Fitness

वाचाल तर थक्क व्हाल (Benefits Of Cycling In Marathi)

Trupti Paradkar  |  Jul 15, 2020
Benefits of Cycling In Marathi

सायकल चालवणे (Cycling) हा एक एरोबिक एक्सरसाईज आहे. सहज आणि कमी कष्टाचा हा व्यायाम तुम्ही नियमित करू शकता. कारण सायकल हे एक वाहतुकीचे साधनदेखील आहे. तुम्ही व्यायामाव्यतिरिक्त तिचा प्रवासासाठीदेखील वापर करू शकता. नियमित सायकल चालवण्यामुळे तुमचा प्रवास आणि व्यायाम दोन्हीही सुखकर होऊ शकतात. एवढंच नाही व्यायामाशिवाय सायकल चालवण्याचे फायदे (benefits of cycling in marathi) अनेक आहेत. यासाठी ही माहिती लक्षपूर्वक वाचा. 

Instagram

स्नायू बळकट होतात (Strengthen Muscles)

सायकल चालवण्यामुळे तुमच्या कंबरेखाली स्नायुनां चांगला व्यायाम मिळतो. सायकल सतत चालवत ठेवण्यासाठी तुम्हाला तुमच्या दोन्ही पायांनी पॅडल वेगाने फिरवावे लागते. ज्यामुळे पाय आणि पायाच्या स्नायूंवर चांगला ताण येतो. अर्थातच यामुळे पायाचे स्नायू मजबूत आणि बळकट होतात. कंबरेखालील स्नायू बळकट करण्यासाठी वेट लिफ्टिंग, स्क्वार्ट, लेग प्रेसेस यासारखे पायांचे व्यायाम करणं गरजेचं असतं. मात्र नियमित आणि ठराविक वेळ सायकल चालवण्यामुळेदेखील तुमच्या पायांच्या स्नायुंना चांगला व्यायाम मिळू शकतो. 

स्टॅमिना वाढतो (Boosts Stamina)

नियमित सायकल चालवण्यामुळे तुमच्या शरीरातील स्टॅमिना वाढण्यास मदत होते. एखाद्या आजारपणातून बरे होण्यासाठी सुरूवातीला कठीण व्यायाम करणं शक्य नसतं.अशा वेळी स्टॅमिना म्हणजे शारीरिक क्षमता वाढवण्यासाठी तुम्ही सायकलिंग करू शकता. खेळाडूंना एखाद्या दुखापतीतून रिकव्हर होताना सायकल चालवण्याचा नक्कीच चांगला फायदा होऊ शकतो. 

वजनावर नियंत्रण राहते (Controls Weight)

ज्या लोकांना नियमित सायकल चालवण्याची सवय असते अशा लोकांचे वजन नियंत्रणात असते. कारण नियमित आणि सातत्याने वेगाने सायकल चालवण्यामुळे तुमच्या पोट आणि कंबरेखालील भागाला चांगला व्यायाम मिळतो. ज्यामुळे शरीरात फॅट जमा होत नाही आणि तुमचे वजन नियंत्रणात राहते. सायकल चालवण्याचे फायदे(cycling benefits in marathi) या व्यतिरिक्त अनेक आहेत. सायकल चालवण्यामुळे तुमच्या शरीरातील मेटबॉलिझम वाढते आणि स्नायू बळकट होतात. ज्यामुळे तुमच्या शरीरातील कॅलरिज बर्न होण्यास मदत होते.

Instagram

ह्रदयविकाराचा धोका कमी होतो (Reduces The Risk Of Heart Disease)

सायकल चालवताना तुमच्या ह्रदयाची स्पंदने वाढतात. ज्यामुळे हार्टरेट वाढून ह्रदयातील रक्ताचे पंपिग वाढते. सहाजिकच यामुळे तुमच्या संपूर्ण शरीरात रक्ताचा योग्य प्रमाणात पूरवठा होतो. ह्रदयाचे कार्य सुरळीत झाल्यामुळे शरीरातील कॅलरिज योग्य प्रमाणात बर्न  होतात. तुमचे वजन नियंत्रणात राहण्यात मदत होते. ज्यामुळे तुमच्या शरीरात बॅड कोलेस्ट्रॉल जमा होण्याचा आणि ह्रदयविकाराचा धोका कमी होतो.

