Make Up Products

तेलकट त्वचेसाठी बेस्ट फाऊंडेशन | Best Foundation For Oily Skin In Marathi

Trupti Paradkar  |  Jul 15, 2020
Best Foundation For Oily Skin In Marathi

मेकअप करणं हे एक कौशल्य आहे. अचूक ज्ञान आणि योग्य मार्गदर्शनातून हे कौशल्य कुणीही साध्य करू शकतं. मेकअप करताना सर्वात जास्त महत्त्वाचं असतं ते त्वचेसाठी योग्य उत्पादनाचा वापर करणं. म्हणूनच मेकअप करण्यासाठी तुम्हाला तुमच्या त्वचेचा प्रकार आणि फांऊडेशन (Foundation)ची योग्य निवड करायला यायला हवं. अचूक प्रकार आणि शेडच्या फाऊंडेशनमुळे तुमचा स्कीन टोन एकसमान दिसण्यास मदत होते. ज्यामुळे तुमचा मेकअपमधील लुक अगदी परफेक्ट दिसतो. मात्र बऱ्याचदा होतं असं की फाऊंडेशन निवडण्यात चूक होते आणि तुमचा लुक खराब होतो. एकदा चुकून असं झालं तर मेकअप करण्याची भीती वाटून घेऊ नका. कारण जर तुमची त्वचा तेलकट स्वरूपाची असेल तर काही चुका नक्कीच त्रासदायक ठरू शकतात. यासाठी आधी जाणून घ्या तेलकट त्वचेसाठी केअर टिप्स (Oily Skin Care Tips In Marathi), तुमच्या तेलकट चेहऱ्यावर घरगुती उपाय (Home Remedies For Oily Skin In Marathi) तसंच वापरा हे तेलकट त्वचेसाठी बेस्ट वाईप्स | Best Wipes For Oily Skin In Marathi, तेलकट त्वचेसाठी बेस्ट क्लिंझर (Best Cleanser For Oily Skin In Marathi), तेलकट त्वचेसाठी फेस वॉश (Face Wash For Oily Skin In Marathi) तेलकट त्वचेसाठी उत्तम सनस्क्रिन | Best Sunscreen For Oily Skin. तसंच जाणून घ्या तेलकट त्वचेवर मेकअप करताना काय काळजी घ्यावी. 

Table of Contents

  1.  ट्रीट लव्ह केअर ऑईल कंट्रोल फाउंडेशन – Treat Love Care Oil Control Foundation
  2. मायग्लॅम पोझ एच डी फाउंडेशन स्टिक – MyGlamm Pose HD Foundation Stick
  3. मेबीलिन न्यूऑर्क फिट मी मॅट फाऊंडेशन – Maybelline New York Fit Me Matte+ Poreless Liquid Foundation
  4. लोटस हर्बल इको स्टे फाऊंडेशन – Lotus Herbals Eco-Stay Foundation SPF 20
  5. लॅक्मे 9 टू 5 वेटलेट मूस फाऊंडेशन – Lakme 9 to 5 Weightless Mousse Foundation
  6. मेबीलिन न्यूयॉर्क सुपर स्टे फूल कव्हरेज लिक्विड फाऊंडेशन – Maybelline New York Super Stay 24h Full Coverage Liquid Foundation
  7. पुडेयर लिक्विड फाऊंडेशन – Pudaier Liquid Foundation
  8. फेस कॅनडा वेटलेस मॅट फिनिश फाऊंडेशन – Faces Canada Weightless Matte Finish Foundation
  9. कलर क्वीन ऑइल फ्री रिअल बेस फाऊंडेशन – Colors Queen Oil-free Real Base Foundation
  10. मेबीलिन फिट मी ऑइल  फ्री स्टिक फाऊंडेशन – Maybelline Fit Me Oil Free Stick Foundation
  11. तेलकट त्वचेसाठी फाऊंडेशनबाबत मनात असलेले निवडक प्रश्न – FAQs

तेलकट त्वचेसाठी फाऊंडेशन वापरताना या गोष्टी ठेवा लक्षात – 

तेलकट त्वचा (Oily Skin) असणाऱ्या महिलांनी योग्य फाऊंडेशन निवडणं फार गरजेचं आहे. यासाठी जाणून घ्या कोणतं फाऊंडेशन तेलकट त्वचेसाठी बेस्ट आहे.

