Mythology

स्वामी समर्थ कोट्स (Swami Samarth Quotes In Marathi)

Dipali Naphade  |  Mar 11, 2022
swami-samarth-quotes-in-marathi

‘भिऊ नकोस मी तुझ्या पाठिशी आहे’ हे वाक्य वाचलं आणि ऐकलं तरीही स्वामी समर्थांची मूर्ती डोळ्यासमोर उभी राहते. श्री दत्तगुरूंंचा अवतार मानण्यात येणाऱ्या स्वामी समर्थांचे अनेक भक्त आहेत. कर्म करत राहायचे त्याचे फळ कधी ना कधी तरी मिळतेच हे मानत स्वामींची भक्ती करण्यात लीन होणारे भक्त नेहमीच संकटातून तरतात असा विश्वास भक्तांना आहे. कितीही संकट आली तरीही स्वामींचे नामस्मरण केल्यानंतर आणि स्वामींनी सांगितलेले जीवनाचे सार लक्षात घेऊन वागल्याने नक्कीच जीवनाचे सार्थक होते असे मानण्यात येते. स्वामी समर्थांची अगाध महिमा आणि त्यांच्या अवतारामध्ये त्यांनी केलेले कार्य हे अफाट आहे. जीवनाचे सार समजून देणारे स्वामी समर्थांचे कोट्स (Swami Samarth Quotes In Marathi) खास तुमच्यासाठी. स्वामींचे हे विचार भक्तांच्या समस्यांचे निवारण करतात. असेच सदैव आपल्या पाठीशी ठामपणे असणाऱ्या स्वामींचे आपल्या जीवनासाठी प्रेरणादायी ठरणारे कोट्स आपण पाहूया. 

स्वामी समर्थ कोट्स मराठीत (Swami Samarth Quotes In Marathi)

Swami Samarth Quotes In Marathi

रोजच्या जगण्यात आपण कसेही जगतो. पण आपल्या आयुष्यात काय बरोबर आणि काय चूक आहे या गोष्टी आपण ठरवणे अत्यंत गरजेचे आहे. स्वामी समर्थांचे विचार आपल्याला प्रेरणा देणारे आणि सकारात्मक उर्जा देणारे ठरतात. असेच काही कोट्स (Swami Samarth Quotes in Marathi) आपल्यासाठी. 

1. उगाची भितोसी भय हे पळू दे, जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे, जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा

2. यशस्वी होण्याचा एकच उत्तम पर्याय आहे, दुसऱ्याचं भलं झालेले पाहण्याची ताकद आपल्या मनात असली पाहिजे

3. जो असे कारण सर्व सृष्टीशी अकारणे जो लावी भक्तीसी भुलवी मनाच्या दंभ युक्तीसी असा अविनाशी स्वामी माझा

4. विश्वास ठेव जिथे संपते मर्यादा तुझी, तिथून साथ देतो मी

5. जाणीव ठेव शुद्ध मनासी काय व्यर्थ बरळतो कशाची असो भूक त्यासी? तू पुढे काय ठेवितो

6. तुझ्या अंतरात्म्यात आहे मी तुला हरू देणार नाही, या कलियुगात तुला एकटे सोडणार नाही, जी झुंझ तू खेळतो आहेस मनासी त्यात तुला मार्ग दाखवत असणार मी. भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे.

7. ऐहिक जीवनाचे नश्वर स्वरूप जाणावे, निष्काम कर्म करावे – श्री स्वामी समर्थ 

8.  मोठा अधिकार, संपत्ती यांचा चिरकाल भरवसा मानू नये – श्री स्वामी समर्थ जय जय रघुवीर समर्थ

9. भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे

10. अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात. ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल – श्री स्वामी समर्थ जय जय रघुवीर समर्थ

11. खूप अडचणी आहेत जीवनात परंतु त्यांना समोर जाण्याची शक्ती फक्त तुमच्यामुळे येते

12. तू कोणाला फसवू नकोस. मी आहे तुझ्या पाठीशी तुझी फसवणूक होऊ देणार नाही

13. कोणत्याही साकारात्मात विचारांना कोणतेही विष मारू शकत नाही आणि कोणत्याही नकारात्मक विचारांना कोणतेही औषध वाचवू शकत नाही.

