केळ्याच्या गुणधर्मांविषयी तुम्हाला नक्कीच माहीत असेल मात्र याच केळ्याची साल देखील किती महत्वाची आहे हे तुम्हाला माहीत आहे का ? बऱ्याचजणांना हे माहीतच नसेल की केळ्याप्रमाणेच केळ्याच्या सालीचेही अनेक फायदे असतात. कारण केळं खाल्लानंतर केळ्याची साल आपण नेहमी फेकून देतो.पण तुम्हाला हे ऐकून कदाचित आश्चर्य वाटेल की या केळ्याच्या सालीमध्ये अनेक अॅंटि ऑक्सिडंट, मिनरल्स चे घटक असतात. ज्यामुळे तुमच्या त्वचेचं चांगलं पोषण होऊ शकतं. शिवाय ही केळ्याची साल तुम्ही तुमचे सौंदर्य खुलवण्यासाठी वापरू शकता. यासाठीच केळ्याच्या सालीमधील हे फायदे जरूर जाणून घ्या.
केळ्याच्या सालीचा उपयोग कसा कराल
चेहऱ्यावर ग्लो आणण्यासाठी
केळ्याच्या सालीमध्ये अॅंटि ऑक्सिडंट गुणधर्म असल्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील डाग आणि चट्टे कमी होण्यास मदत होते. यासाठी केळीच्या सालीचा आतील भाग चेहऱ्यावर लावा आणि काही मिनीटे ठेवून चेहरा कोमट पाण्याने स्वच्छ धुवा.
Shutterstock
दातांना चमकदार करण्यासाठी
केळ्याच्या सालीचा वापर करून तुम्ही तुमची स्माईल सुधारू शकता. म्हणजेच जर दररोज तुम्ही केळ्याची साल तुमच्या दातांवर घासली तर तुमचे दात चमकदार होऊ शकतात. तुम्हाला डेंटिस्ट कडे जाऊन महागड्या ट्रिटमेंट नको असतील तर हा उपाय घरीच करायला काहीच हरकत नाही.
अंगावरील चामखीळ कमी करण्यासाठी
अनेकांच्या अंगावर विशेषतः मानेवर चामखीळ असतात. ज्यामुळे त्यांचे सौंदर्य झाकले जाते. मात्र जर तुम्हाला अशी समस्या असेल तर काळजी करू नका. कारण केळ्याची साल यावर वरदान ठरू शकते. केळ्याची साल तुम्ही तुमच्या चामखीळ असलेल्या त्वचेवर लावू शकता. रात्रभर एखाद्या कापडी पट्टीच्या मदतीने केळ्याची साल या भागावर बांधून ठेवा. हा उपाय केल्यामुळे तुमच्या त्वचेवरील चामखीळ कमी होण्यास मदत होईल.
पिंपल्स दूर करण्यासाठी
चेहऱ्यावरील पिंपल्स तुमच्या सौंदर्यात बाधा आणत असतात. या समस्येला दूर करण्यासाठी मग तुम्ही अनेक उपाय करता. पण कधी यासाठी तुम्ही केळ्याची साल वापरली आहे का ? तुम्हाला ऐकून नक्कीच आश्चर्य वाटेल केळ्याच्या सालीने तुम्ही तुमचे पिंपल्स कमी करू शकता. यासाठी पिंपल्सवर केळ्याची साल लावा आणि हळूवार मसाज करा.
चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यासाठी
जीवनशैलीत झालेले बदल आणि वाढते प्रदूषण याचा परिणाम तुमच्या चेहऱ्यावर होत असतो. ज्यामुळे कमी वयातच तुमच्या चेहऱ्यावर एजिंगच्या खुणा दिसू लागतात. तुमच्या चेहऱ्यावर अकाली सुरकुत्या दिसत असतील केळ्याची साल तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. चेहऱ्यावर केळ्याची साल लावल्यामुळे तुमच्या त्वचेचं चागलं पोषण होतं. ज्यामुळे त्वचा मॉश्चराईझ आणि फ्रेश दिसू लागते. त्वचेचं आरोग्य राखण्यासाठी तुम्ही हा उपाय आठवड्यातून एक ते दोन वेळा करू शकता.
Shutterstock
डार्क सर्कल्स घालवण्यासाठी
उशीरा झोपणे, कामाची दगदग, रात्रभर काम करणे, एखाद्या गोष्टींची अती चिंता या सर्वांमुळे तुमच्या डोळ्यांच्या खाली काळी वर्तुळे निर्माण होतात. जर तुम्हाला अशा डार्क सर्कल्सचा त्रास होत असेल तर त्यावर केळ्याच्या सालीचा आतील गर आणि कोरफडाचा गर मिक्स करून डोळ्यांच्या खालील भागावर लावा. ज्यामुळे तुमची ही समस्या कमी होण्यास मदत होईल.
शरीरातील थकवा कमी करण्यासाठी
दिवसभर कामाच्या दगदगीमुळे तुम्ही थकला असाल तर घरी गेल्यावर डोळ्यांवर केळ्यांची साल ठेवा आणि शांत बसून अथवा झोपून रहा. दहा मिनीटांमध्ये तुम्हाला अगदी फ्रेश आणि ताजे वाटू लागेल.
आम्ही सांगितलेले उपाय तुम्हाला कसे वाटले आणि त्याचा तुम्हाला काय फायदा झाला हे आम्हाला जरूर कळवा
अधिक वाचा
या ज्यूस थेरपीने तुम्हाला मिळेल Long Lasting सौंदर्य
सौंदर्य वाढविण्यासाठी घरीच तयार करा हे फेसपॅक
केळ्याने वाढतं तुमच्या केसांचं आणि त्वचेचं सौंदर्य
फोटोसौजन्य – शटरस्टॉक