केस

केस आणि त्वचेची निगा राखण्यासाठी वापरा कोल्ड प्रेस ऑईल, जाणून घ्या फायदे

Trupti Paradkar  |  May 30, 2022
Benefits of cold pressed oil for skin and hair

धुळ, माती, प्रदूषण आणि ताणतणावाचा तुमच्या त्वचा आणि केसांवर वाईट परिणाम होतो. केस पांढरे होणे, त्वचा सैल होणे, एजिंगच्या खुणा वाढणे अशा अनेक समस्या आजकाल दिसून येतात. अशा वेळी जर तुम्ही तुमच्या ब्युटी रूटिनमध्ये कोल्ड प्रेस ऑईलचा समावेश केला तर तुम्हाला नक्कीच चांगला फायदा होऊ शकतो. कोल्ड प्रेस ऑईलचा वापर करून तुम्ही तुमच्या त्वचा आणि केसांची काळजी घेऊ शकता. यासाठी जाणून घ्या कोल्ड प्रेस ऑईल म्हणजे काय आणि त्याचा तुमच्या सौंदर्यावर काय फायदा होतो.

कोल्ड प्रेस ऑईल म्हणजे काय

खाद्य तेल अथवा इतर वापरासाठी लागणारे तेल निरनिराळ्या बिया, फळांपासून तयार केलं जातं. बाजारात मिळणारे तेल हे हिट प्रोसेसमध्ये तयार केले जातात. हिट देण्यामुळे तेल काढताना त्यातील पोषक घटक नष्ट होतात. शिवाय बऱ्याचदा अशा तेलांमध्ये केमिकल्सचा वापर करावा लागतो. मात्र कोल्ड प्रेस तेल  प्रोसेसमध्ये तेलाला उष्णता दिली दात नाही. लाकडी घाण्यावर अथवा उष्णता न देता तेल काढल्यामुळे तेलातील पोषणमुल्ये टिकून राहतात.  यासाठीच आजकाल स्वयंपाकासाठी आणि इतर वापरासाठी लागणारे तेल कोल्ड प्रेस प्रक्रियेने केलेले असावे यावर भर दिला जात आहे. कोल्ड प्रेस तेलाचे महत्त्व समजल्यामुळे या तेलाची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे.

कोल्ड प्रेस तेलाचे सौंदर्यावर काय फायदे होतात 

कोल्ड प्रेस ऑईल त्वचेच्या आत खोलवर मुरतं आणि केस आणि त्वचेला पोषण देतं. ज्यामुळे तुमची त्वचा मऊ आणि टवटवीत होते, केस मजबूत आणि चमकदार होतात. जर तुमच्या त्वचेवर वयाआधीच सुरकुत्या अथवा एजिंगच्या खुणा निर्माण झाल्या असतील तर तुम्ही नियमित स्कीन केअर साठी कोल्ड प्रेस पद्धतीने काढलेलं तेल वापरायला हवं. ऑर्गेनिक हारवेस्टच्या कोल्ड प्रेस आर्गन ऑईलचा वापर केल्यास तुमच्या त्वचेच्या अनेक समस्या दूर होऊ शकतात. कारण यामध्ये असलेले व्हिटॅमिन ई आणि इतर पोषक घटक तुमच्या त्वचेत सहज मुरतात आणि त्वचेचं पोषण करतात.

कोल्ड प्रेस तेलाचा वापर तुम्ही केसांची निगा राखण्यासाठी देखील वापरू शकता. ऑर्गेनिक हारवेस्टच्या शुद्ध नारळाच्या तेलाचा वापर केल्यास तुमच्या केसांमधील कोंडा कमी होतो आणि केस मजबूत होतात. कारण हे तेल कोल्ड प्रेस या नैसर्गिक पद्धतीने तयार करण्यात आलेलं आहे. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा   MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक

Read More From केस