Diet

पुणेकरांनो जर तुम्ही डाएटिशनच्या शोधात असाल तर हे तुमच्यासाठी (Best Dietitian In Pune In Marathi)

Leenal Gawade  |  Jun 12, 2019
पुणेकरांनो जर तुम्ही डाएटिशनच्या शोधात असाल तर हे तुमच्यासाठी (Best Dietitian In Pune In Marathi)

हल्ली प्रत्येक गोष्टीसाठी स्पेशलिस्ट डॉक्टरांचा सल्ला घेतला जातो. तुम्ही काय खाता या पेक्षा तुमच्या उत्तम आरोग्यासाठी तुम्हाला काय खायला हवं आणि काय टाळायला हवं हे देखील माहीत असणे आवश्यक असते.  तुम्हीही काय खाऊ काय नको या मध्ये अडकला असाल तर तुम्हाला देखील उत्तम डाएटिशनची माहिती असणे आवश्यक झाले आहे. तुम्हालाही डाएटिशनची गरज असेल आणि तुम्ही पुण्यातील असाल तर आम्ही काही डाएटिशनची यादी खास तुमच्यासाठी काढली आहे.

डाएटिशनची गरज काय? (Importance Of Dietitian)

तुम्हाला दीर्घ काळ फिट ठेवण्यासाठी डाएटिशनची तुम्हाला मदत होत असते. तुमच्या शरीराला आवश्यक असलेले न्युट्रिशन तुम्हाला कोणत्या खाद्यपदार्थांमधून मिळू शकते याची योग्य माहिती तुम्हाला डाएटिशन देऊ शकतात. तुमचे वजन, उंची, वय या सगळ्याचा विचार करुन ते तुम्हाला तुमचा आहार किंवा डाएट सांगत असतात.जर तुम्हाला काही त्रास असतील तर डाएटिशन योग्य आहार सुचवून तुमच्या आरोग्यविषयक तक्रारी दूर करु शकतात.

वाचा – पुणेकरांसाठी बेस्ट जिम्स

पुण्यातील टॉप 25 डाएटिशन (Best Dietitian In Pune In Marathi)

आता वळूया पुण्यातील डाएटिशनच्या यादीकडे. करायची का सुरुवात?

1) डॉ. प्राची फोटानी (M.Sc. Food and Applied Nutrition)

प्राची फोटानी यांनी या क्षेत्राचा 7 वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी आतापर्यंत अनेक रुग्णांना उत्त मार्गदर्शन केले असून त्यांना सुदृढ केले आहे. वजन नियंत्रित ठेवणे, ह्दयविकार नियंत्रणात आणणे, पचनक्रिया सुरळीत करण्याचे काम त्यांनी त्यांच्या मार्गदर्शनातून केले आहे.

पत्ता: 617, ग्लोबल बिझनेस हब, इऑन फ्री झोन जवळ, खरडी, पुणे

संपर्क: 020 4855 6725

EXT: 049

वाचा : कमी बजेट बँक्वेट हॉल

2. डॉ. प्रीती सिंह (M.Sc. Nutrition Sciences, B.Sc. – Home Science)

डॉ. प्रीती सिंह यां पुण्यातील सर्टिफाईड न्युट्रिशनिस्ट असून त्यांना एकूण 6 वर्षांचा अनुभव आहे. वजन कमी करणे, वाढवणे, थायरॉईड, कर्करोग न्युट्रिशन, डाएबिटीस, खेळाडूंचा आहार, गर्भवती महिलांचा डाएट या सगळ्यामध्ये त्यांचा हातखंडा आहे.