 ट्रीट लव्ह केअर ऑईल कंट्रोल फाउंडेशन – Treat Love Care Oil Control Foundation

तुमच्या तेलकट त्वचेसाठी तुम्ही एखादं बेस्ट फाऊंडेशन शोधत असाल, तर मायग्लॅमचं ट्रीट लव्ह केअर ऑईल कंट्रोल फाऊंडेशन नक्की ट्राय करा.  कारण हे तुमच्या त्वचेसाठी सुरक्षित आहेच, शिवाय यामुळे तुमची त्वचा मऊ आणि हायड्रेट राहण्यास मदत होते. यासाठी या फाऊंडेशनमध्ये वापरण्यात आले आहेत असे नैसर्गिक घटक जे तुमच्या त्वचेचा अतिरिक्त तेलाच्या निर्मितीपासून बचाव करतात. यातील सूर्यफुलाच्या बियांचे तेल आणि रोजमेरीचा अर्क तुमच्या त्वचेला इनफेक्शन रोखतं. या फाऊंडेशनमुळे तुमच्या त्वचेला नैसर्गिक आणि फ्लॉलेस कव्हरेज मिळतं. ज्यामुळे तुमची त्वचा बराच काळ फ्रेश दिसते. 

फायदे 

तोटे

मायग्लॅम पोझ एच डी फाउंडेशन स्टिक – MyGlamm Pose HD Foundation Stick

मायग्लॅमचं पोझ एचडी फाऊंडेशनदेखील तुम्ही नक्कीच वापरू शकता. कारण हे सर्व प्रकारच्या स्कीन टाइपचा विचार करून तयार करण्यात आलेलं आहे. हे फाऊंडेशन स्टिक फॉरमॅटमध्ये आणि क्रिमी असल्यामुळे त्वचेवर एकसमान पसरतं. यात वापरण्यात आलेल्या स्कीन कंडिशनिंग घटकांमुळे त्वचेवर एक प्रकारचा छान ग्लो येतो. मॅट फिनिश मुळे ते लवकर सेट होतं आणि बराच काळ तुमच्या त्वचेवर टिकू शकतं. 

फायदे

तोटे

मेबीलिन न्यूऑर्क फिट मी मॅट फाऊंडेशन – Maybelline New York Fit Me Matte+ Poreless Liquid Foundation

जर तुम्हाला त्वचेच्या तेलकटपणामुळे चेहऱ्यावर ओपन पोअर्सची समस्या जाणवत असेल तर हे उत्पादन तुमच्यासाठी अगदी परफेक्ट आहे. कारण यामध्ये अॅंटि शाईन पावडचे असे घटक आहेत जे तुमच्या चेहऱ्यावरील मोठ मोठे ओपन पोअर्स झाकून टाकतात. ज्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर एक स्मूद आणि सॉफ्ट ग्लो दिसू लागतो. शिवाय यामध्ये अठरा प्रकारच्या युनिक शेड्स उपलब्ध आहेत. ज्यामुळे तुमच्यासाठी परफेक्ट शेडचे फाऊंडेशन नक्कीच मिळेल. या शेड्स भारतीय त्वचेच्या रंगांचा विचार करून तयार करण्यात आलेले आहेत. 

फायदे –

तोटे –

लोटस हर्बल इको स्टे फाऊंडेशन – Lotus Herbals Eco-Stay Foundation SPF 20

लोटस कंपनीचं फाऊंडेशन हे असं एक उत्पादन आहे जे तुम्ही नियमित वापरू शकता. कारण यामुळे तुमचा चेहरा दिवसभर ऑईल फ्री राहण्यास मदत होते. शिवाय यामुळे तुमच्या संपूर्ण चेहऱ्याला चांगले कव्हरेज मिळू शकते. ज्यामुळे त्वचा एकसमान आणि सुंदर दिसते. शिवाय यातील नवीन ल्युमिनस फॉर्मुला तुमच्या त्वचेला फ्रेश आणि हायड्रेट ठेवतो. या फाऊंडेशनमुळे तुमच्या चेहऱ्यावरील फाईन लाईन्स आणि ओपन पोअर्स झाकण्यास मदत होते. ज्यामुळे त्वचा तेलकट होत नाही आणि दिवसभर एकसमान दिसते. 

फायदे –

तोटे  –

लॅक्मे 9 टू 5 वेटलेट मूस फाऊंडेशन – Lakme 9 to 5 Weightless Mousse Foundation

लॅक्मे बॅंडचे हे फाऊंडेशन खास तेलकट त्वचेचा विचार करून तयार करण्यात आलेले आहे. यात एक असा लाईटवेट फॉर्म्युला वापरण्यात आलेला आहे ज्यामुळे तुमचा चेहरा ऑईल फ्री राहतो. तुम्ही हे फाऊंडेशन नेहमी अगदी कॉलेज अथवा ऑफिसला जातानाही वापरू शकता. कारण ते तुमच्या त्वचेत इतक्या सहज मुरतं की तुमच्या त्वचेचाच एक भाग आहे असं वाटू लागतं. ज्यामुळे फाऊंडेशन लावूनही तुमची त्वचा पॅची दिसत नाही. शिवाय हा मॅट फिनिश इफेक्ट तुमच्या चेहऱ्यावर दिवसाचे 24 तास तसाच राहतो. या फाऊंडेशनमध्ये विविध शेड्स उपलब्ध आहेत. 

