DIY सौंदर्य

चेहऱ्यावर बेसन आणि लिंबू लावणे चांगले की वाईट, जाणून घ्या

Dipali Naphade  |  Aug 2, 2022
besan-and-lemon-applied-on-face-myths-and-reality-in-marathi

चांगली आणि चमकदार त्वचा मिळविण्यासाठी महिला अनेक उपाय करत असतात. पण सर्वात जास्त वापर चेहऱ्यावर केला जातो तो म्हणजे बेसनाचा. बेसनमध्ये त्वचा चमकदार बनविणारे अनेक गुणधर्म असतात. मात्र बेसनासह लिंबाचा प्रयोग करणे योग्य की अयोग्य असाही प्रश्न अनेकांना पडतो. वास्तविक बेसनमध्ये त्वचा एक्सफोलिएट करण्याची जितकी चांगली शक्ती असते, तसंच लिंबू त्वचेवर ब्लीचप्रमाणे चांगले काम करते. ज्यामुळे त्वचा अधिक चमकदार होते. मात्र लिंबाच्या त्वचेवर वापर करण्याबाबत अनेक मिथ आहेत. त्वचेवर लिंबाचा वापर केल्याने त्वचा अधिक गोरी होते असा समज अनेक ठिकाणी आहे. मात्र याबाबत काय खरे आहे हेच या लेखातून आम्ही सांगण्याचा प्रयत्न करत आहोत. बेसन आणि लिंबाचे हे कॉम्बिनेशन तुमच्या त्वचेला फायदा मिळवून देईल की नुकसान याबाबत माहिती. 

चेहऱ्यावर बेसन आणि लिंबू लावण्याचे फायदे वा नुकसान 

चेहऱ्यावर लिंबू आणि बेसन मिक्स करून कधीही लावणे हे नुकसानदायी ठरू शकते. असे करणे एसिडिक आहे आणि त्वचेची पीएच लेव्हल अस्थिर करू शकते. तसंच त्वचेचा लेअर पातळ करून पील ऑफ होतो. जर तुम्ही बेसन आणि लिंबू त्वचेवर डायरेक्ट लावले तर त्वचेला फायदा न मिळता केवळ नुकसानच होते. कारण हे कॉम्बिनेशन त्वचेला अधिक टॅन करते. 

चेहऱ्यावर बेसन आणि लिंबाचा वापर कसा करावा?

कोणत्या त्वचेसाठी होतो फायदा आणि नुकसान

सूचना – कोणताही घरगुती उपाय करताना 24 तास आधी तुम्ही स्किन पॅच टेस्ट करून घ्या. त्वचा संवेदनशील असल्यास, स्वतःहून कोणतेही उपाय करू नका. तसंच तुम्हाला कोणतीही शंका असल्यास, आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय कोणत्याही गोष्टीचा चेहऱ्यावर वापर करू नका. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

Read More From DIY सौंदर्य