पत्ता: 1,  पहिला मजला, प्रॉस्पेरो बिल्डींग, EON IT पार्क, माऊंट अॅण्ड ग्लोरी सोसायटीच्या बाजूला, खरडी, पुणे

संपर्क: 020 4855 3727

3. डॉ. रोमा गुप्ता (M.Sc. – Home Science – Food & Nutrition)

डॉ. रोमा गुप्ता यांना या क्षेत्राचा तब्बल 11 वर्षांचा अनुभव आहे. 5 हजाराहून अधिक रुग्णांच्या समस्यांचे त्यांनी समाधान केले आहे. रोमा गुप्ता यांनी तयार केलेल्या डाएटचा फायदा सगळ्याच रुग्णांना झाला आहे. वजन कमी करण्यापासून ते वाढवण्यापर्यंत आणि थायरॉईडपासून ते ह्रदयविकारापर्यंत सगळ्यात आजारांवरील योग्य आहार त्यांनी त्यांच्या रुग्णांना सुचवला आहे. त्यांच्या डाएट प्लॅन अगदी सोपा असून त्यात भारतीय पदार्थांचा अधिक समावेश आहे.

पत्ता: C1/101, सिल्व्हर ओक सोसायटी, बिशॉप स्कुल रोड, बँक ऑफ महाराष्ट्रच्या वर, कल्याणी नगर, पुणे

ऑफिस नंबर 5, पहिला मजला, गंगा कॅसकेड,नॉर्थ मेन गेट, पिझ्झा हटच्या बाजूला, कोरेगाव पार्क, पुणे

संपर्क: 020 4855 6151

4. डॉ. अर्चना रायरीकर (MSc – Dietitics / Nutrition, Post Graduation Diploma in Dietetics)

डॉ. अर्चना रायरीकर यांना या क्षेत्राचा 25 वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी मुंबईतील एसनएनडीटी विद्यापीठातून BSc. पूर्ण केली आहे. डॉक्टर अर्चना रायरीकर या  डेक्कन जिमखाना येथील साठे रुग्णालयात कार्यरत असून त्यांनी अनेकांना त्यांच्या आहारात मदत केली असून त्याचे आरोग्य सुधारण्यास मदत केली आहे.

पत्ता: साठे हॉस्पिटल, 759/4, पोस्ट ऑफिसवर, डेक्कन जिमखाना, पुणे

संपर्क: 020 4855 6725  EXT: 316

5. डॉ. झीनत खान (M.Sc Food Science and Nutrition, Diploma in Clinical Nutrition)

डॉ. झीनत खान यांना या क्षेत्राचा ८ वर्षांचा अनुभव आहे. हेल्दी आणि निरोगी आयुष्य जगण्यासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी आणि त्यांची पूर्तता कशी करायची हे याचा सल्ला त्या रुग्णांना देतात.

पत्ता: 216, मार्वेल संगारिया, अॅलन सोली शो रुमच्यावर, मोहम्मदवाडी, पुणे

संपर्क: 020 4855 2376

6. डॉ. नेहा पुंदीर (Post Graduation Diploma in Dietetics, B.Sc. – Home Science)

डॉ. नेहा पुंदीर यांना या क्षेत्राचा 5 वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी आतापर्यंत त्यांच्या रुग्णांना आहारासंदर्भात मदत केली आहे. देशातीलच नाही तर परदेशातूनही अनेक रुग्ण त्यांच्याकडे येतात. आहारात करायचे अगदी साधे साधे बदल सुचवण्यात  डॉ. नेहा अगदी परफेक्ट आहेत.म्हणूनच त्यांच्याकडे कायम गर्दी असते.

