Recipes

चॉकलेट आवडत असेल तर नक्की ट्राय करा या रेसिपी

Leenal Gawade  |  Aug 2, 2021
चॉकलेट रेसिपी

 चॉकलेट आवडणारी व्यक्ती या पृथ्वीतलावर हाताच्या बोटावर मोजण्याइतक्याच असतील. पण जर तुम्ही चॉकलेटचे चाहते असाल तर यापासून काही पदार्थ तुम्ही अगदी हमखास बनवायला हवेत. ‘चॉकलेट खाऊ नका दात किडतील’ असे सतत म्हटल्यामुळे खूप जणांनी आतापर्यंत चॉकलेट खाणे कमी केले असेल किंवा चॉकलेट खाल्ल्यानंतर काळजी घ्यायला तरी सुरुवात केली असेल.हल्ली चॉकलेटचा वापर करुन कितीतरी रेसिपीज तयार केल्या जातात. या रेसिपीज चाखल्यानंतर असे वाटते की, या मस्त रेसिपीज आपण आधी का ट्रा केल्या नाहीत. तुम्हीही अजून चॉकलेटपासून तयार होणाऱ्या रेसिपीज चाखल्या नसतील तर अगदी आजच आणि आताच घरी चॉकलेटचा स्लॅब आणून या रेसिपीज करा

चॉकलेट सँडवीच

सौजन्य: Instagram

पावात चॉकलेट घालून खाण्याची कल्पना कदाचित अनेकांना थोडी वेगळी वाटत असेल. पण जो पर्यंत तुम्हीही रेसिपी ट्राय करणार नाही तोपर्यंत तुम्हाला ती किती छान लागते याचा अंदाजही येणार नाही. 

साहित्य: 1 मिल्क चॉकलेटचा स्लॅब, ब्राऊन किंवा तुमच्या आवडीचा ब्रेड, बटर, ग्रील मशीन किंवा ग्रीलचे भांडे 

कृती:
मिल्क चॉकलेटचे बारीक तुकडे करुन घ्या. तुम्ही किती सँडवीच बनवणार आहात त्यानुसार याचे प्रमाण ठेवा. आता ब्रेड स्लाईस घेऊन त्याला बटर लावा. त्यावर चॉकलेटचे तुकडे ठेवा.त्यावर बटर लावलेली आणखीव एक ब्रेडचा स्लाईस ठेवून तव्याव किंवा ग्रील मशीनमध्ये पाव छान दोन्ही बाजूने शेका. उष्णता लागल्यामुळे चॉकलेट विरघळू लागते. त्याचे तुकडे करुन बरुन थोडे चॉकलेट किसून घाला. घरात एखादा चॉकलेट सॉस असेल तर तो देखील घाला आणि या सँडवीचचा आस्वाद घ्या. 

हॉट चॉकलेट

सौजन्य: Instagram

खूप जणांच्या आवडीचे असे पेय म्हणजे हॉट चॉकलेट. लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यापर्यंत सगळ्यांनाच हॉट चॉकलेट हा प्रकार सगळ्यांना आवडतो. घरी असलेल्या कोणत्याही आवडीच्या चॉकलेटपासून तुम्ही हे हॉट चॉकलेट बनवू शकता. हे हॉट चॉकलेट प्यायल्यानंतर तुम्हाला नक्कीच खूप आनंद मिळेल.

साहित्य: आवडीचे मिल्क चॉकलेट, कोणताही चॉकलेट सॉस, गरम दूध
कृती: 
दूध चांगले उकळून घ्या. आता त्यामध्ये किसलेले चॉकलेट किंंवा चॉकलेटचे तुकडे घाला.
वरुन चॉकलेट सॉस घाला आणि हे गमर गरम हॉट चॉकलेट प्या. (दुकानात हॉट चॉकलेट मिळते. तुम्ही ते रेडिमेड देखील वापरु शकता.)

चॉकलेट खाण्याचे फायदे 

चॉकलेट हे शरीरसाठी फारच फायद्याचे असते. चॉकलेट खाण्याचे फायदे काय आहेत ते जाणून घ्या 

  1. मोठ्या प्रमाणात न्युट्रीशन असते.
  2. अँटीऑक्सिडंट घटक असतात. 
  3. ह्रदयासाठी फारच फायद्याचे 
  4.  उन्हापासून त्वचेचे संरक्षण करते
  5.  ब्लड प्रेशर कमी करते. 

Read More From Recipes