DIY फॅशन

Kathachya Sadiche Blouse Designs | काठाच्या साडीचे विविध ब्लाऊज डिझाईन

Leenal Gawade  |  Dec 8, 2021
Kathachya Sadiche Blouse Designs

‘साडी’ हा महिलांचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय. अगदी सगळ्या प्रसंगासाठी महिलांकडे साड्या असतात. वेगवेगळ्या प्रकाराच्या साड्या घेणे आणि त्या नेसणे हा महिलांचा छंदच असतो. साड्यांचे कितीही प्रकार घेतले तरी देखील ते कोणालाही कमी असतात. साडी कशी नेसायची हे महिलांना सांगायला नको. खूप जण साडी नेसल्यावर स्टाईल करण्यात एकदम पटाईत असतात. मग तो सेलिब्रिटी स्टाईल ब्लाऊज डिझाईन शिवणे असो किंवा लेटेस्ट फॅशन ब्लाऊड असो. कारण साध्या साडीलाही एक वजनदार लुक देत असतो तो म्हणजे ब्लाऊज. ब्लाऊजचे वेगवेगळे प्रकार हल्ली बाजारात पाहायला मिळतात. पण काठाच्या साडीचे ब्लाऊज डिझाईन (Kathachya Sadiche Blouse Design) हे जरा जास्तच उठून आणि शोभून दिसतात. साड्यांचे प्रकार विचारात घेता काठपदरी साड्यांमध्ये विविधता दिसून येते. काठाच्या साड्या म्हटल्या की, आपल्यासमोर पैठणी, कांजिवरम, साऊथ इंडियन पट्टू साड्यांचे ब्लाऊज,बनारसी साडी, कांचिपुरम साडी असे वेगवेगळे प्रकार पाहायला मिळतात. आज आपण काठापदराच्या साडीचे ब्लाऊज डिझाईन पाहणार आहोत.

पैठणी साडी ब्लाऊज डिझाईन

पैठणी काठाचा ब्लाऊज डिझाईन

साड्यांची महाराणी म्हणून “पैठणी” साडी ओळखली जाते. त्यावरील काम हे नेहमीच वेगळे आणि आकर्षक दिसते. पैठणींचे प्रकार, साड्यांचे प्रकार वेगवेगळे आणि सुंदर असतात. हल्ली बाजारात खास पैठणीचे ब्लाऊज पीस मिळतात. अत्यंत महाग आणि खास डिझाईन्सच्या या ब्लाऊज पीसपासून ब्लाऊज शिवताना तुम्हाला यावरील मोर, काठ किंवा मुनियाचा जास्तीत जास्त वापर करायचा आहे.

पैठणी काठाचा ब्लाऊज शिवताना

कांजिवरम काठाचा ब्लाऊज

कांजिवरम काठाचा ब्लाऊज

कांजिवरम साडी ही खूप जणांना आवडते. तामिळनाडूमधील कांचिपुरम या भागाची ही खास खासियत असलेली साडी आहे. लग्नासाठी या साड्या अनेक जण निवडतात. कारण त्याचे काठ खूपच आकर्षक असतात. कांजिवरम साड्यांचे काठ मोठे असतात. त्यावर सोनेरी जरीचे काम खूप चांगलेच केलेले असते. वेगवेगळ्या नक्षीचे काम त्यावर केलेले असते. त्यामुळे यांचे काठ वापरताना तुम्हाला काही विशिष्ठ काळजी घ्यावी लागते.

कांजिवरम साडीचा ब्लाऊज शिवताना

मोर काठाच्या साडीचे ब्लाऊज डिझाईन

मोर काठाच्या साडीचे ब्लाऊज डिझाईन

पदरावरती जर तारीचा मोर नाचरा हवा… अशी केवळ या पूर्वी पैठणी साड्यांची ओळख होती. पण आता पैठणीचा मोर वेगवेगळ्या साडीवर दिसू लागला आहे.  हल्ली खास मोर असलेले ब्लाऊज पीस देखील मिळतात जर तुम्हाला ब्लाऊजवर मोर हवा असेल तर तुम्ही हे ब्लाऊज खास पद्धतीने शिवायला हवेत.

मोर काठाच्या साडीचे ब्लाऊज शिवताना

ट्रेडिशनल काठाच्या साडीचा फॅन्सी ब्लाऊज

ट्रेडिशनल काठाच्या साडीचा फॅन्सी ब्लाऊज

ट्रेडिशनल साड्या या सुंदरच असतात. पेशवाई, सेमी पैठणी अशा काही साड्यांचे ट्रेडिशनल काठ असतात. जर तुमच्या टीपिकल ट्रेडिशनल साडीचा वापर करुन तुम्हाला ब्लाऊज शिवायचा असेल तर तुम्ही त्याचा फॅन्सी ब्लाऊजचा पॅटर्न निवडायला हवा.

ट्रेडिशनल काठाच्या साडीचा फॅन्सी ब्लाऊज

साऊथ काठाच्या साडीचे ब्लाऊज डिझाईन

साऊथ काठाच्या साडीचे ब्लाऊज डिझाईन

साऊथच्या साड्या हल्ली चांगल्या हिट झालेल्या आहेत. साऊथच्या साड्यांचे टेक्श्चर हे सिल्क आणि खूप सुंदर असते. त्यामुळेच हल्ली या साड्यांचे ब्लाऊज दिसू लागले आहे. तुम्हाला कोणत्याही साड्यांवर जर हेवी ब्लाऊज घालायचा असेल तर तुम्ही साऊथ काठाच्या साडीचे ब्लाऊज शिवायला काहीच हरकत नाही. 

