DIY सौंदर्य

सतत एका जागी का येतात मोठे पिंपल्स, कारण आणि उपाय

Leenal Gawade  |  Jul 27, 2022
पिंपल्स का येतात

 पिंपल्सचा (Pimples) त्रास ज्यांना आहे त्यांनाच आजच्या विषयाचे महत्व आणि पिंपल्सचे दु:ख कळू शकते. कारण खूप जणांना हा त्रास सतत होत असतो. काही जणांना शरीरातील काही बदलामुळे हा त्रास होतो. पिंपल्स आणि माझाही कधीही संबंध नव्हता. कारण लग्नापूर्वी मलाही एकही पिंपल्स नव्हते आणि जर ते आले तरी देखील ते पटकन जात होते. पण लग्नानंतर मला पिंपल्सचा त्रास एवढा वाढला की, मला सतत एकाच जागी इतके पिंपल्स येऊ लागते की, त्यामुळे माझ्या चेहऱ्याचा काही भाग हा सतत पिंपल्समध्ये भरलेला असायचा. दोन्ही गालाच्या एकाच भागावर मला इतके मोठे आणि दुखणारे पिंपल्स यायचे की मला नकोसे होऊन जायते. कारण तुमचा चेहरा जर खूप चांगला असेल आणि अचानक खराब झाला की, नकोसा होणे अगदी साहजिक आहे.  पण या पिंपल्स मागे असू शकतात  काही कारण असे त्रास झाल्यानंतर तुम्ही नेमक्या काय गोष्टी करायला हव्यात ते जाणून घेऊया. 

मोठे पिंपल्स एका जागी का येतात?

जर तुम्हाला एकाच जागी सतत पिंपल्स येत असतील तर ती येण्यामागे असू शकतात काही कारणे जाणून घेऊयात काही कारणं. 

  1. शरीरातील हार्मोन्स बदल्यानंतर जर तुम्हाला पिंपल्स आले असतील तर ते तुमच्या त्वचेमध्ये खोलवर जाऊन बसतात. त्यामुळे असे पिंपल्स जाण्यासाठी रोजच्या पिंपल्सपेक्षा अधिक वेळ जातो. इतकेच नाही तर या पिंपल्समध्ये बॅक्टेरिया जाऊन बसतात. त्यामुळे होते असे की, आधीच खोलवर गेलेले पिंपल्स आणि त्यात साचणारी घाण त्यामुळे हे पिंपल्स लगेच जात नाही. 
  2. पिंपल्स आल्यानंतर त्यांना सतत हात लावण्याची इच्छा होत राहते. पण असे केल्यामुळे पिंपल्सला अधिक हिट मिळत राहते. त्यामुळे तो पिंपल्स चांगलाच वाढतो. 
  3. पिंपल्स आल्यानंतर आपण तो जावा यासाठी अनेक गोष्टी लावतो. त्यामुळे होते असे की, पिंपल्स दबण्याऐवजी किंवा त्यातील पस निघून जाण्याऐवजी तो बसून जातो. त्यामुळे होते असे की, तो पिंपल्स पुन्हा वर डोकं काढतात. त्यामुळे होते असे की, सतत एका जागीच तुम्हाला पिंपल्स येऊ लागतात. 

या गोष्टींनी घालवा पिंपल्स

आलेले मोठे पिंपल्स एकाच दिवशी घालवणे शक्य नसते. त्यामुळे थोडा पेशन्स हा यामध्ये ठेवावाच लागतो. मलाही असा त्रास झाल्यानंतर माझ्या काही स्किनकेअर रुटीनमध्ये काही बदल केले आणि  त्यानंतर माझ्या त्वचेवर काही बदल दिसून आले. 

  1. तुम्ही वापरत असलेला फेसवॉश कोणता आहे ते पाहा. कारण जर तुम्ही नुसता क्लिन्झर वापरत असाल तर तो बदला आणि प्युरिफाईंग क्लिन्झर वापरा. कारण त्यामध्ये चेहऱ्यावरील पोअर्स स्वच्छ करण्याची क्षमता असते. त्यामुळे हा पहिला बदल करा. 
  2. डॉक्टरांचा योग्य सल्ला घेऊन फक्त ज्या ठिकाणी पिंपल्स आलेत तिथेच औषध लावा. कंटाळून डॉक्टरांनी दिलेला एखादा डोस अजिबात वाढवू नका. त्यामुळेही त्वचा खूप नाजूक होऊ शकते. 
  3. आहारात जर तुम्ही तूप आणि चांगल्या गोष्टींचा समावेश केला तर तुमच्य त्वचेवर लवकर बदल होण्यास मदत मिळते. 

आता जर तुम्हाला एकाच जागी सतत पिंपल्स येत असतील तर अशा गोष्टींची नक्की काळजी घ्या.

Read More From DIY सौंदर्य