Diet

पोट स्वच्छ राहण्यासाठी नियमित खा ही फळं

Trupti Paradkar  |  May 11, 2022
Best Fruits to Keep Your Colon Clean

पोटाची स्वच्छता नियमित वेळच्या वेळी व्हायला हवी. कारण जर पोट साफ नसेल तर अनेक आजारपणं मागे लागतात. अपचन, बद्धकोष्ठता, मुळव्याध या समस्या यामुळे निर्माण होतात. यासाठी असा आहार असावा ज्यामुळे तुमचे पोट वेळच्या वेळी स्वच्छ राहील. संडासावाटे पोटातील टॉक्सिन्स बाहेर पडण्यामुळे पोट साफ होतेच पण तुमच्या आरोग्यावरही याचा चांगला परिणाम होतो. यासाठी आहारात अशा फळांचा सहभाग असायला हवा ज्यामुळे तुमच्या पोटाची स्वच्छता राखली जाईल. 

Best Fruits to Keep Your Colon Clean

पोट स्वच्छ करणारी फळं

पोट साफ करण्यासाठी अनेक लोक औषधांची मदत घेतात. मात्र जर त्याऐवजी नियमित ही फळं खाल्ली तरी तुमचे पोट नियमित स्वच्छ राहील.कारण या फळांमध्ये नैसर्गिक फायबर्स आणि लॅक्सेटिव्ह गुणधर्म असतात. ज्यामुळे तुमची पचनशक्ती सुधारते आणि पोट साफ राहण्यास मदत होते.

केळं –

केळं हे अतिशय पोषक आणि फायबरयुक्त फळ आहे. महत्त्वाचं म्हणजे इतर फळांच्या तुलनेत केळं स्वस्त असल्यामुळे सर्वसामान्यांही ते परवडू शकतं. दररोज एक केळं खाण्यामुळे तुमचं पोट तर स्वच्छ होतंच शिवाय तुम्हाला त्वरीत एनर्जीदेखील मिळते. केळ्यामध्ये थोड्या प्रमाणात लॅक्सेटिव्ह गुणधर्मही असतात. ज्यामुळे सकाळी उपाशीपोटी केळं खाल्यास तुम्हाला लगेच सौचाला होते. 

पपई –

पोट साफ राहण्यासाठी नियमित पपई खायला हवं. कारण पपईमध्ये भरपूर प्रमाणात लॅक्सेटिव्ह असतं. ज्यामुळे तुम्हाला बद्धकोष्ठतेचा त्रास कधीच होत नाही. सकाळी अथवा संध्याकाळी पपई खाणं तुमच्या आरोग्यासाठी नक्कीच फायद्याचं ठरेल. ज्यांना पोटाच्या समस्या अथवा अपचनाचा त्रास होत असेल अशा लोकांनी आहारात पपईचा समावेश करावा. 

सफरचंद –

सफरचंदामध्ये भरपूर प्रमाणात फायबर्स असतात. ज्यामुळे तुमची पचनशक्ती सुरळीत होते. जर तुम्हाला सतत अपचन अथवा अॅसिडिटीचा त्रास होत असेल. नियमित पोट स्वच्छ होत नसेल. तर तुम्ही दररोज एक सफरचंद खायला हवं. कारण असं म्हणतात की “अॅन अॅपल अ डे कीप्स दी डॉक्टर अवे” उत्तम आणि निरोगी आरोग्यासाठी एक सफरचंद प्रत्येकाने खायला हवं.

संत्री –

संत्री खाण्यामुळेही तुमचे पोट नियमित स्वच्छ होऊ शकते. कारण संत्र्यांमधून चांगले फायबर्स तुमच्या पोटात जातात. फायबरयुक्त पदार्थ खाण्यामुळे तुमच्या पोटातील घाण आणि अस्वच्छता बाहेर टाकण्यास मदत होते. फायबरमुळे पचनक्रिया चांगली होते ज्यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास होत नाही. म्हणूनच संत्र्यांच्या सीझनमध्ये भरपूर संत्री खा आणि निरोगी राहा.

पेरू – 

पोट साफ करणाऱ्या पदार्थांमध्ये आवर्जून समावेश करायला हवा असं आणखी एक फळ म्हणजे पेरू, कारण पेरूमध्येही फारबर्स भरपूर असतात. पेरूच्या बियांमध्ये लॅक्सेटिव्ह गुणधर्म असतात. ज्यामुळे पेरू खाण्यामुळे तुमचे पोट नैसर्गिक पद्धतीने स्वच्छ होते. पेरूचं फळ, पान आणि बिया सर्वच आरोग्यासाठी लाभदायक ठरतात. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा   MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक

Read More From Diet