14. प्राण गेला तरीही दुस-या जीवाची हिंसा करू नये

15. ध्येय साध्य करणे कितीही कठीण असो, पण जर आत्मविश्वास असेल तर अशक्य असे काहीच नाही – श्री स्वामी समर्थ 

16. वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका. पण ज्यांनी वाईट वेळेत साथ देऊन चांगली वेळ आणून दिली त्यांचे मोल कधी विसरू नका – स्वामी समर्थ 

17. जर माझे नाव तुझ्या ओठाशी आहे तर घाबरतो कशाला मी सदैव तुझ्या पाठिशी आहे – श्री स्वामी समर्थ 

18. मी आहे ना तुझ्या पाठिशी –  स्वामी समर्थ 

19. शुद्ध अंतःकरण ठेऊन नाम घेतले तर भगवंताच्या कृपेचा अनुभव येईल. नामानेच अंतरंग शुद्ध बनते – स्वामी  

20. नामानेच मन अंतरंगात प्रवेश करून स्थिर बनते. नामाने काळजी वाटणे नाहीसे होते. मग तळमळही आपोआप जाते – श्री स्वामी समर्थ 

वाचा – सेवा निवृत्तीच्या शुभेच्छा

स्वामी समर्थ सुविचार मराठीत (Swami Samarth Suvichar In Marathi)

Swami Samarth Suvichar in Marathi

माणूस विचार करतच असतो. पण ते विचार चांगले असावेत आणि त्याची दिशा चांगली असावी हे महत्त्वाचे. थोर व्यक्तींचे विचार हे आपल्या जगण्याला एकप्रकारे दिशाच देत असतात. स्वामींना गुरूस्थानी मानणारे अनेक आहेत. त्यामुळे दरवर्षी गुरूपौर्णिमेला शुभेच्छा देताना स्वामींचे सुविचार आवर्जून वाचले जातात. असेच स्वामी समर्थांचे सुविचार तुमच्यासाठी. 

1. गरिबाला केलेले दान आणि सद्गुरू स्वामींचे मुखात घेतलेले नाव कधी वाया जात नाही – श्री स्वामी समर्थ 

2. देवाला हे कधीच सांगू नका की तुमच्या अडचणी किती मोठ्या आहेत. ते अडचणींना सांगी की, तुमचा देव किती मोठा आहे – स्वामी समर्थ 

3. जेथे नाम आहे तिथे मी आहे – स्वामी 

4. नामावर प्रेम करणे म्हणजे माझ्यावर प्रेम करणे होय – स्वामी समर्थ 

5. तुम्ही नाम घेता म्हणून मी तुमच्या मागे – पुढे चालतो – श्री स्वामी समर्थ 

6. जो नुसता नामात राहीन त्याला मी अखेरपर्यंत सांभाळेन – श्री स्वामी समर्थ 

7. तू कर्म करत जा, फळाची अपेक्षा न करता. अरे कर्म करणे हे तुझे कर्तव्य आहे आणि तुझ्या कर्माला योग्य ते फळ देणे ही माझी जबाबदारी आहे – स्वामी समर्थ 

8. संकटांना कधी कंटाळायचं नसतं त्यांना सामोरं जायचं असतं – स्वामी 

9. कोणी नावे ठेवली तर थांबायचं नसतं, आपण आपलं चांगलं काम करायचं असतं – श्री स्वामी समर्थ 

10. जीवनाच्या बँकेत पुण्याचा बॅलेन्स पुरेसा असेल तर सुखाचा चेक कधीच बाऊन्स होणार नाही – श्री स्वामी समर्थ

11. फक्त स्वतःचा विचार करणारे लोक फार थोड्या काळासाठी प्रगती करतात पण जे सगळ्यांचा विचार करतात त्यांची प्रगती कायम होत राहते – श्री स्वामी समर्थ

12. विचारांवर लक्ष ठेवा, त्याचे शब्द होतात आणि शब्दांवर लक्ष ठेवा त्या कृतीत उतरतात. कृतीवर लक्ष ठेवा त्या सबबी बनतात, सबबींवर लक्ष ठेवा त्यातून चरित्र घडते, चारित्र्यावर लक्ष ठेवा ते आपले भविष्य घडवते…श्री स्वामी समर्थ

13. तू कर मत फिक्र, जो हुआ नही, मैं करूंगा वो जो तूने सोचाही नहीं – श्री स्वामी समर्थ

14. सुख इतकेच द्या जेणेकरून अहंकार येणार नाही आणि दुःख इतकेच द्या की देवावरील आस्था उडू नये 

