Skin Care Products

डोळ्यांच्या सौंदर्यासाठीही आहे Under Eye Patch महत्वाचा

Leenal Gawade  |  Jul 21, 2020
डोळ्यांच्या सौंदर्यासाठीही आहे Under Eye Patch महत्वाचा

हल्लीच्या लाईफस्टाईलमुळे दिवसभर लॅपटॉप घेऊन बसावे लागते. त्यामुळे डोळ्यांवर चांगलाच अतिरिक्त ताण पडतो. आपण चेहऱ्याची जितकी काळजी घेतो. तितकी डोळ्यांची काळजी आापण घेत नाही. तुमचा चेहरा कितीही तुकतुकीत असेल पण तुमचे डोळे निस्तेज असतील तर तुमचा चेहरा कधीच खुललेला दिसणार नाही. आता डोळ्यांचे सौंदर्य म्हणजे काय ? असा तुम्हाला प्रश्न पडला असेल तर डोळ्यांचे सौंदर्य म्हणजे तुमचे डोळे प्रसन्न दिसणे होय. आता डोळे प्रसन्न दिसायचे असतील तर तुम्ही डोळ्यांचीही काळजी घ्यायला हवी. त्यासाठीच आम्ही आज डोळ्यांसाठी मिळणाऱ्या खास मास्कविषयी म्हणजेच Under eye patchअधिक माहिती देणार आहोत.म्हणजे तुम्ही हे आय पॅच विकत घेऊ शकाल.

डोळ्यांखाली येणारी खाज, होणारी जळजळ घालवण्यासाठी सोपे घरगुती उपाय Remedies For Itchy Eyes

अंडर आय मास्क/Under Eye Patch म्हणजे काय?

Instagram

अंडर आय मास्क हा तुमच्या खास डोळ्यांच्या आकारात बनवलेला असतो. डोळ्यांच्या तक्रारी कमी करण्यासाठी हा मास्क तुम्हाला मदत करतो. याला अंडर आय पॅच असे देखील म्हटले जाते. वेगवेगळ्या प्रकारांमध्ये आयपॅच किंवा आयमास्क तुम्हाला मिळतात.या आयपॅचमध्ये हायड्रो जेलचा वापर करण्यात येतो. बायोसेल्युलोझ प्रोडक्टचा वापर यामध्ये केला जाते. त्यामुळे  तुम्ही आठवड्यातून दोन वेळा अंडर आय पॅच वापरु शकता.कारण ते अगदी सेफ आहेत.

आता आय पॅच किंवा आय मास्क या विषयी तुम्हाला थोडी आयडिया आली असेल तर याचे फायदे काय ते विस्तृतपणे जाणून घेऊया. 

सुंदर डोळे दिसण्यासाठी घरगुती उपायांनी कमी करा अंडरआय बॅग (How To Reduce Under Eye Bags In Marathi)

अंडर आय पॅचचे फायदे (Benefits Of Under Eye Patch)

अंडर आय पॅच किंवा अंडर आय मास्क म्हणजे काय ? ते जर तुम्हाला कळले असेल तर आता याचे फायदे काय ते देखील जाणून घेऊया. 

डोळ्याखालील त्वचेला तजेला देणे : संपूर्ण चेहऱ्याची काळजी घेताना अनेकदा आपण आपल्या अंडर आयकडे दुर्लक्ष करतो. त्यामुळे डोळ्यांखालील त्वचा सुरकुतते. अशावेळी तुमच्या डोळ्यांखालील असलेल्या त्वचेला तजेला देण्याचे काम अंडर आय पॅच करतात.आपल्या डोळ्यांखाली असलेल्या त्वचेमध्ये sebaceousनावाची ग्रंथी फारच कमी असते. त्यामुळे आपले डोळे कोरडे होतात. आय पॅचमुळे डोळ्यांखाली ओलावा येण्यास मदत मिळते. 

सुरकुत्या कमी करणे: चेहऱ्याच्या इतर भागांच्या तुलनेत आपल्या डोळ्यांच्या आजुबाजूला जास्त सुरकुत्या येतात. तुमची त्वचेला आवश्यक असलेला ओलावा जर तुम्हाला मिळाला तर तुमच्या डोळ्यांखाली सुरकुत्या लवकर येत नाहीत. आय पॅच त्याच्यावर खूप चांगल्या पद्धतीने काम करते. 

डोळ्यांना देते आराम: शरीराच्या इतर अवयांसोबत आपले डोळेही फार थकतात. केवळ डोळे बंद करुन आपल्याला आराम मिळत नाही. अशावेळी हे आयपॅच तुमच्या डोळ्यांना थंडाबा देतात. तुमचे डोळे सुजले असतील किंवा डोळ्यांखाली काळी वर्तुळे आली असतील तर ते देखील कमी करण्याचे काम आयपॅच करते. 


आता जर तुम्ही फेसमास्क विकत घेत असाल तर डोळ्यांसाठी हे आयपॅच घ्यायला विसरु नका. 

 डोळ्यांना आयशॅडो लावताना या तुम्ही करता का या चुका, मग वाचा

 

Read More From Skin Care Products