पत्ता:दुकान क्रमांक 112, पहिला मजला, सिलव्हर मिस्ट शॉपिंग प्लाझा, पोरवाल रोड, ऑर्किड हॉस्पिटल जवळ, लोहेगाव, धनोरी, पुणे

संजीवनी पॉलिक्लिनिक

302, गणेशम कमर्शिअल, प्लॉट E, गोल्डस जीम, पिंपळे सौदागर, पिंपळे सौदागर, पुणे

संपर्क: 020 7118 7083 EXT: 727

7. डॉ. अंबिका नायर (M.Sc – Clinical Nutrition)

डॉ. अंबिका नायर यांना या क्षेत्राचा 24 वर्षांचा अनुभव आहे. डॉ. अंबिका या बाणेर येथील ज्युपिटर हॉस्पिटल येथे कार्यरत असून त्यांनी मद्रास युनिव्हर्सिटीमधून आपले शिक्षण पूर्ण केलेले आहे. त्यांनी हजारो रुग्णांच्या आहारविषयक तक्रारी यशस्वीरित्या दूर केल्या आहेत. त्यामुळेच त्यांचे नाव आवर्जून सुचवले जाते.

पत्ता: ज्युपिटर हॉस्पिटल, बाणेर- पिपंळे निलख रोड, प्रथमेश पार्कजवळ , बाणेर, पुणे

संपर्क: 020 25884442

8. डॉ. श्वेता बंब (BSc – Dietitics / Nutrition, MSc)

डॉ. श्वेता बंब यांना या क्षेत्राचा तब्बल 13 वर्षांचा अनुभव आहे. फिलीपाईन्स, हाँगकाँग या देशातही त्यांनी अनेक रुग्णांना त्याच्या आहारात मदत केली आहे. वजन वाढवणे, कमी करणे, उत्तम आहार या बाबत त्यांनी अनेकांना मार्गदर्शन केले आहे.

पत्ता:C/0 मेडिएक्सप्रेस, 101/102,ग्रीम टॉवर्स,साळुंखे विहार रोड, साळुंखे विहार, पुणे

संपर्क: 020 26855959,9823011484

9. डॉ. श्रुती महेश्वरी (MSc – Dietetics / Nutrition)

डॉ. श्रुती महेश्वरी यांना या क्षेत्राचा 11 वर्षांचा अनुभव आहे. वैज्ञानिक म्हणून कार्यरत असलेल्या श्रुती कालांतराने डाएटिशन म्हणून काम करु लागल्या.  अमेरिकेत त्यांनी याचे शास्त्रशुद्ध प्रसिक्षण घेतले असून त्यांनी अनेकांच्या आहारविषयक तक्रारी दूर केल्या आहेत. प्रत्येकाच्या आयुष्यात आहाराचे महत्व अनन्यसाधारण आहे. म्हणूनच त्या भारतीयांना भारतीय पद्धतीचा योग्य आहार काय तो कसा घ्यावा या संदर्भात माहिती देतात. भारत आणि अमेरिका या दोन्ही ठिकाणी त्यांची प्रॅक्टिस सुरु आहे.

पत्ता: उमर्जीस मदर अँण्ड चाईल्ड केअर, सर्व्हे क्रमांक 13/1, बाणेर- बालेवाडी रोड, आदित्य शगुन कम्फर्ट झोनच्या शेजारी, बाणेर पुणे

संपर्क: 022 7117 7303 EXT- 677

10. डॉ. रिझवाना सय्यद (Post Graduation Diploma in Dietetics)

रिझवाना सय्यद यांना 18 वर्षांचा अनुभव आहे.  प्रुडन्ट इंटरनॅशनल हेल्थ क्लिनिकमध्ये त्या कार्यरत असून योग्य आहार, आहाराच्या वेळा या संदर्भात त्या मार्गदर्शन करतात. अत्यंत माफक दरात त्या आहारविषयक सल्ला देतात.

पत्ता: दुकान क्रमांक S1, तळमजला, दत्त मंदिर चौक, नियती मिलेनियम प्रिमायसेस, विमान नगर, पुणे

संपर्क: 020 26634331, 020 26634332, 02026634334

तुम्ही तर नाही ना कोणत्या मानसिक आजाराने त्रस्त

11. डॉ. मधुरा कावळे (B.Sc. – Home Science (Food & Nutrition), M.Sc Food Science & Nutrition)

डॉ. मधुरा कवळे यांना या क्षेत्राचा तब्बल 11 वर्षांचा अनुभव आहे. तुमच्या आहारासंदर्भातील सगळ्या तक्रारींवर त्या उत्तम आहार सांगतात. वजन वाढवणे, कमी करणे यावर त्या नैसर्गिक आहारपद्धती सांगतात. पुण्यातील लाईफ पॉईंट मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये त्या कार्यरत आहेत.

