Mythology

शिवाला प्रिय अशा ‘रुद्राक्ष’ घालण्याचे फायदे

Leenal Gawade  |  Mar 11, 2021
शिवाला प्रिय अशा ‘रुद्राक्ष’  घालण्याचे फायदे

आज महाशिवरात्रीचा दिवस. भगवान शंकराला प्रिय असलेल्या गोष्टींपैकी एक म्हणजे ‘रुद्राक्ष’  हिंदू धर्मात रुद्राक्षाला जास्त महत्व आहे म्हणूनच  रुद्राक्षाची पूजा करण्याची पद्धत हिंदू धर्मात आहे. रुद्राक्ष हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात. एकमुखी, द्विमुखी असलेले हे रुद्राक्ष झाडाची बी असून ती साधारण लालसर- चॉकलेटी रंगाची असते. अनेक जण लाभासाठी आणि समाधानासाठी परिधान करतात.रुद्राक्षाचे नेमके काय फायदे आहेत ते जाणून घेऊया. त्यानुसार तुम्ही रुद्राक्ष परिधान करायचे की नाही ते तेही तुम्हाला कळेल.

जाणून घ्या महाशिवरात्रीचा महिमा

असा तयार झाला रुद्राक्ष

Instagram

रुद्राक्ष ही एक झाडाची बी असली तरी देखील त्यासंदर्भात एक आख्यायिका सांगितली जाते ती अशी की, एकदा भगवान शंकर जनकल्याणासाठी तपश्चर्या करत बसले होते.  त्यावेळी त्यांना अचानक अतीव दु:ख झाले होते. त्यावेळी त्यांच्या डोळ्यातून पाणी आले. ते पाणी जमिनीवर पडले त्यावेळी त्याच्यापासून रुद्राक्षाचे झाड तयार झाले. त्याला लागलेले रुद्राक्ष हे म्हणूनच पवित्र मानले जाते. 

महाशिवरात्रीनिमित्त भगवान शंकरावर आधारित बॉलीवूड गाणी

रुदाक्ष घालण्याचे फायदे

 रुद्राक्ष हे अनेक मुखी असतात. या मुखानुसार त्याचे फायदे हे ठरतात. जर तुम्ही रुदाक्ष घालण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला या गोष्टी माहीत असायला हव्यात. 

एकमुखी : शंकराची कृपा तुमच्यावर सतत राहावी असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही एकमुखी रुद्राक्ष  वापरायला हवे. एकमुखी रुद्राक्ष हे शंकराचे रुप मानले जाते. एकमुखी रुद्राक्ष हे घालणे फायद्याचे ठरते.

द्विमुखी : शंकर आणि पार्वतीचे मेळ म्हणजे द्विमुखी रुद्राक्ष…  जर तुम्हाला सुखी संसार हवा असेल तर तुम्ही हे रुद्राक्ष परिधान करा. 

त्रिमुखी: असं म्हणतात स्त्री हत्येच्या पापातून मुक्ती मिळवण्यासाठी हे रुद्राक्ष परिधान केले जाते. या शिवाय आत्मविश्वास वाढण्यासाठीही हे रुद्राक्ष घालतात

चारमुखी:   रोगांना दूर ठेवून निरोगी आयुष्य जगण्यासाठी चारमुखी रुद्राक्ष घातले जाते. 

 

Instagram

पंचमुखी : अपराधातून मुक्तता मिळवण्यासाठी आणि आयुष्यात आनंदी आनंद आणण्यासाठी पंचमुखी रुद्राक्ष घातले जाते.

 

सहामुखी: हे रुद्राक्ष कार्तिकेयचे रुप मानले जाते. एकाग्रता वाढवण्यासाठी हा रुद्राक्ष परिधान केला जातो.

सप्तमुखी:  उत्पन्नात वाढ होण्यासाठी सप्तमुखी रुद्राक्ष घातले जाते. माता लक्ष्मीची कृपा या रुद्राक्षाचे परिधान केल्यामुळे राहते.

 

अष्टमुखी: अकाल मृत्यूची भीती मनातून काढण्यासाठी भगवान शंकराची कृपादृष्टि राहण्यासाठी हे रुद्राक्ष फारच फायद्याचे ठरते.

नऊमुखी:  नवदुर्गेचे रुप म्हणून हे रुद्राक्ष फारच महत्वाचे असते. प्रसिद्धी,वृद्धी मिळवण्यासाठी नऊमुखी रुद्राक्ष घातले जाते.

दशमुखी: दशमुखी रुद्राक्ष हे भगवान विष्णूचे रुप मानले जाते.विष्णू कृपा राहावी असे वाटत असेल तर तुम्ही हे रुदाक्ष परिधान करा.

अकरामुखी:  शंकराची कृपादृष्टि कायम राहावी असे वाटत असेल तर तुमच्यासाठी अकरामुखी लाभदायक आहे. 

बारामुखी: इच्छित फळाची प्राप्ती करण्याचा विचार तर तुमच्यासाठी बारामुखी रुद्राक्ष घालायला हवा.

 

तेरामुखी: भोगप्राप्तीची इच्छा असेल तर हा रुद्राक्ष तुम्ही घालायला हवा.

चौदामुखी:  मोह, माय, लालसा यासगळ्यापासून दूर राहायचे असेल तर तुम्ही चौदामुखी रुद्राक्ष परिधान करायला काहीच हरकत नाही.

 

रुद्राक्ष हे खरे असले तर त्याचा फायदा मिळतो. हल्ली अनेक ठिकाणी खोटे रुद्राक्ष मिळतात. त्यामुळे ते नीट तपासून घ्या

 

महाशिवरात्रीच्या महापर्वासाठी खास शुभेच्छा (Mahashivratri Wishes In Marathi)

Read More From Mythology