15. कोणाचीही त्याच्या सध्याच्या परिस्थितीवरन खिल्ली उडवू नका. कारण काळ इतका सामर्थ्यशाली आहे की तो एका सामान्य कोळशालाही हळूहळू हिरा बनवतो – श्री स्वामी समर्थ

16. मनामध्ये श्रद्धा आणि विश्वास असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही 

17. उपवास हा नेहमी अन्नाचाच का करावा? कधी कधी वाईट विचारांचाही करावा. कधीतरी उपवास अहंकाराचा करावा, कधी उपवास मीपणाचाही करावा! – श्री स्वामी समर्थ

18. तुझ्या अंतरात्म्यामध्ये आहे मी, तुला हरू देणार नाही. या कलियुगात तुला एकटे होऊ देणार नाही – श्री स्वामी समर्थ

19. जी झुंज तू खेळत आहेस मनाशी त्यात तुला मार्ग दाखवत राहणार आहे मी …भिऊ नकोस मी तुझा पाठिशी आहे – श्री स्वामी समर्थ

20. असं म्हणतात की, काळजी करणारी माणसं मिळायला भाग्य लागतं. पण अशी माणसं आपल्याला मिळाली आहेत हे समजायला जास्त भाग्य लागतं – श्री स्वामी समर्थ 

वाचा – Motivational Quotes In Marathi

स्वामी समर्थांचे विचार (Swami Samarth Thoughts In Marathi)

Swami Samarth Thoughts In Marathi

स्वामी समर्थ महाराज हे सकारात्मकतेचे आणि प्रेरणेचे भक्तांसाठी स्थान आहे. मनःशांती मिळविण्यासाठी आणि एकाग्रता आणण्यासाठी अनेक जण बऱ्याचदा स्वामींच्या मठात नामस्मरण करण्यासाठी जातात. स्वामी समर्थांचे काही विचार (swami samarth thoughts in marathi).

1. संकटं तुमच्यातली शक्ती आणि जिद्ध पाहण्यासाठीच येत असतात – श्री स्वामी समर्थ

2. दगडातून मूर्ती बनण्यासाठी दगडाला टाकीचे घाव सोसावे लागतात. तसेच आपल्यातील मानवी मूर्ती बनण्यासाठी आपल्यालाही परिस्थितीचे घाव सोसावे लागतात – श्री स्वामी समर्थ

3. तुमची खरीखुरी श्रद्धा योग्य ठिकाणी असेल तर पाषाणालाही देवत्व येते – श्री स्वामी समर्थ

4. तुमची अंधश्रद्धा असेल तर मानवी रूपातील पशुत्व त्याचा फायदा घेऊन परश्वराच्या नावाखाली तुम्हाला जाळ्यात अडकवून तुमची कटपुतळी करतो – स्वामी समर्थ 

5. जीवनात कधी दुःख आले तर आपले दुःख आणि वेदना जगाला सांगू नका – श्री स्वामी समर्थ

6. समाधानी राहा – सुखी व्हाल

7. भक्ती करा मुक्ती मिळेल – श्री स्वामी समर्थ

8. ध्यान करा ज्ञान मिळेल – स्वामी समर्थ 

9. प्रार्थना करा प्रगती होईल – श्री स्वामी समर्थ

10.  ‘मी’पणा सोडा मोठे व्हाल – स्वामी 

11. कला शिका अमर व्हाल

12. व्यवसन सोडा शांती मिळेल – श्री स्वामी समर्थ

13. सहाय्य करा सोबत मिळेल – स्वामी कृपा 

14. दान करा धन मिळेल – स्वामी समर्थ 

15. त्याग करा आत्मानंद मिळेल – श्री स्वामी समर्थ

16. श्रम करा सुख मिळेल – श्री स्वामी समर्थ

17. जिथे सर्व असमर्थ तिथे फक्त स्वामी समर्थ 

18. मी सर्वत्र आहे. मी चराचरा व्यापून आहे. मी वारा आहे, मी पाणी आहे, आकाशही मीच आहे. गाणगापुरात मीच आहे, ध्रुवावर, कैलासावर आणि गरूडावरही मीच आहे. मी कुठेही गेलेलो नाही. मी सदैव तुझ्या पाठिशी आहे – श्री स्वामी समर्थ

19. मीपणा दूर ठेऊन जा विश्वास ठेवा पदरी अपयश कधीच येणार नाही – श्री स्वामी समर्थ

20. हृदयातल्या मंदिरात अंधार असेल तर घरातल्या देव्हाऱ्यात दिवा लावून फायदा नसतो – श्री स्वामी समर्थ 

गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

स्वामी समर्थ स्टेटस मराठीत (Swami Samarth Status In Marathi)

Swami Samarth Status In Marathi

हल्ली आपण मोबाईल अथवा सोशल मीडियावर जास्त प्रमाणात असतो. अशावेळी आपल्याला बऱ्याचदा स्टेटस ठेवावा वाटतो. स्वामींचे असेच काही कोट्स जे तुम्ही स्टेटस (swami samarth status in Marathi) म्हणून वापरू शकता. 