पत्ता: 145/1,मुंबई- बँगलोर  हायवे, भुमकर चौक, सयाजी हॉटेलजवळ, वाकड पुणे

संपर्क: 020 4855 3065 EXT:063

12. डॉ. वृषाली पंडित (BSc – Dietetics / Nutrition)

वृषाली पंडित यांना या क्षेत्राचा तब्बल 26 वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांना आहाराचा योग्य सल्ला दिला आहे. गर्भारपण आणि बाळ झाल्यानंतर नेमका आहार कसा असावा, सुंदर त्वचेसाठी आहार काय असायला हवा याचे योग्य मार्गदर्शन त्यांनी अनेकांना केले आहे.

पत्ता: 24,चित्रदूर्गा, पहिला मजला, क्षिप्रा सोसायटी, दामले हॉस्पिटल जवळ, कर्वे नगर, पुणे

संपर्क: 020 7118 8169

13. डॉ. नम्रता आनंद (BHMS, DNHE)

डॉ. नम्रता आनंद यांना तब्बल 18 वर्षांचा अनुभव आहे. केसगळती, वाढते वजन या संदर्भात अनेकांना त्यांनी समाधानकारक सल्ला दिला आहे.

पत्ता: शॉप क्रमांक 301, तिसरा मजला, व्हिजन मॉल, कुणाल आयकॉन, पिंपळे सौदागर, स्टार मार्केटवर, पिंपळे सौदागर, पुणे

संपर्क: 020 7117 7318 EXT: 614

14. डॉ. गीता देसाई (MSc – Dietetics / Nutrition, BSc – Dietetics / Nutrition)

डॉ. गीता देसाई यांना या क्षेत्राचा तब्बल 32 वर्षांचा अनुभव आहे. अनेक आजारांसाठी तुमचा आहार कसा कारणीभूत असतो याचे योग्य मार्गदर्शन या गीता देसाई करतात. त्याच्या 32 वर्षांच्या प्रदीर्घ अनुभवात त्यांनी अनेक रुग्णांच्या आयुष्यात बदल आणला आहे.त्या अनेक सामाजिक उपक्रमातही सहभागी होतात. त्यांनी अनेक मासिकांमधून आहाराचा सल्ला दिला आहे.

पत्ता: D1/16,शिरीन गार्डन, परीहार चौकाजवळ, औंध, पुणे

संपर्क: 020 20291299

15. डॉ. गीता धर्माटी (MSc – Dietitics / Nutrition, BSc – Dietitics / Nutrition)

डॉ. गीता धर्माटी यांना 12 वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी न्युट्रीशनमध्ये Phd केली असून त्यांनी अनेक रुग्णांच्या आयुष्यात आनंद आणला आहे.

पत्ता: 32-c वेस्टेंड प्लाझा, महादाजी शिंदे रोड. पिनाक जंक्शन, औंध, पुणे

संपर्क: 020 7117 7302 EXT:840

16. डॉ. जया देवानी (MBBS, Post Graduation Diploma in Dietetics)

डॉ. जया यांना या क्षेत्राचा  18 वर्षांचा अनुभव आहे.त्यांनी  MBBS पूर्ण केल्यानंतर त्यांनी डाएटिशचा डिप्लोमा केला.वेगवेगळ्या आजारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांना त्यांनी आतापर्यंत डाएटचा सल्ला दिसा आहे. त्यांच्या सल्ल्यामुळे अनेकांचे आयुष्य बदलले आहे.

