्टिक वापरण्यापूर्वी या गोष्टी अवश्य लक्षात ठेवा
मीरा राजपूतने शेअर केलं ब्युटी सिक्रेट, अशी घेते त्वचेची काळजी
Read More From Make Up Trends and Ideas
चेहऱ्यावर असतील वांग तर असा करा मेकअप | Face Makeup For Freckles In Marathi
Leenal Gawade
मेकअप न आवडणाऱ्या मुलींसाठी सोप्या मेकअप टिप्स (Simple Makeup Tips In Marathi)
Vaidehi Raje
एचडी मेकअप आणि एअरब्रश मेकअपमध्ये काय आहे नेमका फरक
Trupti Paradkar