1. निःशंक हो, निर्भय हो, प्रचंड स्वामीबळ पाठीशी, नित्य आहे रे मना। अतर्क्य अवधूत हे स्मर्तुगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी 

2. कृपापूर्ण नेत्र स्वामींचे मायेने भरलेले, भक्तांच्या भेटीसाठी दिसतात आसुसलेले
चेहऱ्यावरचं तेज पाहून भान हरपते, स्वामीचरणी मन सहज दृढ होते 

3. क्षणोक्षणी वाटे स्वामी नामाचा आधार, स्वामी संग धरता कोण राहील निराधार

4. ब्रम्हांडनायक श्री स्वामी समर्थ 

5. दुसऱ्याच्या ताटातलं हिसकावून खाण्यात एखाद्याला आपली शान वाटते. तर कुणाला आपल्या ताटातलं दुसऱ्याला भरवण्यात समाधान वाटते – श्री स्वामी समर्थ

6. विश्वास ठेव…अरे जो माझा हात पकडतो त्याला कधी कोणाचे पाय पकडण्याची गरज भासत नाही – श्री स्वामी समर्थ

7. आपल्याला दुःख देणारे जगात कमी नाहीत हे जितकं शक्य आहे तितकंच सत्य हे ही आहे की आपल्याला आईच्या मायेने जवळ घेणारे स्वामींशिवाय कोणीही नाही 

8. सूर्य बोलत नाही त्याचा प्रकाशच त्याचा परिचय देतो. त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्याबद्दल काहीच बोलू नका. उत्तम कर्म करत राहा लोकंच तुमचा परिचय देतील – श्री स्वामी समर्थ

9. आपली इच्छा पूर्ण होणारच हा विश्वास ठेवा आणि स्वामींंवर निःशंक सोपवा. कर्म करता राहा. फळ मिळणारच 

10. मी शरीराने तुम्हाला दिसत नसलो तरीही मी सदैव तुमच्या पाठिशी राहीन – श्री स्वामी समर्थ

11. नको होऊ उदास मी आहेच तुझ्या आसपास, डोळे बंद करून कर आठवण बघ मी आहे तुझा विश्वास – श्री स्वामी समर्थ

12. किती दिवसाचे आयुष्य असते, आजचे अस्तित्व उद्या नसते मग जगावे ते हसून खेळून कारण या जगात उद्या काय होईल हे कोणालाच माहीत नसते – श्री स्वामी समर्थ

13. फूल बनून हसत राहणे हेच जीवन आहे, हसता हसता दुःख विसरून जाणे हेच जीवन आहे – श्री स्वामी समर्थ 

14. भेटून तर सर्व जण आनंदी होतात, न भेटता नाती जपणं हेच खरे जीवन आहे – श्री स्वामी समर्थ

15. आयुष्यात तुम्ही किती आनंदी आहात हे महत्त्वाचे नाही, तुमच्यामुळे किती जण आनंदी आहेत याला जास्त महत्त्व आहे – श्री स्वामी समर्थ

16. स्वामी लीला अपरंपार आहे. फक्त मनापासून श्रद्धा आणि विश्वास ठेवा 

17. बंद केले नयन माझे चित्त रूप बघूनी तुझे 
स्वामी तिन्ही जगाचा तू माय बाप आहे या जनाचा 

18. वाईट व्यक्ती अनुभव देते, तर चांगली व्यक्ती साथ देते – श्री स्वामी समर्थ

19. जाणले समर्था तुम्ही माझ्या मनीचे भाव म्हणूनच ओठावर असते केवळ स्वामी समर्थांचे नाव

20. ज्या वेळी तू जाशील काळोखात, त्यावेळी तुझी सावलीही सोडेल साथ
तू घाबरू नकोस, स्वामीच पकडतील तुझा हात 

आषाढी एकादशीच्या शुभेच्छा

स्वामी समर्थ संदेश मराठीत (Swami Samarth Message In Marathi)

Swami Samarth Message In Marathi

स्वामी समर्थांचे नामस्मरण हे मनाला शांती मिळवून देते. स्वामी समर्थांचे काही संदेशही (Swami Samarth Message In Marathi) असेच आपल्याला आयुष्यात मार्ग दाखविण्यासाठी उपयोग ठरतात. 