पत्ता:  प्लॉट क्रमांक 37, फ्लॅट नंबर C 001, रिद्धी-सिद्धी संस्कृती कॉम्पलेक्स, सेक्टर 6, भोसरी इंडस्ट्रिअल इस्टेट, स्पाईन सिटी मॉलच्या जवळ, भोसरी, पुणे

संपर्क: 020 71177606

17. डॉ. मीना शर्मा (MSc – Dietitics / Nutrition)

डॉ. मीना शर्मा यांना या क्षेत्राचा तब्बल 5 वर्षांचा अनुभव आहे. स्थुलपणा आणि वजन नियंत्रणात ठेवणे या बाबतील त्या मार्गदर्शन करतात. आनंदी राहून चांगला आहार कसा घ्यायचा याचे योग्य मार्गदर्शन त्या करतात.

पत्ता: 1194/ 23, जनार्दन सदन, घोले रोड, MJM हॉस्पिटल, बालगंधर्वजवळ, शिवाजीनगर, पुणे

संपर्क: 022 7117 7321 EXT: 355

18. डॉ. रुपल जसानी (B.Sc. – Home Science – Food & Nutrition)

डॉ. रुपल जसानी यांना तब्बल 12 वर्षांचा अनुभव आहे. रुपल यांना वाटते की, जर तुम्ही योग्य आहार घेतला तर तुमचे 80 टक्के आजार दूर होऊ शकतात. त्यामुळे लोकांना आहारतज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक असते.

पत्ता:डॉ. खन्ना मल्टीस्पेशालिटी क्लिनिक, गाळा क्रमांक 20, कुणाल आयकॉन शॉपिंग कॉम्पलेक्स, शिवार गार्डन जवळ, पिंपळे सौदागर, पुणे

संपर्क: 020 7117 7219

EXT: 026

Post Graduate In Food Science And Nutrition

डॉ. तृप्ती खन्ना यांना या क्षेत्राचा तब्बल 9 वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी अनेक रुग्णांना समाधानकारक असा आरोग्यविषयक सल्ला दिला आहे.

पत्ता: ऑलिव्ह हेल्थ सेंटर, रॉ हाऊस नंबर 5, लुकांड गार्डन, HDFC बँकेच्या समोर. विमाननगर, पुणे

संपर्क:  20485 55878

MSc – Dietitics / Nutrition, Certificate in Food and Nutrition

डॉ. सुप्रिती दीक्षित यांना या क्षेत्राचा तब्बल 15 वर्षांचा अनुभव आहे. रुग्णांच्या आवश्यकतेनुसार त्या त्यांना डाएट प्लॅन पुरवतात. योग्य आहार कसा घ्यायला हवा याची योग्य माहती देत त्यांना योग्य आहाराचा सल्ला देतात.

पत्ता: D 1,2, पहिला मजला. सखाई प्लाझा बिल्डींग, DP रोड, यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाजवळ, कोथरुड, पुणे

संपर्क: 020 7117 7316 EXT: 017

पायाच्या दुखण्यावरील असे घरगुती उपाय जे तुम्हाला माहीत हवेत

BHMS, Diploma In Diet And Nutrition For Obesity Management

डॉ. स्मिता पाटील यांना या क्षेत्राचा 11 वर्षांचा अनुभव आहे. वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि उत्तम आरोग्यासाठी त्यांना डाएट हा परफेक्ट आहे.

पत्ता:206, संस्कृती आर्केड, कस्पटे वस्ती, छत्रपती चौकाजवळ,वाकड, पुणे

संपर्क: 020 71177323  EXT: 870

MSc – Dietitics / Nutrition, BSc – Dietitics / Nutrition

डॉ. अवंती देशपांडे यांना या क्षेत्राचा 18 वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी आहार विषयात अधिक काम केलेले आहे. आहाराविषयी सल्ला देताना त्या आहार या विषयावर अनेक ठिकाणी मार्गदर्शक सेमिनार्सदेखील घेतात.