कर्करोगापासून बचाव होऊ शकतो (Reduces Risk Of Cancer)

सायकल चालवण्यामुळे तुमच्या संपूर्ण आरोग्यावर त्याचा चांगला परिणाम होतो. सायकल चालवणं हा निरोगी जीवनशैली दर्शवणारा एक व्यायाम आहे. त्यामुळे जर तुम्हाला कॅन्सरपासून बचाव करायचा असेल तर नियमित चालकल चालवा. अनेक संशोधनात असे आढळून आले आहे की जे लोक नियमित सायकल चालवतात त्यांना कॅन्सर होण्याचा धोका नक्कीच कमी असतो. शिवाय सायकल चालवण्यामुळे कॅन्सर रूग्णांना आजारातून बरे होण्यासदेखील चांगली मदत होऊ शकते. 

मधुमेह नियंत्रणात येतो (Control Diabetes)

मधुमेह हा आजकाल एक जीवनशैली आजार झाला आहे. कारण जगभरात मधुमेहींची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. मधुमेहामध्ये टाईप 2 मधुमेहाचे प्रमाण जास्त असल्याचं आढळून येत आहे ही एक गंभीर बाब आहे. याचं प्रमुख कारण शारीरिक व्यायामाचा अभाव हे आहे. मात्र काही संशोधनानुसार जे लोक दिवसभरात कमीत कमी तीस मिनीटे सायकल चालवण्याचा व्यायाम करतात त्यांना मधुमेह होण्याचा धोका कमी असतो. शिवाय नियमित सायकल चालवण्यामुळे मधुमेह नियंत्रणातदेखील येऊ शकतो

हाडांसाठी उपयुक्त (Good For Bones)

सायकल चालवण्यामुळे तुमच्या हाडांना चांगला व्यायाम मिळतो. सायकलिंग हा एक लो इम्पॅक्ट व्यायाम प्रकार आहे. ज्यामुळे तो धावण्यासारख्या हाय इम्पॅक्ट एरोबिक व्यायामापेक्षा करणं सहज आणि सोपं आहे. शिवाय त्याचा तुमच्या शरीरातील हाडांची वाढ आणि विकासावर याचा योग्य परिणाम होतो. यासाठी लहान मुलांनी सायकल चालवण्यामुळे त्यांची उंची वाढण्यास मदत होते.

मानसिक आरोग्य सुधारते (Cycling Improves Mental Health)

व्यायामाचा तुमच्या शरीराप्रमाणे मनावरही चांगला परिणाम होतो याचे अनेक दाखले मिळू शकतात. कारण व्यायामामुळे तुमच्या मेंदूचे कार्य सुरळीत होण्यास मदत होते. योग्य प्रमाणात शारीरिक हालचाल झाल्यामुळे शरीरातील हॉर्मोन्स संतुलित राहातात. ज्यामुळे तुमचा मूड सुधारतो आणि तुम्हाला फ्रेश वाटू लागते. यासाठीच नैराश्य अथवा मनाने थकलेल्या लोकांनीही सायकल चालवण्याचा व्यायाम करायला हवा. सायकल चालवण्याचे फायदे अनेक आहेत मात्र त्यातील  हा एक महत्त्वाचा फायदा आहे. 

सांध्याची लवचिकता वाढते (Improved Joint Mobility)

सायकल चालवण्याचा हाडांप्रमाणेच तुमच्या सांध्यावरही चांगला परिणाम होतो. आधी सांगितल्याप्रमाणे सायकल हा एक लो इम्पॅक्ट व्यायाम प्रकार असल्यामुळे त्यामुळे तुमच्या सांध्यावर अतिरिक्त ताण येत नाही. ज्यामुळे व्यायामाचा ताण तुमच्या सांध्यांना पेलवता येतो. मांड्या, गुडघे आणि पावलांच्या सांध्यांना यामुळे योग्य व्यायाम मिळतो. सांध्यांमधील वंगण कार्यरत झाल्यामुळे सांधेदुखी कमी होते. 

Instagram

फुफ्फुसांचे आरोग्य सुधारते (Better Lung Health)

नुकत्याच करण्यात आलेल्या काही संशोधनात असं आढळलं आहे की कारने प्रवास करणाऱ्या लोकांपेक्षा सायकलने प्रवास करणाऱ्या लोकांचे आरोग्य जास्त चांगले असते. कारण सायकल चालवणाऱ्या लोकांना निसर्गातील शुद्ध हवेचा पूरवठा होतो. ज्यामुळे त्यांची फुफ्फुसे अधिक चांगल्या पद्धतीने कार्यरत होतात. याउलट कारने होणाऱ्या प्रदूषणामुळे फुफ्फुसांवर विपरित परिणाम होतो. 

