Fitness

ब्लॅक कॉफी पिण्याचे फायदे काय आहे (Black Coffee Benefits In Marathi)

Dipali Naphade  |  Aug 20, 2019
Black Coffee Benefits In Marathi

कॉफी हे असं पेय आहे जे सकाळी उठल्यानंतर तुम्हाला ताजंतवानं करतं. बऱ्याच जणांना कॉफी प्यायल्यानंतर व्यवस्थित जाग आल्यासारखी वाटते. काहींना तर कॉफीच्या वासानेच बरं वाटतं. कॉफी दुधातून पिण्यापेक्षा ब्लॅक कॉफीचे (Black Coffee) अनेक फायदे आहेत. ब्लॅक कॉफीला नेहमीच हेल्दी मानलं जातं. या कॉफीमध्ये कॅलरीचं प्रमाण खूपच कमी असतं. तसंच यामध्ये कॅल्शियम आणि पोटॅशियमसारखी पोषकतत्वही असतात. दिवसातून दोन कप ब्लॅक कॉफी प्यायल्यास, तुमच्या शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करून वजन कमी करण्यासाठी याचा फायदा होतो. मेंदू तल्लख ठेवण्यासाठीही त्याचा उपयोग होतो. यामुळे शरीरामध्ये ऊर्जा राहाते. तसंच याचे अनेक फायदे आहेत जे आम्ही तुम्हाला या लेखातून सांगणार आहोत. 

ब्लॅक कॉफीचे पोषक तत्व (Nutritional Value Of Black Coffee)

Shutterstock

ब्लॅक कॉफी ही तुमच्या शरीरासाठी चांगली पोषक ठरते. यामुळे तुमच्या शरीराला अधिक ऊर्जा मिळते. तर यामध्ये कॅल्शियम आणि पोटॅशियम हे पोषक तत्व असल्याने तुम्ही दिवसभरात उत्साही राहाता. ब्लॅक कॉफीमध्ये 60 टक्के पोषकतत्व असतात तर केवळ 10 टक्के कॅलरीज असतात. याशिवाय ब्लॅक कॉफीमध्ये 10 टक्के मिनरल्सचा समावेश असतो. यामधील कॅफेन शरीरासाठी फायदेशीर ठरतं. पण कोणत्याही गोष्टीचा अतिरेक चांगला नाही. त्यामुळे तुमच्या शरीराला योग्य पोषक तत्व मिळण्यासाठी तुम्ही केवळ दोन कप ब्लॅक कॉफी दिवसभरात प्यायला हवी. 

ब्लॅक कॉफीचे आरोग्यदायी फायदे (Health Benefits Of Black Coffee)

ब्लॅक कॉफीचे शरीराला वेगवेगळ्या प्रकारे फायदे होतात. कितीतरी वर्षापासून ब्लॅक कॉफीचा उपयोग शरीराच्या फायद्यासाठी करण्यात येत आहे. नक्की याचा उपयोग आपल्याला कसा वेगळ्या तऱ्हेने करता येऊ शकतो ते जाणून घेऊया. 

वजन कमी करण्यासाठी ठरते फायदेशीर (For Weight Loss)

Shutterstock

आजकालच्या धावपळीच्या आयुष्यात वजन नियंत्रणात ठेवणं हे खूपच जिकरीचं काम आहे. पण या सर्वात मोठ्या समस्येचा उपाय म्हणजे ब्लॅक कॉफी. तुम्ही व्यायाम करत असल्यास, त्याआधी अर्धा तास तुम्ही ब्लॅक कॉफी घ्या. यामुळे तुमच्या शरीरातील मेटाबॉलिजम हे 50 टक्के वाढतं आणि तुमच्या शरीरातील आणि नाभीवरील चरबी कमी होण्यासाठी याची मदत होते. तुमची चरबी कमी करण्यासाठी तुमची नर्व्हस सिस्टिम व्यवस्थित चालवण्याचं काम ब्लॅक कॉफी करते. 

