Fitness

हाती जेवण जेवण्याचे फायदे करतील तुम्हाला थक्क

Dipali Naphade  |  Nov 27, 2019
हाती जेवण जेवण्याचे फायदे करतील तुम्हाला थक्क

आजकाल अनेक ठिकाणी मॅनर्स आणि इतर सगळ्या गोष्टींमुळे काटे आणि चमच्यांनी खाण्याचं प्रमाण वाढलं आहे. पण पूर्वीपासून आपण सगळे हाताने जेवत आलो आहोत. आताही बऱ्याच ठिकाणी घरी हातानेच जेवलं जातं. त्याची काही महत्वाची कारणं आणि फायदे आहेत. तुमच्या रोजच्या आयुष्यात तुम्ही ही गोष्ट अंगिकारली तर तुमच्या शरीराला त्याचा नक्की फायदा होईल. हाताने जेवायला लाज वाटायची अजिबातच गरज नाही. तुमच्या शरीराला त्यामुळे फायदा होणार असतो हे नक्की लक्षात ठेवा. आधुनिकीकरणामुळे आपल्या बऱ्याचशा परंपरा या हल्ली गायब होत आहेत असं म्हटलं जातं. पण यापैकी काही परंपरांना शास्त्र आहे आणि त्यामुळेच त्या पाळायला हव्यात असंही म्हटलं जातं. अगदी डॉक्टरही बऱ्याचदा आपल्याला जेवण हे हाताने जेवण्याचा सल्ला देतात. आमटी, कढी यासारखे पदार्थ आपण हाताने खाऊ शकत नाही. पण ताटात वाढलेले अन्य पदार्थ आपण नक्कीच हाताने मोडून खाऊ शकतो. पाहूया नक्की काय आहेत याचे फायदे – 

1. वजन होतं कमी

तुमचं वजन जास्त असेल तर तुम्ही नक्की हा प्रयोग करून पाहा. काट्याचमच्याने खाण्याऐवजी तुम्ही हाताने जेवणं सुरू करा. आयुर्वेदानुससार, जेव्हा तुम्ही जेवणाचा घास घेण्यासाठी बोटं एकमेकांच्या जवळ आणता तेव्हा त्याची योगिक मुद्रा तयार होते. ही मुद्रा तुमचे सेन्सरी ऑर्गन्स अॅक्टिव्हेट करण्यासाठी उपयोगी ठरते. तुमची बोटं ही पाच तत्वांचं रूप असते असं म्हटलं जातं. बोटाचा अंगठा आकाश, तर्जनी अर्थात पहिलं बोट हे हवा, मध्यमा अर्थात मधलंं बोट हे आग, अनामिका अर्थात रिंग फिंगर हे पाणी आणि सर्वात लहान बोट अर्थात करंगळी हे जमिनीचं प्रतिनिधित्व करत असतं. त्यामुळे तुम्ही हाताने जेवल्याने तुमच्या शरीरावर चांगले परिणाम होतात. 

लठ्ठपणा कमी करण्यासाठी प्या तांब्याच्या भांड्यातून पाणी

2. पचनक्रिया होते चांगली

Shutterstock

तुम्ही जेव्हा तुमच्या हाताने जेवता तेव्हा तुमची बोटं त्या खाण्याला लागतात. त्या खाण्याचं टेक्स्चर, स्वाद या सगळ्याची तुम्हाला जास्त जाण होते. तसंच तुम्ही जेव्हा हाताने जेवता तेव्हा तुमच्या मेंदूमध्ये सिग्नल अधिक जलदगतीने मिळतो. त्यामुळे तुमच्या शरीरातील पचनक्रिया योग्य प्रकारे होते. तुमची पचनक्रिया अधिक चांगली होण्यासाठी तुम्ही हाती जेवायला हवं. तसंच हाताने जेवल्यामुळे प्रत्येक पदार्थाची चव ही तुम्हाला जिभेवर पटकन कळते. 

मातीच्या भांड्यात शिजवा जेवण आणि मिळतील आरोग्याला फायदे

3. वजन कमी होऊन स्वाद अधिक मिळतो

जेव्हा तुम्ही चमच्याने खाता तेव्हा हाताच्या बोटांना व्यायाम जास्त प्रमाणात मिळत नाही. तसंच चमच्याने खाता तेव्हा तुम्ही अधिक जलद गतीने खाता. पण हाताने खाताना तुमचा वेग साहजिकच कमी होतो तसंच तुमचं पोट लवकर भरतं. चमच्याने खाताना पोट भरण्याचं समाधान पटकन मिळत नाही. त्यामुळे आपल्या शरीराला आवश्यक असतं त्यापेक्षा अधिक खाणं शरीरात जातं. पण हाताने खाल्ल्यानंतर पोटाचा अंदाज पटकन येतो. तसंच जेवणाचं समाधानही मिळतं. त्यामुळे तुमचं वजन कमी होण्यासाठी फायदा होतो. वजन नियंत्रणात राहातं. तसंच जेवणाचा उत्तम स्वादही अधिक मिळतो. 

वजन कमी करण्यासाठी जमिनीवर बसून जेवणे ठरेल फायदेशीर

4. इन्फेक्शनपासून होते सुटका

Shutterstock

सहसा चमचा घेऊन खाताना आपण पहिले धुवून घेत नाही. पण हाताने खात असतो तेव्हा कायम हात धुवूनच जेवायला बसतो. त्यामुळे चमच्यावर असलेले किटाणू अथवा अन्य गोष्टींमुळे कोणत्याही प्रकारचं इन्फेक्शन होण्याचा धोका असतो. पण हाताने खाताना आपण अधिक काळजी घेतो. त्यामुळे इन्फेक्शनचा धोकाही टळतो. त्याशिवाय तुमच्या हातांना व्यायामाचीही सवय लागते. सहसा हाताने खाण्याची सवय स्वतःला लावून घ्यावी. तुम्हाला जर काहीच पर्याय नसेल तर तुम्ही काटा आणि चमच्याचा वापर करा. पण जिथे जमत असेल तिथे तुम्ही हातानेच खाण्याचा प्रयत्न करा. 

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop’s मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत.

मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.

Read More From Fitness