पत्ता:  चित्रकुट अपार्टमेंट, पहिला मजला,श्री स्वामी समर्थ बंगलो, लॅक्मे सलोन शेजारी, प्रभात रोड, पुणे

संपर्क: 020 7117 1237

BSc – Dietetics / Nutrition, MSc – Dietitics / Nutrition, Post Graduation Diploma in Dietetics and Public Health Nutrition

डॉ. गितांजली बोरसे यांना या क्षेत्राचा तब्बल 7 वर्षांचा अनुभव आहे. कोणत्याही वयोगटासाठी त्या डाएटविषयक सल्ला देतात.

पत्ता: 851/1,वृदांली अपार्टमेंट, शिवाजीनगर, कमला नेहरु पार्क, भांडारकर रोड, पुणे

संपर्क: 020 7117 7304

 

Post Graduation Diploma in Dietetics

डॉ. भूमिका चौटालिया यांना या क्षेत्राचा 7 वर्षांचा अनुभव असून आहारासंदर्भातील सल्ला देत योग्य डाएट सांगतात.

पत्ता: 302, घनश्याम कमर्शिअल प्लॉट, गोविंद यशोदा चौक, गोल्ड्स जीमजवळ, पिंपळे सौदागर, पुणे

संपर्क: 20711 77318 EXT: 909

BHMS, Diploma in Dietetics, Health and Nutrition (DDHN)

डॉ. रोहिता गांधी यांना 18 वर्षांचा अनुभव असून त्या वजन वाढवणे, वजन कमी करणे, या सोबत उत्तम त्वचेसाठी नेमका कोणता आहार घ्यावा याचा सल्ला देखील त्या देतात.

पत्ता: घनश्याम, A,  पहिला मजला, गोविंद यशोदा चौक, साई पार्क सोसायटीसमोर, पिंपळे सौदागर, पुणे

संपर्क: 020 7117 7318 EXT: 968

वाचा, डेंग्यू संदर्भातील अशी माहिती जी सगळ्यांना माहीत असायलाच हवी

FAQs

1. योग्य आहार जाणून घेण्यासाठी डाएटिशनची गरज असते का? 

डाएटिशनचे काम तुम्हाला तुमचा योग्य आहार समजावून देणे असते. अयोग्य आहारामुळे जर तुमचे आरोग्य बिघडत असेल तर तुम्हाला योग्य आहार मिळणे आवश्यक आहे. तुम्ही घेत असलेल्या आहारातील पोषणतत्वे त्याचे फायदे आणि तोटे समजावून देण्याचे काम फक्त डाएटिशन करु शकते म्हणूनच डाएटिशनची गरज असते.

2. डाएटिशन डाएटसोबत काही व्यायामदेखील सांगते का? 

हल्ली वजन कमी करण्याचे फॅड आले आहे. त्यामुळे अनेक जण योग्य पद्धतीने वजन कमी करण्यासाठी डाएटिशनकडे जातात. डाएटिशन तुम्हाला तुम्हाला डाएट तर सुचवतेच पण  सोबतच तुम्हाला काही सोपे व्यायाम प्रकारदेखील डाएटिशनकडून सुचवले जातात. जे तुमची मदत करतात.

3. वजन कमी करण्यासोबत डाएटिशन कसला सल्ला देतात? 

वजन कमी करण्यासोबतच तुम्हाला तुमची प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी आणि दिवसभर ताजेतवाने राहण्यासाठी काय खायला हवे  हे देखील सांगितले जाते. उत्तम आरोग्यासाठीच्या अनेक टीप्स देखील तुम्हाला डाएटिशनकडून दिल्या जातात.

(फोटो सौजन्य – shutterstock)

You Might Like This:

Weight Loss Diet Plan In Marathi

Read More From Diet