स्मरणशक्ती वाढवण्यास होते मदत (Boosts Memory)

Shutterstock

ब्लॅक कॉफी मेंदूसाठी फायदेशीर ठरते. यामुळे नर्व्हस सिस्टिम अॅक्टिव्ह राहतात आणि मानसिक आजारांपासून बचाव होतो. तसंच ब्लॅक कॉफी पिण्याने तुमचा मेंदू तल्लख राहतो आणि स्मरणशक्तीही चांगली राहाते. तसंच सकाळी नियमित ब्लॅक कॉफी प्यायल्याने पार्किन्सनचा धोका 60 टक्के कमी होतो. ब्लॅक कॉफी मेंदूवर चांगला परिणाम करते. 

वर्कआऊट परफॉर्मन्स वाढवण्यास मदत (Help Increase Workout Performance)

Shutterstock

तुम्हाला नेहमी जिममध्ये येण्याआधी तुमचा ट्रेनर ब्लॅक कॉफी पिऊन यायला सांगतो त्याला एक विशिष्ट कारण आहे. ते म्हणजे ब्लॅक कॉफीने तुमचा वर्कआऊट दरम्यान परफॉर्मन्स वाढण्यास मदत मिळते. तुम्हाला वर्कआऊट करण्यासाठी शंभर टक्के एनर्जी मिळते. तसंच तुमच्या शरीरातील रक्तप्रवाह यामुळे वाढतो. 

यकृतासाठी ठरतं फायदेशीर (Benefits Of Black Coffee For Liver)

Shutterstock

यकृत हा तुमच्या शरीराचा महत्त्वाचा भाग आहे आणि तुमच्या शरीरातील जवळपास 500 पेक्षा अधिक व्हायटल फंक्शन्स यकृत सांभाळतं. पण तुम्हाला माहीत आहे का तुमचं यकृत चांगलं राखण्यासाठी फायदेशीर ठरतं. यकृताचा कॅन्सर होण्यापासून वाचवण्यासाठीही ब्लॅक कॉफी मदत करते. तसंच हेपेटायटिस, फॅटी लिव्हर यासाठी ब्लॅक कॉफी उपयुक्त ठरते. तर ज्या व्यक्ती दिवसभरातून किमान चार कप ब्लॅक कॉफी पितात ते यकृताच्या समस्यांपासून दूर राहण्यास मदत होते. 

मधुमेह दूर राखण्यास मदत होते (Helps Keep Diabetes Away)

Shutterstock

मधुमेह हा असा आजार आहे जो तुमचं शरीर संपूर्ण पोखरून टाकतो. तुम्ही नियमित ब्लॅक कॉफीचं सेवन केल्यास, मधुमेहापासून दूर राहण्यास मदत होते. दिवसातून दोन कप ब्लॅक कॉफी प्यायल्यास, मधुमेह होण्याची शक्यता कमी होते. शरीरामध्ये तयार होणारं इन्शुलिन वाढवण्यास ब्लॅक कॉफीची मदत होते. यासाठी तुम्हाला अगदी दुधाची कॉफी प्यायल्यासही मदत मिळू शकते. फक्त ही कॉफी शुगरफ्री असावी. 

तणाव कमी करतं (Reduces Stress)

Shutterstock

कॉफीमध्ये असणारं कॅफेन तुमचा नियमित तणाव कमी करण्यास फायदेशीर ठरतं. आजकाल प्रत्येक क्षणी माणसाला तणावाला सामोरं जावं लागतं. तुमचा मूड चांगला करण्यासाठी ब्लॅक कॉफी फायदेशीर ठरते. यातील कॅफेन तुमच्या हार्मोन्समध्ये ऊर्जा निर्माण करून तुमचा मूड चांगला राहण्यासाठी मदत करतात. तसंच तुमच्या मानसिक स्वास्थ्यासाठीही ब्लॅक कॉफीमधील कॅफेनचा उपयोग होतो. पण याचं अतिसेवन करू नये. त्यामुळे तुमच्या शरीराला हानीही पोहचू शकते. नैराश्यातून बाहेर येण्यासाठीही याचा उपयोग होतो. 

पोट साफ करण्यास फायदेशीर (Useful For Cleansing The Stomach)

Shutterstock

रोजच्या आयुष्यात आपण जे आरोग्यासाठी अहितकारक खाणं खात असतो त्यामुळे पोटामध्ये टॉक्झिन्स जमा होत असतात. तुमच्या शरीरात जमा झालेले हे टॉक्झिन्स काढून टाकण्यासाठी ब्लॅक कॉफीचा उपयोग होतो. त्यामुळे पोट साफ करण्यास ब्लॅक कॉफीचा फायदा होतो. या निचरा तुमच्या युरीनमार्फत होतो आणि तुमचं पोट साफ राहातं. 

