आरोग्य

जाणून घ्या जास्वंदाच्या तेलाचे हे आश्चर्यकारक फायदे

Leenal Gawade  |  Aug 30, 2021
जास्वंदाच्या तेलाचे फायदे

आयुर्वेदात जास्वंद हे फारच फायद्याचे आणि बहुगुणी मानले जाते.  जास्वंदाचा उपयोग वेगवेगळया कारणासाठी केला जातो.  केसांसाठी आणि त्वचेसाठी जास्वंद हे फारच उपयोगाचे असते. पण इतकेच नाही तर आरोग्यासाठीही जास्वंदाचे तेल हे अनेक कारणासाठी फायदेशीर असते. जास्वंदापासून काढलेले तेल हे शुद्ध असेल तर त्याचा उपयोग नेमका कसा करायचा  ते जाणून घेण्यासाठी माहीत करुन घेऊया

जास्वंदाच्या तेलातील घटक

जास्वंदाचे तेल हे फारच बहुगुणी असते. जास्वंदाच्या तेलामध्ये व्हिटॅमिन C,  आर्यन, प्रोटीन असते जे आरोग्यासाठी फार फायदेशीर ठरते. जास्वंदाच्या पाकळ्या, त्याची पाने, त्याचे पू केशर हे सगळेच वापरले जाते. हल्ली जास्वंदाच्या फुलाचे फेसपॅक, हेअरमास्क, हेअर ऑईल आणि हर्बल टी बनवली जाते. ज्यामुळे आरोग्य चांगले राहण्यास मदत मिळते. 

ब्लो ड्रायर शिवाय असे कोरडे करा केस, दिसतील चमकदार

जाणून घेऊया जास्वंदाच्या तेलाचे फायदे

आज आपण जास्वंदाच्या तेलाचे नेमके फायदे काय आहेत ते जाणून घेणार आहोत. जास्वंदाचे तेल नुसते केसांसाठीच नाही तर अन्य कारणांसाठीही चांगले असते. त्यामुळे त्याचे फायदे काय ते जाणून घेऊया. 

  1. जास्वंदाचे तेल हे जास्त करुन केसांसाठी वापरले जाते. केसांची मूळ बळकट करण्यासाठी फायद्याचे ठरते. जास्वंदाचे तेल गरम करुन ते केसांना लावावे त्यामुळे केस छान होतात. 
  2. जर तुमची त्वचा कोरडी असेल तर तुम्ही अगदी थोडेसे जास्वंदाचे तेल घेऊन तुम्ही त्याचा मसाज करा. त्यामुळे तुमची त्वचा अधिक चांगला होण्यास मदत मिळेल. 
  3. निद्रानाशाचा त्रास असेल अशांनी जास्वंदीच्या तेलाचा उपयोग करावा.अशांनी डोक्यावर थोडेसे लावावेे.तुम्हाला नक्कीच चांगली झोप मिळण्यास मदत मिळेल.
  4.  जर तुम्हाला अंगदुखी होत असेल तरी देखील तुम्ही जास्वंदीचे तेल सांध्यांना लावून मालिश करु शकता. त्यामुळे नक्कीच तुम्हाला आराम मिळेल. 
  5. बाजारात जास्वंदाची पावडर मिळते. जिच्या सेवनामुळे मासिक पाळीची समस्याही बरी होण्यास मदत मिळते. 
  6. जास्वंदाचा अर्क काढून त्याचा चहा तयार केला जातो. जो पोटोसाठी चांगला असतो.
  7. त्वचा एक्सफोलिएट करायची असेल तर तुम्ही जास्वंदाचे तेल, मुलतानी माती, गुलाबजल एकत्र करुन त्याचा पॅक चेहऱ्याला लावा म्हणजे चेहऱ्यावरील पोअर्स स्वच्छ करण्यास मदत होईल.

असे बनवा जास्वंदाचे तेल

जास्वंदाचे तेल हे घरी बनवण्याची पद्धत एकदम सोपी आहे. जास्वंदाचे फूल आणून तुम्ही नारळाचे तेल आणून त्यामध्ये फुलं उकळा आणि तेल गाळून तुम्ही ते तेल थंड करुन वापरायला घ्या.

अशाप्रकारे जास्वंदाच्या तेलाचा वापर करा.

पिंपल्स कमी करण्यासाठी वापरा तुतीची पाने, जाणून घ्या फायदे

Read More From आरोग्य