आरोग्य

मांडी घालून बसण्याचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या तज्ञ्जांचा सल्ला

Trupti Paradkar  |  Feb 10, 2022
benefits of sitting cross legged in marathi

आजकाल जीवनशैलीत अनेक बदल झाले आहेत. जेवण्यासाठी डायनिंग टेबल, बसण्यासाठी सोफा, टेबलखुर्चीचा वापर केला जातो. खाली मांडी घालून बसता येत नाही यासाठी देव्हारादेखील उंचावर ठेवला जातो. त्यामुळे नामस्मरण, प्रार्थना आणि ध्यानही खुर्चीवर बसूनच केलं जातं. मात्र फार पूर्वी आपल्याला मांडी घालून खाली बसण्याची सवय होती. ज्याचे अनेक चांगले फायदे आपल्या शरीरावर होत होते.आता कोरोमामुळे तर वर्क फ्रॉम होमची सवय सर्वांना लागली आहे. ज्यामुळे ऑफिसला जाणं अथवा येणं एवढा साधा व्यायामही आपल्याकडून होत नाही. टेबल खुर्चीवर सतत बसून शरीराला कोणताच व्यायाम मिळत नाही. उलट यामुळे आरोग्य बिघडण्याची, लठ्ठपणा वाढण्याची शक्यता जास्त असते. यासाठी पुन्हा एकदा पूर्वीची जीवनशैली आत्मसात करण्याची गरज आहे. जाणून घ्या याबाबत तज्ञ्जांचा सल्ला.

यासोबत वाचा Vyayamache Mahatva | व्यायामाचे जीवनातील महत्त्व आणि फायदे

आहारतज्ञ्ज ऋतूजा दिवेकरचा सल्ला

फिटनेस तज्ञ्ज ऋतूजा दिवेकर सोशल मीडियावरून नेहमी आहार, विहार, फिटनेसबाबत मार्गदर्शन करत असते. नेहमी नाविण्यपूर्ण आणि फायद्याचा सल्ला ती तिच्या इन्स्टा अकाउंटवरून चाहत्यांना देते.काही दिवसांपूर्वीच तिने मांडी घालून बसण्याबाबत महत्त्वाचे मार्गदर्शन केलेलं आहे. विशेष म्हणजे ती जे सांगते ते ती स्वतः आधी आचरणात आणत असते. तिच्या मते, आपण सध्या पूर्ण दिवसभर भर लॅपटॉपसमोर बसून काम करत आहोत. असं दिवसभर एकाच जागी बसून लॅपटॉपवर काम करणं हे धुम्रपानाइतकंच हानिकारक आहे. पण जर तुम्ही तुमची बसण्याची पद्धत बदलली तर तुम्हाला नक्कीच त्रास होणार नाही. तिने यासाठी खुर्चीवर पाय खाली लटकत ठेवत बसण्यापेक्षा मांडी घालून खुर्चीवर बसा असा सल्ला दिला आहे. सध्याच्या जीवनशैलीत खाली मांडी घालून बसणं शक्य नसलं तरी तुम्ही तुमच्या खुर्ची, सोफा, बेडवर तरी मांडी घालून नक्कीच बसू शकता. 

सायकल चालवण्याचे फायदे वाचाल तर थक्क व्हाल (Benefits Of Cycling In Marathi)

मांडी घालून बसण्याचे फायदे

मांडी घालून बसण्याचे तुमच्या शरीरावर चांगले फायदे होतात. कारण दोन्ही पाय जवळ घेत मांडी घातल्यामुळे तुमच्या मांड्या, कंबर आणि पायाचे स्नायू ताणले जातात. यामुळे तुमच्या शरीराचा पोश्चर सुधारतो. जर तुम्हाला अपचन, बद्धकोष्ठता, मुळव्याध असे त्रास असतील तर या स्थितीत बसण्यामुळे तुमची पचनशक्ती सुधारते आणि पोट साफ होते. रक्ताभिसरण सुधारण्यासाठी मांडी घालून बसणे खूप फायद्याचे आहे. जर तुम्हाला सांधेदुखी, गुडघेदुखी नको असेल तर योग्य वयात स्वतःला मांडी घालण्याची सवय लावा. 

जाणून घ्या सतत उभं राहण्यामुळे होणारी समस्या व्हेरिकोज व्हेन्स घरगुती उपाय (Varicose Veins Home Remedies In Marathi)

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

Read More From आरोग्य