अँटिऑक्सिडंट्सचा जास्त प्रभाव (Rich In Antioxidants)

Shutterstock

ब्लॅक कॉफीमध्ये जास्त प्रमाणात अँटिऑक्सिडंट्स असतात. कॅन्सरपासून वाचण्यासाठी याचा उपयोग होतो. ग्रीन टी आणि कोकोपेक्षाही अधिक प्रमाणात कॉफीमध्ये अँटिऑक्सिडंट्स असतात. त्यामुळे याचा जास्त चांगला प्रभाव शरीरावर पडतो. 

अधिक उत्साह (Instant Energy)

Shutterstock

कॉफीमध्ये कॅफेनची मात्रा अधिक असल्याने ब्लॅक कॉफी प्यायल्यावर अधिक ऊर्जा निर्माण होते आणि शरीरात अधिक उत्साह निर्माण होतो. थकून आल्यानंतर म्हणूनच कॉफी प्यायली जाते. यामुळे दिवसभराचा थकवा क्षणार्धात गायब होतो. ब्लॅक कॉफी अधिक ऊर्जा मिळण्यासाठी शरीरातील चरबी कमी करण्याचं काम करते. त्यामुळे ब्लॅक कॉफी नियमित पिणंं आरोग्यासाठी चांगलं ठरतं. 

अभ्यास करताना झोप आल्यास (Good For Intelligence)

GIPHY

अभ्यास करताना स्मरणशक्ती आणि तुमचा मेंदू तल्लख राहणं अत्यंत गरजेचं असतं. अभ्यास असंच नाही पण कोणतंही काम करताना तुम्हाला मेंदू तल्लख असण्याची गरज भासते. अशावेळी जर झोप येत असेल तर काम पूर्ण होत नाही. तेव्हा तुम्ही ब्लॅक कॉफीचा आधार घेऊ शकता. ब्लॅक कॉफी तुमचा मेंदू अशावेळी तल्लख करते आणि तुमच्या मेंदूला चालना देण्यासाठी फायदेशीर ठरते.

ब्लॅक कॉफी पिण्याचे फायदे सौंदर्यसाठी (Benefits Of Black Coffee For Skin And Hair)

कॉफीचा उपयोग पिण्यासाठी आणि आपला तणाव दूर करण्यासाठी अथवा आरोग्यासाठी चांगला आहे हे आपल्या सर्वांनाच माहीत असतं. पण ब्लॅक कॉफीचा उपयोग आपल्याला आपलं सौंदर्य खुलवण्यासाठीही करता येऊ शकतो याची तुम्हाला कल्पना आहे का? तुम्ही आम्ही सांगितल्याप्रमाणे जर ब्लॅक कॉफीचा वापर केलात तर तुमची त्वचाही अधिक तजेलदार होऊ शकते आणि तुमच्या सौंदर्यामध्ये अधिक भर पडते. तुम्ही हे उपाय घरच्या घरी करू शकता.

त्वचेच्या skin exfoliation साठी फेस स्क्रब (Face Scrub)

Shutterstock

त्वचेवरील डेड स्किन काढून टाकण्यासाठी आणि कोरडी त्वचा पुन्हा एकदा मऊ आणि मुलायम करण्यासाठी ब्लॅक कॉफी स्क्रबचा उपयोग होतो. या स्क्रबमुळे तुमची त्वचा कोरडी होण्यापासूनही वाचते. हा स्क्रब तयार करणं आणि वापरणं अत्यंत सोपं आहे. 

कसा करावा वापर 

मऊ मुलायम त्वचेसाठी कॉफी आणि कोको फेसपॅक (Face Packs For Soft Skin)

Shutterstock

तुम्हाला अगदी पार्लरप्रमाणे ट्रिटमेंट हवी असेल तर खिशाला चाट पाडायची नसेल तर कॉफी आणि कोको फेसपॅक हा उत्तम उपाय आहे. फक्त याचा वापर करताना तुमची त्वचा तेलकट असल्यास यामध्ये दुधाऐवजी दह्याचा वापर करा. यामुळे तुमच्या त्वचेला योग्य पोषण मिळतं आणि तुमची त्वचा हायड्रेट राहण्यास मदत होते. 

