Recipes

आरोग्यदायी पंचामृत सेवनाचे फायदे (Panchamrut Benefits In Marathi)

Aaditi Datar  |  Sep 5, 2019
आरोग्यदायी पंचामृत सेवनाचे फायदे (Panchamrut Benefits In Marathi)

आपल्याकडे सणासुदीला पूजेच्या निमित्ताने हमखास पंचामृत बनवलं जातं. पंचामृतालाच चरणामृत असंही म्हटलं जातं. पूजेदरम्यान पंचामृत देवाला दाखवून मग ते प्रसाद म्हणून दिलं जातं. पंचामृत म्हणजे पाच प्रकारच्या अमृताचं मिश्रण होय. प्राचीन काळापासून आपल्याकडे पंचामृताचं चलन आहे. जे आजही कायम आहे. पण तुम्हाला माहीत आहे का पंचामृताचे शरीरासाठी असणारे अनेक फायदे. चला जाणून घेऊया.

Instagram

पंचामृताचे आहेत अनेक फायदे (Panchamrut Benefits In Marathi)

पंचामृत हे फक्त प्रसाद म्हणूनच नाहीतर याचे अनेक आरोग्यदायी फायदेही आहेत. पाहा कोणते आहेत ते फायदे. 

केसांना देतं पोषण (Nourishment To Hair)

पंचामृत हे केसांसाठी फारच पोषक आहे. यामुळे आपल्याला सप्त धातूचं पोषण मिळतं. ज्यामुळे केस होतात निरोगी आणि चमकदार. तसंच वेगाने वाढतातही.

मस्तिष्कासाठी फायदेशीर (Beneficial To The Brain)

पंचामृताचं सेवन आपण मुख्यतः पूजेच्या वेळी करतो. पण पंचामृताचं सेवन नियमितपणे केल्यास बुद्धी तल्लख होते आणि स्मरणशक्तीही वाढते. गर्भावस्थेदरम्यान याचं सेवन केल्यास मुलाच्या मस्तिष्क विकासास चालना मिळते.

निरोगी त्वचेसाठी (Healthy Skin)

पंचामृत हे तुमच्या त्वचेसाठी एखाद्या क्लिंजरप्रमाणे काम करते. पंचामृताच्या सेवनाने तुमची त्वचा निरोगी राहते आणि स्कीन सेल्सच्या विकासालाही मदत मिळते. त्यामुळे त्वचेवर आपोआपच ग्लो येतो.

पित्तशामक (Gallbladder)

पंचामृत आपल्या शरीरातील पित्ताला संतुलित ठेवतं. त्यामुळे याच्या सेवनाने हायपर एसिडीटी आणि पित्ताचं असंतुलन टाळता येतं.

पाचक आहे पंचामृत (Good For Digestive System)

पंचामृतात दही असतं जे पचनक्रियेसाठी उत्तम असतं. त्यामुळे ज्यांना पचनाचा त्रास असेल त्यांनी पंचामृताचं सेवन नक्की करावं.

पंचामृत कसे बनवावे (How To Make Panchamrut In Marathi)

Instagram

पंचामृत म्हणजे पाच घटकांचं मिश्रण आहे. ज्यामध्ये दूध, दही, मध, साखर आणि तूप यांचं मिश्रण बनवलं जातं. पंचामृतामध्ये सप्त धातू आढळतात जे आपल्या शरीराला पोषण देण्याची क्षमता राखतात. पंचामृत बनवणं खूपच सोपं आहे. 

पंचामृत बनवण्यासाठी लागणारं साहित्य पुढीलप्रमाणे – 

चार चमचे दही

दो चमचे तूप 

एक कप दूध

एक चमचा साखर 

एक चमचा दही 

माती, स्टील किंवा काचेचं स्वच्छ भांड घ्यावं. त्यामध्ये वरील साहित्य मिक्स करावं. ते चांगल मिक्स करून नंतर त्यात तुळशीच पान घालावं. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही यात सुकामेवाही घालू शकता. तयार आहे तुमचं पंचामृत. 

पंचामृत बनवाताना घ्या या गोष्टींची काळजी (Things To Take Care Of While Making Panchamrut)

Instagram

– नेहमी ताजं बनवलेलं पंचामृतच प्यावं. कारण हे काही काळच चांगलं राहतं.

– पंचामृतात दही घातलं जातं जे काही काळाने आंबट होतं त्यामुळे याचा वासही बदलतो. त्यामुळे पंचामृत जास्त वेळ ठेवू नये. 

– आयुर्वेदानुसार पंचामृत बनवताना तूप आणि मधाच प्रमाण सम नसावं. त्यामुळे पंचामृत बनवताना याची काळजी नक्की घ्या. 

– पंचामृत बनवण्यासाठी नेहमी स्टेनलेस स्टील, सिरेमिक किंवा काचेच्या भांड्याचा वापर करावा. पूर्वीच्या काळी पंचामृताच्या अतिरिक्त फायद्यांसाठी ते चांदीच्या वाडग्यात बनवले जात असे. 

त्यामुळे पंचामृत फक्त प्रसाद म्हणून नाहीतर दैनंदिन आहारात समाविष्ट केल्यासही तुम्हाला अनेक फायदे मिळू शकतात. 

हेही वाचा –

जाणून घ्या घरातील देवपूजेची भांडी स्वच्छ करण्याची योग्य पद्धत

बाप्पाचा नेवैद्य असतो खास, कसे वाढावे ताट

Bappa ला प्रसन्न करण्यासाठी राशीनुसार दाखवा हा नेवैद्य

Read More From Recipes