फायदे –

तोटे –

मेबीलिन न्यूयॉर्क सुपर स्टे फूल कव्हरेज लिक्विड फाऊंडेशन – Maybelline New York Super Stay 24h Full Coverage Liquid Foundation

मेबिलिन कंपनीने तयार केलेलं हे आणखी एक फाऊंडेशन ऑईली त्चचेसाठी उपयुक्त असं आहे. तुम्ही या फाऊंडेशनचा वापर करून एखाद्या प्रोफेशनल मेकअप आर्टिस्टप्रमाणे मेकअप करू शकता. यात वापरण्यात आलेल्या फॉर्म्युला तुमच्या त्वचेला दिवसभर फ्रेश ठेवतो. शिवाय लाईटवेट असल्यामुळे ते तुमच्या त्वचेत व्यवस्थित मुरतं. दिवसभर ऑईल फ्री इफेक्ट मिळाल्यामुळे तुमचा लुक अगदी परफेक्ट दिसतो. विशेष म्हणजे या फाऊंडेशनमुळे तुमचे ओपन पोअर्स झाकले जाऊनही बंद होत नाहीत. ज्यामुळे तुमच्या त्वचेला ऑक्सिजनचा पूरवठा होतो आणि तुम्हाला ताजेतवाने वाटत राहते. 

फायदे –

तोटे –

पुडेयर लिक्विड फाऊंडेशन – Pudaier Liquid Foundation

फाऊंडेशन निवडताना योग्य काळजी घेतली तर मेकअपमध्ये तुमचा लुक नक्कीच चांगला दिसू शकतो. या फाऊंडेशनमुळे तुम्हाला एक ग्लॉसी फिनिश लुक मिळू शकतो. शिवाय हे सर्व प्रकारच्या स्कीन टोनसाठी वापरता येऊ शकते. ज्यामुळे तुमची त्वचा उजळ, नैसर्गिक आणि सुंदर दिसते. यातील पाण्याच्या घटकांमुळे तुमची त्वचा हायड्रेट राहण्यास मदत होते. तुम्ही याचा वापर कोणत्याही कार्यक्रमात मेकअप करण्यासाठी करू शकता. वेडिंग पार्टी, डान्स, पूल पार्टी, फिटनेस अशा अॅक्टिव्हिटीजमध्येही ते खराब होत नाही. 

फायदे –

तोटे –

फेस कॅनडा वेटलेस मॅट फिनिश फाऊंडेशन – Faces Canada Weightless Matte Finish Foundation

या मॅट फिनिश फाऊंडेशनमुळे तुम्हाला एकसमान लुक मिळू शकतो. शिवाय ते तुमच्या त्वचेत लवकर मुरत असल्यामुळे चेहरा तेलकट दिसत नाही. फार खर्चिक नसल्यामुळे खिषाला परवडणारे असे हे एक उत्पादन आहे. यामध्ये विविध शेडस् उपलब्ध असून तुम्ही या फाऊंडेशनचा वापर एखाद्या  खास कार्यक्रमासाठी अथवा दैनंदिन वापरासाठी देखील करू शकता. 

फायदे –

तोटे –

कलर क्वीन ऑइल फ्री रिअल बेस फाऊंडेशन – Colors Queen Oil-free Real Base Foundation

हे एक लिक्विड बेस फाऊंडेशन आहे. जे तुमच्या त्वचेवर व्यवस्थित पसरते आणि तुमच्या त्वचेत सहज मुरते. ऑईल फ्री असल्यामुळे या फाऊंडेशचा वापर केल्यामुळे तुमची त्वचा तेलकट दिसत नाही. यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील काळे डाग, व्रण, डार्क सर्कल्स, पॅची स्कीन झाकली जाऊन त्वचा एकसमान दिसते. यात अशा फॉर्म्युलाचा वापर करण्यात आला आहे ज्यामुळे त्वचा हाडड्रेट राहण्यास मदत होते. शिवाय ते लॉंग लास्टिंग असूनही तुमचा चेहरा दिवसभर टवटवीत दिसू शकतो. 