कसा करावा वापर 

सेल्युलाईट नष्ट करण्यासाठी कॉफी स्क्रब (For Cellulite Reduction)

Shutterstock

शरीरावर सेल्युलाईट असणं नक्कीच कोणालाही आवडणार नाही. पण हे काढून टाकता येतात. यासाठी कॉफी स्क्रब हा चांगला पर्याय आहे. कॉफी त्वचेला अधिक मुलायम करते. त्यामुळे सेल्युलाईट नष्ट करण्यासाठी याचा उपयोग होतो. हे बनवणं अतिशय सोपं आहे. तसंच याचा परिणाम निश्चितरित्या तुमच्या त्वचेवर होतो. 

कसा करावा वापर 

डोळ्याखालील काळ्या वर्तुळांसाठी गुणकारी (Under Eye Dark Circle And Puffy Eyes)

Shutterstock

डोळ्यांखाली निर्माण झालेली काळी वर्तुळं आणि सूज घालवण्यासाठी कॉफीचा चांगला उपयोग होतो. डिहायड्रेशन, अलर्जी, झोप न होणं या गोष्टी डोळ्यांखाली काळी वर्तुळं येण्यास कारणीभूत ठरतात. कॉफीमधील असलेले कॅफेन या गोष्टी नष्ट करण्यास मदत करतात. ब्लॅक कॉफीमध्ये असणारे अँटिइन्फ्लेमेटरी काळे डाग कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतात. 

कसा करावा वापर 

त्वचा टाईट करण्यासाठी उपयुक्त (For Skin Tightening)

Shutterstock

कॉफीमध्ये असणारे कॅफेन हे त्वचा अधिक टाईट राखण्यासाठी उपयुक्त ठरतं. तसंच यामुळे तुमच्या  चेहऱ्यावर सुरकुत्या येत नाहीत. त्यामुळेच त्वचेसाठी वापरल्या जाणाऱ्या बऱ्याचशा उत्पादनांमध्ये कॉफीचा अंश असतो. तुमच्या चेहऱ्यावर येणाऱ्या सुरकुत्या कमी करून चेहरा तजेलदार दिसण्यासाठी याचा उपयोग करता येतो. त्यासाठी तुम्ही कॉफी स्क्रब बनवून घ्या. 

कसा करावा वापर 

टॅनिंग काढून टाकण्यासाठी (Repairing UV Damage)

Shutterstock

ब्लॅक कॉफीमध्ये असणारे अँटिऑक्सिडंट्स हे भाजी आणि फळांमधून मिळणाऱ्या अँटिऑक्सिडंट्सपेक्षा अधिक असतात. त्यामुळे सूर्याच्या किरणांपासून येणाऱ्या अल्ट्राव्हायलेट किरणांपासून ब्लॅक कॉफी आपल्या त्वचेचा बचाव करण्यासाठी उपयुक्त ठरते. 

कसा करावा वापर 

त्वचा उजळवण्यासाठी (Skin Brightening)

Shutterstock

कॉफीमध्ये असणाऱ्या अँटिऑक्सिडंट्समुळे त्वचा अधिक तजेलदार होण्यास आणि उजळवण्यासाठी उपयोग करून घेता येतो. यासाठी जास्त काही कष्ट करायची गरज भासत नाही. घरच्या घरी तुम्ही तुमचा पूर्ववत रंग टिकवून ठेवू शकता.

कसा करावा वापर 

नैसर्गिक चमकदार केस (Natural Shiny Hair)

Shutterstock

केस चमकदार होण्यासाठी आपण बरेच प्रयत्न करत असतो. पण कॉफी हा त्यातील सर्वात सोपा आणि घरगुती उपाय आहे. त्यासाठी तुम्हाला जास्त मेहनत करावी लागत नाही. कॉफी पावडर आपल्या सगळ्यांच्याच घरात असते. त्यामुळे त्याचा उपयोग तुम्ही तुमच्या केसांची चमक परत आणण्यासाठी करू शकता. 

