Diet

कॅन्सरशी लढण्यात विगन डाएट बजावते महत्वाची भूमिका

Vaidehi Raje  |  Apr 6, 2022
Vegan Diet

शाकाहारी किंवा विगन आहार खरंच फायदेशीर आहे का यावर अनेक मतांतरे आहेत. एक बाजू असा युक्तिवाद करू शकते की मांस तुमच्या हृदयासाठी, कोलेस्टेरॉलची पातळी आणि इतर आरोग्यासाठी हानिकारक आहे. तर युक्तिवादाच्या दुसऱ्या बाजूचे लोक असा युक्तिवाद करू शकतात की शाकाहारी आहारामध्ये पोषक तत्वांची कमतरता असते कारण शाकाहारी आहारात मांस, पोल्ट्री आणि मासे वगळले जातात. शाकाहारी आहारात अंडी, चीज आणि मध यासह सर्व प्राणीजन्य पदार्थ वगळले जातात. विगन डाएटमध्ये तर दूध आणि दुग्धजन्य पदार्थ देखील वर्ज्य असतात तर मग हा आहार कर्करोगाचा धोका कमी करण्यास मदत कसा करू शकेल?

वर्ल्ड कॅन्सर रिसर्च फंड आणि अमेरिकन इन्स्टिट्यूट फॉर कॅन्सर रिसर्चचे म्हणणे आहे की आपला आहार जर वनस्पतीजन्य खाद्यपदार्थांवर आधारित असेल जसे की भाज्या, फळे, प्रक्रिया न केलेले धान्य, डाळी व कडधान्ये यांनी समृद्ध असेल तर हा आहार आपला कर्करोगाचा धोका कमी करू शकतो कारण यामध्ये फायबर,अँटिऑक्सिडंट्स  आणि इतर पोषक घटक असतात जे कॅन्सरशी लढण्यात मोठा हातभार लावतात. 

मांसाहारामुळे वाढतो काही कॅन्सरचा धोका 

 प्रक्रिया केलेले मांस अति प्रमाणात खाल्याने आतड्याचा कर्करोग आणि अन्ननलिकेचा कर्करोग व इतर काही विशिष्ट प्रकारच्या कर्करोगांचा धोका वाढू शकतो. तसेच, तुम्ही मांस कसे शिजवता यावरही कर्करोगाचा धोका वाढतो. बार्बेक्यूवर मांस भाजणे आणि पॅन-फ्रायिंगसारख्या पद्धती वापरून उच्च तापमानात शिजवलेले मांस खाल्ल्याने मूत्रपिंडाचा कर्करोग होण्याचा धोका वाढू शकतो.

Cancer

एका सर्व्हेमध्ये तज्ज्ञांना असे आढळले की जे लोक मांस अजिबात खात नाहीत त्यांच्यामध्ये कर्करोगाचे प्रमाण कमी होते. जे शाकाहारी लोक जे मासे, दुग्धजन्य पदार्थ किंवा अंडी यासह कोणतेही प्राणीजन्य पदार्थ खात नाहीत म्हणजेच जे लोक पूर्णपणे विगन डाएट पाळतात त्यांच्यात कर्करोगाचे प्रमाण सर्वात कमी असल्याचे दिसून आले. त्यानंतरच्या पंक्तीत असे लोक होते, जे मांस टाळतात प्राणिजन्य पदार्थ जसे की दूध किंवा अंडी खातात.

शाकाहारी आहार फायटोकेमिकल्सने समृद्ध 

अनेक दशकांच्या संशोधनातून असे दिसून आले आहे की कर्करोगाच्या प्रतिबंधासाठी सर्वोत्कृष्ट आहार हा वनस्पतीजन्य म्हणजेच शाकाहारी किंवा विगन आहार आहे. विगन डाएट असणाऱ्या लोकांमध्ये विशिष्ट प्रकारचे कर्करोग आणि हृदयविकाराचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी असल्याचे दिसून आले आहे. याचा अर्थ आपल्या आहारात भरपूर फळे, भाज्या, डाळी आणि कडधान्ये असावीत आणि मांस किंवा इतर प्राणीजन्य उत्पादने कमी असावीत. वनस्पतीजन्य पदार्थांमध्ये अनेक फायटोकेमिकल्स असतात जे आपल्या निरोगी पेशींचे  नुकसान होण्यापासून वाचवू शकतात. फायटोकेमिकल्सचे अनेक फायदे आहेत, त्यातील एक फायदा म्हणजे ते दाह कमी करतात तसेच रोगप्रतिकारक प्रणालीच्या कार्यास मदत करतात. फायटोकेमिकल्स आपल्या पेशी आणि डीएनएचे नुकसान होण्यापासून संरक्षण करतात.पेशींचे म्युटेशन झाल्याने किंवा डीएनएमध्ये बदल झाल्याने कर्करोगाच्या पेशी वाढू शकतात. ही शक्यता फायटोकेमिकल्स कमी करतात. तसेच ते काही कर्करोगाच्या पेशींच्या वाढीचा वेग कमी करतात आणि हार्मोन्सचे नियमन करण्यास मदत करतात. 

शाकाहारी आहारात असतात कॅन्सरशी लढणारे गुणधर्म 

Vegan Diet

वनस्पतीजन्य पदार्थांमध्ये फायबर असते, जे अतिरिक्त हार्मोन्स काढून टाकण्यास मदत करते ज्यामुळे स्तन आणि प्रोस्टेट कर्करोगासह विशिष्ट प्रकारचे कर्करोग होऊ शकतात. फायबर-समृद्ध आहार घेतल्याने तुमचे वजन निरोगी होण्यास मदत होते, ज्यामुळे 12 प्रकारच्या कर्करोगाचा धोका कमी होण्यासही मदत होते. तुमचा आहार जितका नैसर्गिकरित्या रंगीबेरंगी असेल तितकी त्यात कर्करोगाशी लढणारी संयुगे मुबलक प्रमाणात असतात. फळे आणि भाज्यांना चमकदार रंग देणारी रंगद्रव्ये – जसे रताळ्यातील बीटा-कॅरोटीन किंवा टोमॅटोमधील लाइकोपीन – कर्करोगाचा धोका कमी करण्यास मदत करू शकतात. क्रूसीफेरस भाज्या, जसे की ब्रोकोली आणि कोबी, कोलोरेक्टल कॅन्सर, फुफ्फुस आणि पोटाच्या कर्करोगाचा धोका कमी करतात. तर कॅरोटीनॉइड समृद्ध भाज्या, जसे की गाजर आणि रताळी खाल्ल्याने स्तनाच्या कर्करोगाचा धोका कमी होतो. 

म्हणूनच जरी पूर्ण विगन डाएट पाळणे कठीण वाटत असले तरी आहारात जास्तीतजास्त वनस्पतीजन्य पदार्थांचा समावेश असला पाहिजे. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

Read More From Diet