1. समतोल मनासारखे कोणतेही व्रत नाही. समाधानासारखे कोणतेही सुख नाही. लोभासारखा कोणताही आजार नाही आणि दयेसारखे कोणतेही पुण्य नाही – श्री स्वामी समर्थ

2. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, तू घाबरू नको असे बाळ त्यांचा – श्री स्वामी समर्थ

3. श्री स्वामी समर्थ जय जय रघुवीर समर्थ 

4. प्रत्येक गोष्ट मनासारखी घडली असती तर जीवनात दुःख उरलं नसतं. दुःखच जर उरलं नसतं तर सुख कोणाला कळलं असतं – श्री स्वामी समर्थ

5. जेव्हा जेव्हा तुला माझी गरज असेल तेव्हा तेव्हा तुझ्यासाठी नक्कीच धावत येईन. हाच तुला आशिर्वाद – श्री स्वामी समर्थ

6. काही वेळा नियती तुम्हाला मुद्दाम अनपेक्षित संकट देते, ते फक्त आपलं कोण आणि परकं कोण हे ओळखण्यासाठीच – श्री स्वामी समर्थ

7. गरीबाला केलेले दान आणि सद्गुरू स्वामींचे मुखात घेतलेले नाम कधीच फुकट जात नाही 

8. कोणत्याही सकारात्मक विचारांना कोणतेही विष मारू शकत नाही – श्री स्वामी समर्थ

9. कोणत्याही नकारात्मक विचारांना कोणतेही औषध वाचवू शकत नाही – श्री स्वामी समर्थ

10. नियत कितीही चांगली असू द्या ही दुनिया आपल्या दिखाव्यावरून आपली किंमत ठरवत असते आणि आपला दिखावा कितीही चांगला असू द्या परमेश्वर आपली नियत ओळखून आपल्याला फळ देत असतो 

11. मृत्यूनंतर जे जे काढून घेतले जाईल तो संसार असेल. पण मृत्यूनंतर जे चितेच्या ज्वालासोबत लपेटून घेईल ते तुमचे कर्म असेल आणि मी तुमच्यासोबत असेन – श्री स्वामी समर्थ

12. मी तुझ्या मदतीला सांगून नाही न बोलता धावून येईन फक्त माझ्यावर विश्वास ठेव – श्री स्वामी समर्थ

13. काळजी नको, आयुष्य सुंदर आहे 

14. कर्मावर विश्वास ठेवा, कितीही संकटे आली तरी तुम्ही त्यातून बाहेर याल – श्री स्वामी समर्थ

15. श्रीमंतीचा गर्व नको, स्वाभिमानाने जगावे, मीपणा सोडा, सर्वांशी प्रेमाने वागा, मन परमेश्वराच्या चिंतनात गुंतवा, थोरा मोठ्यांचा आदर राखा – श्री स्वामी समर्थ

16. आपला वेळ स्वतःला घडविण्यात खर्च करा म्हणजे तुम्हाला इतरांचा दोष पाहायला वेळ मिळणार नाही 

17. हे ही दिवस सरतील विश्वास ठेव माझ्यावर, मी तुझ्या पाठिशी आहे – श्री स्वामी समर्थ

18. हातावरील रेषेत दडलेले भविष्य पाहू नका तर त्याच हाताने प्रामाणिकपणे काम आणि मुखात स्वामीनाम राहू द्या

19. एक शब्द आहे नशीब, याच्याशी लढून बघा अन् हरला नाहीत तर सांगा. अजून एक शब्द आहे स्वामी, आर्ततेने बोलून तर बघा, मनासारखं नाही झालं तर सांगा 

20. विभूती नमन नाम ध्यानादी तिर्थ स्वमीच या पंच प्राणाभृतात
हे तिर्थ घे, आठवी रे प्रचिती न सोडेल स्वामी ज्या घेई हाती

वाचा – Swami Vivekananda Quotes In Marathi

You Might Like These:

Katu Satya Vachan Quotes In Marathi
दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
Swami Vivekananda Quotes In Marathi For Youth
कर्मावर आधारित कोट्स

Read More From Mythology