Care

सुंदर आणि काळेभोर केस हवे असतील तर असा करा मधाचा वापर

Trupti Paradkar  |  May 27, 2019
सुंदर आणि काळेभोर केस हवे असतील तर असा करा मधाचा वापर

गळणारे केस, कोरडे आणि फ्रिझी केस, पांढरे केस आणि कोंडा अशा केसांच्या समस्यांनी त्रासला आहात का? केसांच्या समस्यांवर अनेक उपाय करून थकला असाल तर या घरगुती उपायांनी तुम्हाला नक्कीच फायदा होईल. तुमच्या घरात असलेलं नैसर्गिक मध तुमच्या केसांच्या आरोग्यासाठी फार उपयुक्त ठरू शकेल. केसांचं हरवलेलं सौदर्य पुन्हा परत मिळविण्यासाठी मधाचा असा वापर करा. ज्यामुळे तुम्हाला सुंदर आणि काळेभोर केस पुन्हा मिळू शकतील.

केसांची वाढ

मध हे एक नैसर्गिक अॅंटी ऑक्सिडंट आहे. ज्यामुळे तुमच्या केसांची त्वचा मजबूत आणि स्वच्छ होते. केसांची मुळं  आणि त्वचा स्वच्छ असेल तर केस आपोआप मजबूत होतात. यासाठी दोन चमचे मधामध्ये एक चमचा पुदिन्याचे तेल आणि नारळाचे तेल मिसळा. या मिश्रणाचा  एक हेअरमास्क तयार करा आणि केसांना लावा. काही मिनीटांनी केस थंड पाण्याने स्वच्छ धुवून टाका. लिबांच्या पाण्याने केस धुवून तुम्ही केसांना नैसर्गिक पद्धतीने कंडीश्नर करू शकता.

नैसर्गिक पद्धतीने केसांना हायलाईट करण्यासाठी

केसांना त्रासदायक केमिकल्स न वापरता तुम्ही नैसर्गिक पद्धतीने हायलाईट करू शकता. मधामध्ये असे काही घटक असतात ज्यामुळे तुमचे केस नैसर्गिक पद्धतीने हायलाईट होऊ शकतात. केसांना नैसर्गिक रंग आणि चमक देण्यासाठी तुम्हाला मध नक्कीच उपयोगी पडू शकते. यासाठी  चार चमचे मधामध्ये एक चमचा पाणी टाका. काही मिनीटे हे मिश्रण तसेच ठेवा. केसांवर हे मिश्रण लावून वीस मिनीटे तसेच ठेवा. वीस मिनीटांनी केस स्वच्छ धुवा आणि केसांना कंडिश्नर करा. जर आणखी गडद रंग हवा असेल तर या मिश्रणामध्ये लिंबू पिळा. जर लालसर छटा हव्या असतील तर या मिश्रणामध्ये दालचिनी मिसळा

केस मऊ करण्यासाठी

मध हे एक नैसर्गिक सॉफ्टनर आहे. ज्यामुळे केसांचा कोरडेपणा कमी होतो. शिवाय मधात गोडाचे प्रमाण अधिक असल्यामुळे केस मजबूतदेखील होतात. यासाठी वर्जिन ऑलिव्ह ऑईलमध्ये शुद्ध मध मिसळून मिश्रण थोडं कोमट करा. स्वच्छ केसांवर हे मिश्रण लावा. केसांवर 30 मिनीटे शॉवर कॅप लावून ठेवा. केसांना शॅंपू करा आणि केस स्वच्छ करा.

कोंंडा कमी करण्यासाठी

मधामध्ये अॅंटी बॅक्टेरिअल गुणधर्म असतात. ज्यामुळे केसांची जंतूसंसर्गापासून सुटका होते. केसांवर मध लावल्यामुळे कोंडा कमी होतो आणि डोक्यात खाज येत नाही. यासाठी मधात थोडं पाणी मिसळून ते केसांवर लावा. तीस मिनीटे केसांवर कॅप लावा आणि केस नंतर धुवून टाका. केस धुण्यासाठी शॅम्पू वापरू नका.

केस चमकदार करण्यासाठी

मधामुळे केस चमकदार होतात. जर तुमचे केस कोरडे आणि निस्तेज झाले असतील तर हा उपाय तुमच्यासाठी नक्कीच उपयुक्त आहे. यासाठी दोन कप पाण्यामध्ये  पाच मोठे चमचे मध मिसळा. शॉवर कॅप लावून तीस मिनीटांनी केस धुवून टाका.

मधाचा अशा प्रकारे वापर करून तुम्हाला तुमच्या केसांमध्ये आश्चर्यकारक बदल दिसू लागतील.

केस धुताना करू नका या ‘7’ चुका

केस आणि त्वचेच्या सौंदर्यासाठी दही आहे उपयुक्त

डोळ्यांखाली झालेल्या काळ्या वर्तुळांपासून सुटका देईल मध

लिंबू आणि मधाचा वापर करून मिळवा फायदा

फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम

Read More From Care