साऊथ काठाच्या साडीचे ब्लाऊज डिझाईन शिवताना

महेश्वरी सिल्क साडी ब्लाऊज डिझाइन

महेश्वरी सिल्क साडी ब्लाऊज डिझाइन

महेश्वरी सिल्क साड्या या देखील खूप जणांना आवडू लागल्या आहेत. महेश्वरी सिल्क साडी ब्लाऊज शिवताना हे ब्लाऊज कॉटन आणि सिल्क या प्रकारामध्ये मिळतात. या साड्यांचे ब्लाऊज फिटिंगला सुंदर बसतात. या साड्यांचे ब्लाऊज तुम्हाला कोणत्याही प्लेन साडीवर नेसता येतात.

महेश्वरी सिल्क साडी ब्लाऊड डिझाईन

हेवी बनारसी काठाच्या साडीचे ब्लाऊज डिझाईन

हेवी बनारसी काठाच्या साडीचे ब्लाऊज डिझाईन

 बनारसी काठ हे अगदी कुठूनही पाहिले तर चांगलेच उठून दिसतात. अशा साड्यांचे ब्लाऊज शिवताना तुम्हाला ते कसे सुंदर आणि हेवी दिसतील याची काळजी घ्यावी लागते. कारण या काठांचा उपयोग तुम्ही जितका जास्त कराल तेवढा तो ब्लाऊज खूप जास्त चांगला दिसतो.

हेवी बनारसी काठाच्या साडीचे ब्लाऊज डिझाईन

कांचिपुरम काठाचा ब्लाऊज

कांचिपुरम काठाचा ब्लाऊज

कांचिुपरम काठ हा देखील तुम्हाला आवडेल असा आहे. कांचिपुरम साड्यांचे काठ हे प्लेन असतात.  पण त्यामध्ये हे काठ मोठे असल्यामुळे ते ब्लाऊजला छान शोभून दिसतात.  कांचिपुरम साड्यांमध्ये रंग हे खूप आकर्षक चांगले मिळतात.

कांचिपुरम काठाचा ब्लाऊज शिवताना

टेंपल बॉर्डर ब्लाऊज डिझाईन

टेंपल बॉर्डर ब्लाऊज डिझाईन

 टेंपल बॉर्डर ज्यामध्ये मोठमोठे त्रिकोण असतात. ही बॉर्डर एखाद्या ब्लाऊजसाठी खूप सुंदर दिसते. टेंपल बॉर्डर हल्ली सगळ्या प्रकारच्या साड्यांमध्ये दिसतात. म्हणजे अगदी खणाच्या साड्यांपासून ते  कॉटन सिल्क साड्यांपर्यंत सगळ्यांमध्ये अशाप्रकारची बॉर्डर मिळते. ती तुम्हाला ब्लाऊजमध्ये वापरताना काही गोष्टींची काळजी घ्यावी लागते.

टेंपल बॉर्डर ब्लाऊज डिझाईन निवडताना

शालू काठाच्या साडीचे ब्लाऊज डिझाईन

शालू काठाच्या साडीचे ब्लाऊज डिझाईन

लग्न आणि शालू यांचे एक वेगळे कॉम्बिनेशन असते. शालूचा काठ हा चांगला हेवी असतो. वेगवेगळ्या साडीच्या प्रकारामध्ये हल्ली शालूचे ब्लाऊज पीस मिळतात. शालूच्या काठाचे ब्लाऊज डिझाईन्स बनवताना तुम्ही काही विशेष गोष्टींची काळजी घ्यायला हवी.

शालू काठाच्या साडीचे ब्लाऊज डिझाईन

ब्लाऊज स्टायलिंग टिप्स

ब्लाऊज स्टायलिंग टिप्स

 ब्लाऊजची शिलाई पाहता हल्ली चांगला ब्लाऊज शिवायचा म्हणजे खूप विचार करुन शिवावा लागतो.  जर तुम्हाला ब्लाऊज शिवताना काही अडचणी येत असतील तर तुम्ही काही ब्लाऊज स्टायलिंग टिप्स नक्कीच अवलंब करु शकता. या काही टिप्स खास तुमच्यासाठी 

  1.  ब्लाऊज शिवताना त्याचा गळा कसा असायला हवा हे सर्वस्वी तुमच्या स्टायलिंगवर अवलंबून असते. जर तुम्ही थोडे स्थुल असाल तर तुम्ही त्याचा गळा खूप मोठा शिवू नका. त्यापेक्षा तुम्ही थोड्या बंद गळ्याचा ब्लाऊज शिवा. म्हणजे तुम्ही त्यामध्ये बारीक दिसाल. 
  2. काठ पदरी ब्लाऊज तुम्ही स्लिव्हलेस अजिबात शिवू नका. कारण काठाची मजा निघून जाते. कारण खूप वेळा आपण पदर हातावर सोडतो. त्यामुळे मग अशावेळी त्याची मजा येत नाही. 
  3. काठपदराचा लुक अधिक चांगला करायचा असेल तर तुम्हाला त्याचा जास्तीत जास्त वापर करणे गरजेचे असते. 
  4. हल्ली मिस मॅचचा काळ आहे. त्यामुळे तुम्हाला मिस मॅच करुन ब्लाऊज घालताना तुम्ही ब्लाऊजला अजिबात जास्त काम करायला जाऊ नका. कारण त्यामुळे तुम्हाला तो ब्लाऊज कुठेही घालता येत नाही. 
  5. ब्लाऊज जर डीप गळ्याचा असेल तर तुम्ही त्याच्या आत कप्स लावून घ्या त्यामुळे तुम्हाला ब्रा घालायची काहीही गरज नाही. 

आता तुम्हाला काठाच्या साडीचे ब्लाऊज डिझाईन हवे असतील तर तुम्ही या काही टिप्स नक्की फॉलो करु शकता. 

Read More From DIY फॅशन