त्वचेची काळजी

बिपाशा बासूप्रमाणे ‘बोल्ड अॅंड ब्युटिफुल’ लुक हवा तर फॉलो करा या टिप्स

Trupti Paradkar  |  Nov 25, 2020
बिपाशा बासूप्रमाणे ‘बोल्ड  अॅंड ब्युटिफुल’ लुक हवा तर फॉलो करा या टिप्स

बॉलिवूड अभिनेत्रींच्या अभिनयाप्रमाणेच दिलखेचक सौंदर्याचे अनेक चाहते असतात. त्यामुळे त्यांची तुलना नेहमी अभिनयापेक्षा सौंदर्यांशीच जा्स्त केली जाते. एवढंच नाही तर आपणही या सेलिब्रेटीज प्रमाणे दिसावं अशी प्रत्येक स्त्रीची  सुप्त इच्छा असते. सहाजिकच सेलिब्रेटीजचे ब्युटी सिक्रेट फॉलो करण्यावर अनेकींचा भर असतो. सेलिब्रेटीज देखील चाहत्यांसाठी त्यांची स्टाईल, फॅशन, ब्युटी टिप्स नेहमीच शेअर करत असतात. बिपाशा बासूने आजवर सौंदर्य आणि अभिनयाने अनेकांची मनं जिंकून घेतली आहेत. त्यामुळे बिपाशा बासू तुमची आवडती अभिनेत्री असेल आणि तिच्या प्रमाणे बोल्ड अॅंड ब्युटीफुल दिसण्याची तुमचीही इच्छा असेल तर तुम्ही तिचं हे ब्युटी रूटिन नक्कीच फॉलो करू शकता.

स्किन केअर आहे महत्त्वाचं –

बिपाशा बासू तिच्या स्किन केअर रूटिनबाबत खूपच जागरुक आहे. ती नेहमी अशाच ब्युटी प्रॉडक्टची निवड करते, जे तिला सहज उपलब्ध होतील आणि ज्याचा वापर करणं अतिशय सोपे असेल. झोपण्यापूर्वी बिपाशा नेहमी तिच्या त्वचेला  क्लिंझिंग, टोनिंग आणि मॉईस्चराईझिंग करते. याबाबत सतत ती तिच्या इन्स्टा अकाऊंटमधून चाहत्यांना माहिती देत असते. जरी ती स्किन केअरसाठी काही ब्युटी प्रॉडक्टचा वापर करत असली तरी तिच्या स्किन केअरची सुरूवात ही नेहमी डाएटपासूनच होते. यासाठी सकाळी उठल्यावर ती कमीत कमी चार ते सहा ग्लास पाणी पिते आणि रात्री भिजत घाललेले बदाम खाते. ज्यामुळे तिच्या त्वचेवर एक नैसर्गिक ग्लो येतो शिवाय त्वचा हायड्रेट राहण्यास मदत होते.

घराबाहेर पडण्यापूर्वी त्वचेची घ्या काळजी –

त्वचेला सर्वात जास्त धोका असतो तो हानिकारक सुर्यकिरणांचा. प्रखर सुर्यकिरणांमुळे जसं त्वचा टॅन होते तसंच त्वचेतील कोलेजीनही कमी होतं. म्हणूनच बिपाशा सनस्क्रिनशिवाय कधीच घराबाहेर जात नाही. सुर्यप्रकाशात फिरताना एखादी उत्तम हॅट आणि चांगल्या ब्रॅंडचा सनग्लास अतिशय महत्त्वाचा आहे असं तिचं म्हणणं आहे. 

केसांची योग्य निगा राखून वाढवा सौंदर्य –

बिपाशाच्या मते तिचे केस ही तिच्या सौंदर्याची जमेची बाजू आहे. त्यामुळे ती तिच्या केसांची जास्तीत जास्त निगा राखते. केसांना चांगला शॅम्पू आणि कंडिशनर करण्यासोबत केसांना योग्य तेलाने मसाज करणंही तितकंच गरजेचं आहे. हेअर मसाजमुळे केस मजबूत होतात आणि  गळत नाहीत. त्यामुळे केसांना  चांगल्या तेलाने मसाज आठवड्यातून कमीत कमी दोन ते तीन वेळा करायलाच हवं.

रेड लिपस्टिक आहे प्लस पॉईंट –

बिपाशा बासूची रेड लिपस्टिक हा विक पॉंईट आहे. त्यामुळे ती बऱ्याचदा लाल लिपस्टिकमध्येच दिसते. आजकाल लाल लिपस्टिकमध्ये क्रिमी, मॅट, ग्लॉसी असे अनेक प्रकार उपलब्ध आहेत. त्यामुळे घरी असो वा बाहेर तिला लाल लिपस्टिक लावणं खूप आवडतं. रेड लिपस्टिक हे तिच्या बोल्ड अॅंड ब्युटिफुल असण्यामागचं एक सिक्रेटच आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही. 

केसांना करा फक्त हायलाईट –

वयानुसार पांढरे केस लपवण्यासाठी आणि स्टायलिश दिसण्यासाठी केसांना कलर करणं ही काळाची गरज झाली आहे. मात्र बिपाशा केसांना पूर्ण कलर करण्याऐवजी फक्त हायलाइट करते. ज्यामुळे तिचा चेहरा अधिक आकर्षक दिसतो असं तिला वाटतं. चिक बोन्स आकर्षक दिसण्यासाठी अशा प्रकारे केस हायलाईट करणं एक नक्कीच चांगला पर्याय आहे.

फोटोसौजन्य – इन्टाग्राम

अधिक वाचा –

हिना खानसारखे सिल्की आणि चमकदार केस हवे तर फॉलो करा या टिप्स

अभिनेत्री दीपिका कक्कड शिजलेल्या भाताने करते फेशिअल, जाणून घ्या पद्धत

सणासाठी करिना कपूरप्रमाणे दिसायचं असेल तर वापरा अशी लाल लिपस्टिक

Read More From त्वचेची काळजी