फायदे –

तोटे –

मेबीलिन फिट मी ऑइल  फ्री स्टिक फाऊंडेशन – Maybelline Fit Me Oil Free Stick Foundation

मेकअप केल्यावर चेहरा सुंदर दिसण्यासाठी फुल कव्हरेज देणाऱ्या फाऊंडेशनची गरज असते. या स्टीक स्वरूपात असणाऱ्या फाऊंडेशनमुळे तुमच्या चेहऱ्याला नॅचरल कव्हरेज मिळते. ज्यामुळे तुमची त्वचा अधिक फ्रेश दिसण्यास मदत होते. नैसर्गिक उजळपणा दिसण्यासाठी अशाप्रकारच्या फाऊंडेशनचा वापर करणं गरजेचं आहे. लाईटवेट असल्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील पिंगमेंटेशनच्या खुणा यामुळे झाकल्या जाऊ शकतात. त्यामुळे जरी तुम्हाला पूर्ण चेहऱ्यावर याचा वापर करायचा नसला तरी स्कीन टोन एकसारखी करण्यासाठी तुम्ही हे फाऊंडेशन नक्कीच वापरू शकता. 

फायदे –

तोटे –

तेलकट त्वचेसाठी फाऊंडेशनबाबत मनात असलेले निवडक प्रश्न – FAQs

प्रश्न – तेलकट त्वचेसाठी लिक्विड फाऊंडेशन वापरावे का ?

उत्तर – तेलकट त्वचेवर लिक्विड फाऊंडेशन वापरण्यास काहीच हरकत नाही. कारण यामुळे तुमच्या त्वचेला सॉफ्ट आणि मॅट फिनिश लुक मिळतो. शिवाय तुमची त्वचा ऑईल फ्री राहते. याऊलट पावडर अथवा कोरड्या स्वरूपाच्या फाऊंडेशनमुळे तुमच्या त्वचेतील तेल बाहेर येण्याची शक्यता असते. ज्यामुळे मेकअपनंतर त्वचा अधिक तेलकट दिसू शकते. 

प्रश्न – फाऊंडेशनमुळे पिंपल्स येतात का ?

उत्तर – फाऊंडेशनचा वापर केल्यामुळे तुम्हाला एक्ने अथवा पिंपल्स नक्कीच येत नाहीत कारण फाऊंडेशनमुळे तुमचे ओपन पोअर्स फक्त झाकले जातात ते पूर्ण बंद होत नाहीत. मात्र जर तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी मेकअप व्यवस्थित काढला नाही तर मात्र तुम्हाला एक्ने आणि त्वचेच्या समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. 

प्रश्न – एक्ने असलेल्या त्वचेवर फाऊंडेशनचा वापर कसा करावा ?

उत्तर – एक्ने असलेल्या चेहऱ्यावर मेकअप करण्यापूर्वी चेहरा व्यवस्थित स्वच्छ करावा. फाऊंडेशन लावण्यापूर्वी त्वचेवर मॉश्चराईझर, बीबी क्रीम, सीसी क्रीम अथवा एखादे स्कीन केअर उत्पादन लावावे. शिवाय फाऊंडेशन लावण्यासाठी ज्या साधनांचा वापर केला जाणार आहे. जसे की, मेकअप ब्रश, ब्लेंडर अथवा हाताची बोटे ते स्वच्छ असतील याची काळजी घ्यावी. 

प्रश्न – पावडर बेस फाऊंडेशनचा तेलकट त्वचेसाठी वापर करणे योग्य आहे का ?

उत्तर – जर तुमची त्वचा तेलकट असेल तर पावडर बेस फाऊंडेशनचा वापर न करणंच योग्य राहील. कारण जर तुमच्या  तेलकट त्वचेवर पावडर बेस फाऊंडेशन लावलं तर त्यामुळे तुमच्या त्वचेचे पोअर्स बंद होऊन त्यातून अधिक तेलाची निर्मिती होण्याची शक्यता असते. 

प्रश्न – तेलकट त्वचेवर फाऊंडेशन लावताना काय काळजी घ्यावी ?

उत्तर – तेलकट त्वचेवर फाऊंडेशन लावण्यापूर्वी काही स्कीन केअर रूटीन्स अवश्य फॉलो करावेत. जसे की आधी चेहरा स्वच्छ करणे, मॉश्चराईझर, प्रायमरचा वापर करणे. या साध्या मेकअप टेकनिकमुळे तुमचा चेहरा मेकअपमध्येही दिवसभर फ्रेश दिसू शकतो. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

Read More From Make Up Products