चांगली आणि चमकदार त्वचा मिळविण्यासाठी महिला अनेक उपाय करत असतात. पण सर्वात जास्त वापर चेहऱ्यावर केला जातो तो म्हणजे बेसनाचा. बेसनमध्ये त्वचा चमकदार बनविणारे अनेक गुणधर्म असतात. मात्र बेसनासह लिंबाचा प्रयोग करणे योग्य की अयोग्य असाही प्रश्न अनेकांना पडतो. वास्तविक बेसनमध्ये त्वचा एक्सफोलिएट करण्याची जितकी चांगली शक्ती असते, तसंच लिंबू त्वचेवर ब्लीचप्रमाणे चांगले काम करते. ज्यामुळे त्वचा अधिक चमकदार होते. मात्र लिंबाच्या त्वचेवर वापर करण्याबाबत अनेक मिथ आहेत. त्वचेवर लिंबाचा वापर केल्याने त्वचा अधिक गोरी होते असा समज अनेक ठिकाणी आहे. मात्र याबाबत काय खरे आहे हेच या लेखातून आम्ही सांगण्याचा प्रयत्न करत आहोत. बेसन आणि लिंबाचे हे कॉम्बिनेशन तुमच्या त्वचेला फायदा मिळवून देईल की नुकसान याबाबत माहिती.
चेहऱ्यावर बेसन आणि लिंबू लावण्याचे फायदे वा नुकसान
चेहऱ्यावर लिंबू आणि बेसन मिक्स करून कधीही लावणे हे नुकसानदायी ठरू शकते. असे करणे एसिडिक आहे आणि त्वचेची पीएच लेव्हल अस्थिर करू शकते. तसंच त्वचेचा लेअर पातळ करून पील ऑफ होतो. जर तुम्ही बेसन आणि लिंबू त्वचेवर डायरेक्ट लावले तर त्वचेला फायदा न मिळता केवळ नुकसानच होते. कारण हे कॉम्बिनेशन त्वचेला अधिक टॅन करते.
चेहऱ्यावर बेसन आणि लिंबाचा वापर कसा करावा?
- तुम्हाला बेसन आणि लिंबू चेहऱ्यावर लावायचे असेल तर तुम्ही त्यामध्ये अन्य साहित्य मिसळावे. यामध्ये दूध, दही, कोरफड, हळद, तांदळाचे पाणी असे पदार्थ अर्थवा मध, गुलाबपाणी अशा गोष्टींचे मिश्रण करावे
- इतकंच नाही तर या मिश्रणामध्ये लिंबाचे केवळ 5-6 थेंबच मिसळावे. जास्त थेंब मिसळल्यास, चेहऱ्यावर रॅश येण्याची शक्यता असते. तसंच जळजळ आणि खाजेची समस्याही होऊ शकते. याशिवाय त्वचा निघू पण शकते
- लिंबाचे पाणी डायल्यूट केल्यानंतरही तुम्ही कोणत्याही फेसपॅकमध्ये मिक्स करून लावू शकता. यामुळे त्वचेला नुकसान पोहचत नाही आणि चेहऱ्यावर चमक येते
कोणत्या त्वचेसाठी होतो फायदा आणि नुकसान
- तुम्ही त्वचेसाठी बेसन आणि लिंबाचा कोणताही फेसपॅक तयार करत असाल तर तुम्हाला माहीत असायला हवे की, कोरड्या त्वचेच्या व्यक्तींनी यामध्ये दुधाचा आणि तेलकट त्वचा असणाऱ्या व्यक्तींनी यामध्ये दह्याचा वापर करावा
- तुमची त्वचा कोरडी असेल तर तुम्ही बेसन आणि लिंबाच्या रसासह मध आणि तेलकट असल्यास, कोरफड जेल मिक्स करावी. हे कॉम्बिनेशन त्वचेला अधिक फायदा मिळवून देते
- बेसन आणि लिंबाचा लेप जर तुम्ही तांदळाच्या पाण्यात मिक्स करत असाल तर अँटीएजिंगप्रमाणे हे त्वचेवर काम करते. तर गुलाबपाणी मिक्स केल्यास, हे कोरड्या त्वचेसाठी फायदेशीर ठरते
सूचना – कोणताही घरगुती उपाय करताना 24 तास आधी तुम्ही स्किन पॅच टेस्ट करून घ्या. त्वचा संवेदनशील असल्यास, स्वतःहून कोणतेही उपाय करू नका. तसंच तुम्हाला कोणतीही शंका असल्यास, आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय कोणत्याही गोष्टीचा चेहऱ्यावर वापर करू नका.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक