Festive

पुण्यातील या डिझाईनर बुटीक्सना नक्की भेट द्या (Designer Boutiques In Pune In Marathi)

Aaditi Datar  |  Aug 8, 2019
पुण्यातील या डिझाईनर बुटीक्सना नक्की भेट द्या (Designer Boutiques In Pune In Marathi)

पुणे तिथे काय उणे…ही म्हण तुम्ही नक्कीच ऐकली असेल. पुणं हे शहरं आता चांगलंचं वाढलं आहे. पुण्याला महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असं म्हटलं जातं. पुण्याला ऐतिहासिक वारसाही आहे. पण असं असलं तरी पुणेकरांची चॉईस नक्कीच बदलली आहे. जुन्यासोबतच नव्या गोष्टींचा मेळ पुण्यात आवर्जून दिसतो. पुण्याची हीच खासियत लक्षात घेऊन आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत काही फॅशन डिझाईनर बुटीक्स.

पुण्याची खासियत (Speciality Of Pune)

Instagram

पुणं हे शहर प्रत्येकाने एकदा तरी भेट द्यावं असं आहे. या मागील कारण म्हणजे पुण्यातील विविधता. पुण्यात तुम्हाला तुळशीबागेत अगदी पिनपासून पँट्सपर्यंत सगळं मिळेल. जे तुमच्या बजेटमध्येही असेल. तर दुसरीकडे तुम्ही मॉर्डन वेअरच्या शोधात असाल तर तेही तुम्हाला पुण्यातील अनेक मॉल्समध्ये आरामात खरेदी करता येईल. पुण्यात तुम्हाला लग्नाच्या बस्त्यापासून ते अगदी रिसेप्शनच्या डिझाईनर वेअरपर्यंत खरेदी करण्यासाठी भरपूर दुकानं आहेत. मग ते पारंपारिक असो वा मॉर्डन. तसंच तुमच्या बजेटप्रमाणे खरेदीसाठी पुण्यात अनेक पर्याय आहेत. त्यामुळे जर तुम्ही कधी पुण्यात शॉपिंगला गेलात तर तुमची निराशा नक्कीच होणार नाही. मग या लेखात नजर टाकत आहोत पुण्यातील काही फॅशन डिझाईनर बुटीक्सवर. 

वाचा – नागपुरातील दुकाने

पुण्यातील डिझाईनर बुटीक्स आणि त्यांची माहिती (Designer Boutiques In Pune In Marathi)

जर तुम्ही पुण्यात नवीन असाल किंवा चांगल्या डिझाईनर बुटीकच्या शोधात असाल तर या बुटीक्सना नक्की भेट द्या.

ईशिभा काऊचर (Ishibha Wakad)

Instagram

पत्ता – शॉप नं 13-14 व्हिसलिंग पाल्मस्, मानकर चौक, सेशन हॉटेलच्या समोर, वाकड, पुणे – 411057 

कसे जाल – पुण्यातील वाकड परिसरात जाण्यासाठी तुम्हाला रिक्शा किंवा बसचा पर्याय आहे.  

बुटीकमध्ये स्पेशल काय – या बुटीकची स्पेशालिटीमध्ये पारंपारिक कपड्यांचं डिझाईनिंग आहे. या बुटीकमध्ये सारी, ड्रेसेस, ब्लाऊजेस आणि ड्रेस मटेरियल्ससुध्दा आहेत. तसंच अनेक जणांनी त्यांचं स्टीचींग परफेक्ट असल्याबद्दल कमेंट केली आहे. 

खरेदीचा अंदाजे खर्च – येथील कलेक्शन तुम्हाला साधारण 500 रूपयापासून पुढे मिळेल.

अदा फॅशन्स (Adaa Fashions)

Instagram

पत्ता – शॉप नं 6, सनशाईन कोर्ट हाऊसिंग सोसायटी, कल्याणी नगर, एचडीएफसी बँकेसमोर, पुणे – 411006.

कसे जाल – पुण्यात कल्याणी नगरला जाण्यासाठी बस आणि रिक्शाचा पर्याय आहे. तसंच तुम्ही तुमच्या वाहनाने गेल्यास पुणे शहरात फिरणे जास्त चांगले आहे. 

बुटीकमध्ये स्पेशल काय – पुण्यातील टॉप बुटीक्समध्ये गणलं जातं. या बुटीकबाबत आणि खासकरून ऑनर प्रीती यांच्याबाबत खूप चांगले रिव्ह्यूज आहेत. या बुटीकची सुरूवात 2011 साली झाली. परफेक्ट फिटींग आणि डिझाईनर क्लोथिंग ही त्यांची खासियत आहे. 

खरेदीचा अंदाजे खर्च – येथील कलेक्शन तुम्हाला साधारण 500 रूपयापासून पुढे मिळेल.

Also Read: Banquet Halls In Pune In Marathi

वैशाली बुटीक (Vaishalis Boutique)

Justdial

पत्ता – फ्लॅट नं 13, A1/1 बिल्डींग, गिरिजा शंकर विहार सोसायटी, कर्वे नगर, हिंगणे बुद्रुक, पुणे – 411052, वारजे क्षेत्रीय कार्यालयाजवळ 

कसे जाल – तुम्हाला इथे पोचण्यासाठी वाहतूकीचे अनेक पर्याय आहेत. पहिल्यांदा येथे जाणाऱ्यांसाठी मुख्य लँडमार्क म्हणजे वारजे क्षेत्रीय कार्यालय. 

बुटीकमध्ये स्पेशल काय – हे बुटीक 2004 सालापासून असून एम्ब्रॉयडरी आणि खासकरून डिझाईनर ब्लाऊजेस हे त्यांची खासियत आहे. 

खरेदीचा अंदाजे खर्च – तुमच्या बजेटप्रमाणे इथे डिझाईनर ब्लाऊन शिवून मिळतील. तरीही साधारण 500 रूपयांपासून चांगल्या डिझाईनर ब्लाऊजेसच स्टिचींग आहे.

लाना द फॅशन स्टुडिओ (Lana The Fashion Studio)

Justdial

पत्ता – 101, द कॅपिटल बिल्डींग, विंग बी, बाणेर पाषाण लिंक रोड, बाणेर, पुणे – 411045, जस्ट बुक्सच्या वर 

कसे जाल – पुण्यातील बाणेर परिसरात जाण्यासाठी तुम्हाला रिक्शा किंवा बसचा पर्याय आहे. 

बुटीकची खासियत – हे बुटीक नवं असलं तरी यांचं कलेक्शन फारच सुंदर असल्याचं दिसतंय. खासकरून यांचं वेडींग कलेक्शन खूपच सुंदर आहे. जर तुम्ही लग्नासाठी काहीतरी हेवी डिझाईनर घालायच्या विचारात असाल तर इथे नक्की भेट द्या. 

खरेदीचा अंदाजे खर्च – हेवी वेडींग डिझाईनर वेअर असल्यामुळे स्टार्टिंग रेंज 5 हजाराच्या पुढे असेल, असं म्हणायला हरकत नाही.

रूपम लेडीज टेलर (Rupam Ladies Tailor)

Justdial

पत्ता – 776, बिज्जीलँड, शॉप नं 517, 5 वा मजला, सदाशिव पेठ, पुणे  – 411030, फडतरे चौक 

कसे जाल – पुण्यातील अगदी मोक्याच्या ठिकाणी म्हणजे सदाशिव पेठेत हे बुटीक आहे. त्यामुळे तुम्ही बस किंवा रिक्शाचा पर्याय वापरू शकता. 

बुटीकमध्ये स्पेशल काय – याचं नाव जरी रूपम टेलर असलं तरी हे एखाद्या बुटीकपेक्षा कमी नाही. याची सुरूवात 2005 साली झाली. या बुटीकची खासियत म्हणजे पारंपारिक आणि वेस्टर्न डिझाईनर वेअर तसंच एम्ब्रॉयडरी हे आहे. येथील ब्लाऊज आणि गाऊन्सचे एकसेएक डिझाईन्स तुम्हाला नक्कीच आवडतील. 

खरेदीचा अंदाजे खर्च – 500 रूपयापासून पुढे.

के के फॅशन (K K Fashion)

Justdial

पत्ता – शॉप नं 162, व्हिजन 9, शिवार लेन, पिंपळे सौदागर, पुणे – 411027, कुणाल आयकॉनच्या समोर 

कसे जाल – या ठिकाणी जाण्यासाठी तुम्ही बस किंवा रिक्शाचा पर्याय वापरू शकता. 

बुटीकमध्ये स्पेशल काय – या बुटीकची खासियत म्हणजे डिझाईनर सारीज आणि लेहंगाज. इथे तुम्ही भाड्यानेही वेडिंगसाठी लागणारे कपडे घेऊ शकता. तसंच लेडीज ब्लाऊजचं स्टीचिंगही करून मिळतं. 

खरेदीचा अंदाजे खर्च – 1000 रूपयांपासून पुढे. 

फॅशन क्वोशंट बाय किरण (Fashion Quotient By Kiran)

Justdial

पत्ता – प्रसाद अपार्टमेंट, पहिला मजला, परबत रोड, नववी गल्ली, डेक्कन जिमखाना पुणे – 411004, महाबँक हाऊसजवळ 

कसे जाल – हे पुण्यातील मोक्याच्या भागात असल्याने तुम्ही बस किंवा रिक्शाने इथे पोचू शकता. 

बुटीकमध्ये स्पेशल काय – डिझाईनर क्लोथिंगमध्ये इम्ब्रॉयडरी वर्क ही त्यांची खासियत आहे. त्यामुळे तुम्हाला इथे मनासारखं डिझाईन तुमच्या कपड्यांवर करून घेऊ शकता. 

खरेदीचा अंदाजे खर्च – साधारण 500 रूपयांपासून पुढे.

एथनिक स्टोरी (Ethnic Story)

Justdial

पत्ता – कृष्णकुंज, रामबाण हाऊसिंग सोसायटी, डीपी रोड, औंध, पुणे – 411007, BSNL ऑफिससमोर 

कसे जाल – या ठिकाणी जाण्यासाठी तुम्हाला बस किंवा रिक्शाचा पर्याय आहे. 

बुटीकमध्ये स्पेशल काय – हे बुटीक 2015 मध्ये सुरू करण्यात आलं असलं तरी या बुटीकबाबतचे अनेक चांगले रिव्हयूज जस्ट डायलवर आहेत. फार कमी वेळात त्यांनी चांगलंच नाव कमावल्याचं दिसतंय. या बुटीकची खासियत म्हणजे नावाप्रमाणेच येथील एथनिक डिझाईनर कुर्तीज आणि डिझाईनर ट्रेडीशनल वेडिंग वेअर. त्यामुळे जर तुम्हाला सणावारासाठी किंवा एखाद्या फॅमिली फंक्शनसाठी खरेदी करायची असल्यास इथे नक्की भेट द्या.  

खरेदीचा अंदाजे खर्च – 500 रूपयांपासून पुढे. 

शशिकला डिझाईनर स्टुडिओ (Shashikala Designer Studio)

Justdial

पत्ता – शॉप नं 18 हेरिटेज प्लाझा, लिंक रोड, चिंचवड, पुणे – 411033, मोरया हॉस्पिटलजवळ 

कसे जाल – हे चिंचवडमध्ये असल्यामुळे तुम्ही पुण्याहून बसने इथे जाऊ शकता. 

बुटीकमध्ये स्पेशल काय – या बुटीकची खासियत म्हणजे डिझाईनर वेडिंग गाऊन आणि ब्रायडल वेअर स्टीचिंग. पारंपरिक आणि मॉर्डन असे दोन्ही प्रकारचे ब्रायडल वेअर इथे तुम्हाला पाहता येईल. 

खरेदीचा अंदाजे खर्च – 5,000 रूपयांपासून पुढे.

टॅसल बुटीक (Tasselle Boutique)

Justdial

पत्ता – 549 अ सिटी अपार्टमेंट, युको बँकेसमोर, गुरूवार पेठ, पुणे – 411042, गौरी आळीजवळ.

कसे जाल – तुम्ही खाजगी वाहनाने किंवा रिक्शा बसने या ठिकाणी जाऊ शकता. 

बुटीकमध्ये स्पेशल काय – हे बुटीक 2012 मध्ये सुरू करण्यात आलं.  या बुटीकची खासियत आहे येथील डिझाईनर लेहंगाज. जर तुम्हाला लग्नासाठी डिझाईनर लेहंगा हवा असेल तर इथे नक्की भेट द्या. 

खरेदीचा अंदाजे खर्च – 5,000 रूपयापासून पुढे. 

मृणाल बुटीक (Mrunal Boutique)

Justdial

पत्ता – शॉप नं A1/13 रामबाग कॉलनी, नवी पेठ रोड, नवी पेठ सदाशिव पेठ, पुणे – 411030, होंडा शोरूमजवळ. 

कसे जाल – हे शहरातील मोक्याच्या ठिकाणी असल्यामुळे तुमच्याकडे बस आणि रिक्शाचा पर्याय आहे. 

बुटीकमध्ये स्पेशल काय – हे बुटीक 2012 मध्ये सुरू करण्यात आलं. हे बुटीक दिसायला जास्त मोठं नाही. पण जर तुम्ही रोजच्या वापरासाठी डिझाईनर कुर्तीज किंवा होलसेलमध्ये खरेदी करायच्या विचारात असाल तर इथे नक्की भेट द्या. त्यामुळे इथे तुम्हाला बजेट रेंजमध्ये नक्कीच खरेदी करता येईल. 

खरेदीचा अंदाजे खर्च – 500 रूपयांपासून पुढे.

परिशा अटेलियर (Parisha Atelier)

Justdial

पत्ता – शॉप नं 6, कपिल क्लासीक बिल्डींग, पहिला मजला, बाणेर, पुणे – 411045, बँक ऑफ महाराष्ट्राच्या वर, पँटलून्स शोरूमच्या समोर 

कसे जाल – बाणेरला जाण्यासाठी तुम्हाला खाजगी वाहन, रिक्शा किंवा बसचा ऑप्शन आहे. 

बुटीकमध्ये स्पेशल काय – या बुटीकला 2013 सुरूवात झाली असून याचं वैशिष्ट्य म्हणजे डिझाईनर अनारकलीज, ड्रेसेस आणि एम्ब्रॉयडरी वर्क असलेले ड्रेसेस इथे मिळतात. तसंच डिझाईनर लेहंगा इथे तुम्हाला स्टीच करून मिळेल. 

खरेदीचा अंदाजे खर्च – 5 हजार रूपयांपासून पुढे. 

पुण्यातील शॉपिंगबाबत काही (FAQs)

पुण्यात कोण-कोणत्या गोष्टींची शॉपिंग करता येईल?

वर म्हटल्याप्रमाणेच तुम्हाला शॉपिंगसाठी भरपूर पर्याय उपलब्ध आहेत. लग्न असो पार्टी असो वा सणवार. पुण्यात प्रत्येक शॉपिंगसाठी बजेटनुसार पर्याय उपलब्ध आहेत. त्यामुळे कोणत्याही शॉपर्सची इथे निराशा होणार नाही.

पुण्यात साड्यांची शॉपिंग कुठे करावी?

पुण्यात साड्यांची शॉपिंग करायची म्हटल्यावर जाण्याचं हमखास ठिकाण म्हणजे सदाशिव पेठ. पुण्यातील मोक्याचा भाग म्हणजे सदाशिव पेठ. इथल्या विविध दुकानात तुम्हाला लग्नासाठी किंवा सणावारासाठी साड्यांची शॉपिंग करता येईल. एवढंच नाहीतर तुम्हाला होलसेल भावात देण्याघेण्यासाठी साड्या घ्यायच्या असल्यास तुम्ही पुण्यातील फुरसुंगी भागाला भेट देऊ शकता.

पुण्यात कोणत्या वेळी शॉपिंगसाठी जाणं सोयीचं आहे?

पुण्यात शक्यतो दुपारच्या वेळी किंवा ट्रॅफीकच्या वेळा टाळून शॉपिंगला जाण्यास काहीच हरकत नाही. कारण आजकाल पुणे शहरातही ट्रॅफिकची समस्या वाढली आहे. म्हणून चांगल्या शॉपिंग अनुभवासाठी ट्रॅफिकच्या वेळा टाळा. 

मुंबईहून पुण्याला कसं जावं?

तुम्ही मुंबईहून पुण्याला जाण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. त्यामध्ये खाजगी वाहनं, बस आणि रेल्वे असे सर्व पर्याय आहेत. तुम्ही मुंबईहून कमीत कमी अडीच तासात पुण्याला पोचू शकता. ट्रॅफिकमध्ये अडकल्यास मात्र हे वेळेचं गणित बदलू शकतं.

शॉपिंग करण्यासाठी पुण्यातील वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी कोणत्या?

पुण्यात तुम्हाला लग्नासाठी किंवा कोणत्याही फंक्शनसाठी शॉपिंग करायला भरपूर ऑप्शन्स आहेत. मग ते पुणेरी पगडी विकते घेणे असो वा लग्नाच्या रूखवताच्या वस्तू घेणे असो. पुण्यामध्ये प्रत्येक गोष्टीसाठी भरपूर पर्यायही आहेत आणि बजेटमध्ये तुम्हालाही खरेदी करता येईल. पुण्यात वेस्टर्न आऊटफिट्स घेण्यासाठी बरीच शॉपिंग सेंटर्स आहेत.

हेही वाचा – 

नागपूरमधील Designer Boutiques

ठाण्यातील या Designer Boutiques

नागपूरात लग्नाची शॉपिंग करताय मग ‘या’ ठिकाणांना भेट द्या

Read More From Festive