कसा करावा वापर 

हेअरडाय करण्यासाठी (Hair Dye)

Shutterstock

ब्लॅक कॉफीमध्ये असणारं कॅफेन तुमच्या केसांची वाढही चांगलं करतं आणि केसगळती रोखण्यास मदत करतं. तसंच याचा उपयोग तुमचे पांढरे केस काळे करण्यासाठीही होतो. ब्लॅक कॉफीमुळे केसांना अधिक गडद रंग मिळतो. 

कसा करावा वापर 

स्काल्पसाठी (Scalp Exfoliation)

Shutterstock

बऱ्याच जणांना स्काल्पची समस्या असते. पण यावर नक्की काय उपाय करायचा यासाठी त्रस्त झालेले असतात. तुमचा कोरडा स्काल्प आणि डेड स्किन काढून टाकण्यासाठी याचा उपयोग होतो. तसंच त्यासाठी जास्त काही करण्याची गरज भासत नाही. 

कसा करावा वापर 

ब्लॅक कॉफी कृती (How To Make Black Coffee)

Shutterstock

खरं तर ब्लॅक कॉफी बनवणं अतिशय सोपं आहे. पण तुम्हाला तुमच्या चवीप्रमाणे ती बनवून घ्यावी लागते. काही जणांना खूप कडू कॉफी आवडते तर काही जणांना माईल्ड. त्यामुळे कोणत्या ब्रँडची कॉफी घ्यायची हे सर्वस्वी तुमच्यावर अवलंबून आहे. 

कशी करावी कॉफी? 

ही साधी सोपी पद्धत आहे. पण तुम्हाला जर कॉफी फेटून प्यायला आवडत असेल तर त्यासाठी एका वेगळ्या पद्धतीने तुम्ही कॉफी करून पिऊ शकता. त्यासाठी तुम्हाला काही वेळ द्यावा लागतो

ब्लॅक कॉफीचे नुकसान (Side Effect Of Black Coffee)

Shutterstock

कोणत्याही गोष्टीचा अतिरेक चांगला नाही हे आपण नेहमीच म्हणतो. त्याचप्रमाणे ब्लॅक कॉफी हीदेखील दिवसातून चार कपापेक्षा अधिक पोटात जाता कामा नये. यामध्ये असणाऱ्या कॅफेनमुळे मेंदूवर विपरित परिणाम होण्याची शक्यता असते. तसंच अधिक ब्लॅक कॉफी प्यायल्यास, तुमच्या झोपेवरही परिणाम होतो. यामधील अँटिऑक्सिडंट्स तुमची झोप उडवतात आणि व्यवस्थित झोप न मिळाल्यास त्याचा परिणाम तुमच्या शरीरावर होतो. ज्यामुळे सतत चिडचिड होणं, डोळ्यांखाली काळी वर्तुळं निर्माण होणं अशा समस्या उद्भवतात. अति ब्लॅक कॉफी प्यायल्यास तुम्हाला पोटदुखीचाही त्रास होऊ शकतो. त्यामुळे प्रमाणात ब्लॅक कॉफी पिणं गरजेचं आहे. 

ब्लॅक कॉफीसंबंधित प्रश्नोत्तरं (FAQ’s)

1. ब्लॅक कॉफी दिवसातून किती वेळा पिणं योग्य आहे?

तुम्ही दिवसातून साधारण तीन ते चार वेळा ब्लॅक कॉफी पिऊ शकता. यामुळे तुमच्या शरीराला फायदा होतो. पण  यापेक्षा जास्त प्रमाण वाढवल्यास त्याचे तोटे तुम्हाला सहन करावे लागतील. 

2. ब्लॅक कॉफीचा सौंदर्य जपण्यासाठी फायदा होतो का?

ब्लॅक कॉफीमध्ये असणारे अँटिऑक्सिडंट्स तुमचं सौंदर्य जपायला मदत करतात. तुम्ही यापासून स्क्रब आणि फेसपॅक तयार करून तुमचं सौंंदर्य जपू शकता. तसंच हे तुमच्या खिशालाही परवडणारं आहे. 

3. किडनीवर काही परिणाम होतो का?

किडनीवर ब्लॅक कॉफीचा अतिरेक केल्यास परिणाम होऊ शकतो. यामधील कॅफनने आणि त्यातील अंतर्भूत असणाऱ्या घटकांमुळे किडनीवर वाईट परिणाम होण्याची शक्यता असते. 

Read More From Fitness