सायकलिंगमुळे तुमचे नेव्हिगेशनल स्कील सुधारते (Cycling Improves Navigational Skills)

अत्याधुनिक कार आणि गुगल मॅपमधून तुम्हाला जे मिळू शकत नाही ते तुम्हाला तुमचा सायकलिंगचा छंद देऊ शकते. सायकलिंग केल्यामुळे तुमचे नेव्हिगेशनल स्कील आपोआप सुधारते. सतत सायकल चालवण्यामुळे तुम्हाला तुम्ही प्रवास करत असलेले रस्ते, गल्ला पाठ होतात. निसर्ग वेड्या आणि भटक्या लोकांसाठी हे एक फार महत्त्वाचे कौशल्य असू शकते. 

सेक्स लाईफ सुधारण्यास प्रोत्साहन मिळते (Improves Sex Life)

सेक्स आणि सेक्सचे आरोग्यावर होणरे फायदे आपल्याला माहीत असतील. पण असं असूनही अनेकांना नियमित सेक्स करण्याचा कंटाळा येत असतो. सेक्सबाबत आलेली ही उदासिनता कमी करण्यासाठी तुमच्यातील उत्साह वाढवण्यासाठी सायकल चालवण्याचा फायदा नक्कीच होऊ शकतो. यासाठी तुमच्या पार्टनरसोबत सायकलिंग करण्याचा सराव करा ज्यामुळे तुमचे सेक्सलाईफ सुधारण्यास नक्कीच मदत होईल. 

Instagram

सायकल चालवण्याचे दुष्परिणाम (Side Effects Of Cycling In Marathi)

सायकल चालवण्याचे फायदे जसे अनेक आहेत तसे त्याचे काही दुष्परिणामदेखील आहेत. अती प्रमाणात आणि लांब पल्ल्यासाठी सायकल चालवण्यामुळे तुमच्या शरीरावर दुष्पपरिणाम होऊ शकतात. मुळात शारीरिक क्षमतेपेक्षा अधिक वेळ सायकल चालवण्यामुळे अशक्तपणामुळे अपघात होण्याची शक्यता अधिक वाढते. यासाठीच शहर असो वा ग्रामीण भाग अती लांब पल्ल्यासाठी सायकलवरून प्रवास करू नका. शिवाय सायकल चालवताना ट्राफिकचे सर्व नियम फॉलो करा. सुरक्षेसाठी हेल्मेट आणि इतर साधनांचा अवश्य वापर करा. सायकल चालवताना योग्य असेच कपडे परिधान करा. अती प्रमाणात आणि प्रखर सुर्यप्रकाशात सायकल चालवण्यामुळे तुमच्या त्वचेवर दुषपरिणाम होऊ शकतो. शिवाय सुर्यप्रकाश सहन न झाल्यामुळे तुम्हाला चक्कर येणे अथवा डिहाड्रेशन होण्याची शक्यता असते. प्रदूषण असलेल्या ठिकाणी बराच वेळ सायकल चालवण्यामुळे तुम्हाला श्वसनाच्या समस्या निर्माण होऊ शकतात. 

Instagram

सायकल चालवण्याचे फायदे याबाबत मनात असेलेले निवडक प्रश्न – FAQ’s

1. खडबडीत आणि खड्डे असलेल्या रस्त्यावरून सायकल चालवणे कठीण का असते ?

सायकल चालवण्यासाठी सायकल ट्रक अथवा चांगल्या रस्त्याचा वापरच करावा. कारण खडबडीत अथवा खड्डे असलेल्या रस्त्यावरून सायकल चालवण्यामुळे तुमच्या शरीराला दुखापत होऊ शकते.

2. एखादी व्यक्ती नॉन-स्टॉप किती अंतर सायकल चालवू शकते ?

नॉन स्टॉप सायकल चालवण्याचा रेकॉर्ड अनेकांनी मोडलेला आहे. त्यानुसार आतापर्यंत दोन हजार सातशे शहात्तर किलोमीटरचे पाच दिवस अठरा तास आणि तीन मिनीटे नॉन स्टॉप सायकल चालवत केलेल्या रेकॉर्डची नोंद आहे. 

3. सायकल चालवणं ह्रदयविकार असलेल्या लोकांसाठी योग्य आहे का?

सायकल हा एक एरोबिक एक्सरसाईज असल्यामुळे सायकल चालवणे ह्रदय विकाराच्या रूग्णांसाठी योग्य असते. कारण यामुळे त्यांच्या ह्रदयाला व्यायाम मिळतो. मात्र हे प्रत्येक रूग्ण आणि त्याच्या शारीरिक स्थितीवर अवलंबून असते. कारण अशा परिस्थितीत ह्रदयावर अती ताण येणार नाही याची काळजी घेणं गरजेचं आहे. 

Read More From Fitness