मनोरंजन

हळदीसाठी खास बॉलीवूडची गाणी, तुमचेही पाय थिरकतील

Dipali Naphade  |  Nov 15, 2021
haldi songs

“दिन शगना दा चढे़या आओ सखियों नि वेहरा सजेया” गाणं वाजल्यानंतर आपोआपच आपल्या डोळ्यापुढे आपल्या लग्नाचे प्लॅन सुरू होतात. लग्न म्हटल्यानंतर सर्वात जास्त उत्सुकता असते ती म्हणजे हळद आणि संगीत. आपल्याकडे हळदीमध्ये मराठी गाणी तर आपण वाजवतोच पण हिंदी बॉलीवूड गाण्याशिवाय हळद अपूर्णच आहे. मग अशावेळी आपल्याला जर आधीपासून गाणी माहीत असतील तर प्लॅन करणे सोपे होते. आपली प्लेलिस्ट दिली की काम झालं. अशीच काही बॉलीवूडची गाणी तुमची हळद करतील खास. तुम्हीही बनवा हळदी गाण्याची (haldi ceremony songs hindi) लिस्ट आणि करा धमाल. पाहूया अशी कोणती गाणी आहेत.

नवराई माझी लाडाची 

इंग्लिश विंग्लिश चित्रपटातील श्रीदेवीवरील छायाचित्रीत करण्यात आलेले हे गाणे कुठेही वाजले तरी आपोआपच पाय थिरकायला लागतात. अगदी लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत सगळेच या गाण्याची मजा घेतात. मराठी गाण्यापासून प्रेरित असणारे हे गाणे हिंदीमध्येही खूपच गाजले. सुनिधी चौहानचा आवाज असणारे हे गाणे तर हळदीला वाजायलाच हवे. 

अधिक वाचा – पावसाचा आनंद द्विगुणित करतील ही मराठी रोमॅंटिक गाणी (Marathi Romantic Rain Songs)

बन्नो रे बन्नो

ये जवानी है दीवानी चित्रपटातील हळदीच्या सिक्वेन्सचे हे गाणे सर्वांनाच आवडते. मित्रमैत्रिणीच्या लग्नात हे गाणे तर हमखास वाजवायला हवे. त्यातील ‘बन्नो री बन्नो मेरी चली ससुराल को’ ही लाईन तर सगळ्यांनाच आपलीशी वाटते. तुम्हीदेखील तुमच्या हळदीमध्ये हे गाणे नक्कीच लाऊ शकता. तुमच्या बेस्ट फ्रेंडच्या लग्नात खास तिच्यासाठी तुम्ही या गाण्यावर परफॉर्मन्सदेखील करू शकता. 

वाचा – Haldi Ceremony Quotes In Marathi

काला शा काला 

हळदीच्या गाण्याची प्लेलिस्ट तोपर्यंत पूर्ण होत नाही जोपर्यंत 90 च्या दशकातील गाणी वाजत नाहीत. काला शा काला हे त्यातीलच एक गाणं. आजही आपल्याकडे हळदीसाठी अशी पेपी साँग्ज हवीच असतात आणि त्यातील हे एक गाणं आहे. कोणत्याही पद्धतीचं लग्न असो हे पंजाबी गाणं तर हवंच !

अधिक वाचा – (Marathi Wedding Songs) लग्नसराईमध्ये या 15 मराठी लग्नाची गाणी वाजवा

गल मिठ्ठी मिठ्ठी 

आएशा या हिंदी चित्रपटातील एक मजेदार गाणं म्हणजे गल मिठ्ठी मिठ्ठी बोल. सोनम कपूर आणि अभय देओलवर चित्रित हे गाणं नवरा – नवरी आणि त्यांच्या मित्रमैत्रिणींसाठी हळदीमध्ये वाजणं नक्कीच खास आहे. तुम्ही तुमच्या हळदी गाण्याची लिस्ट अजून तयार केली नसेल तर नक्की या गाण्याचा समावेश करून घ्या. तसंच लग्न गडबडीत मैत्रिणीकडून मराठी उखाणेची तयारी करून घ्यायला विसरू नका.

तुळशी विवाहानिमित्ताने शेअर करा तुळशी विवाह स्टेटस

बन्नो तेरा स्वॅगर 

तनू वेड्स मनू चित्रपटातील या गाण्याने तर धमाल केली होती. आता प्रत्येक लग्नाच्या हळदीसाठी हे गाणं तर प्लेलिस्टमध्ये असायलाच हवे. स्वॅगने भरलेल्या या गाण्याचे बीट्सच नाचायला भाग पाडतात. हळदीसाठी यापेक्षा जास्त धमाकेदार गाणं ते काय असणार? 

गल्ला गुडिया

लग्नाच्या घरात गडबड आणि धमाल नसेल तर अजिबातच मजा येत नाही. दिल धडकने दो या चित्रपटातील संपूर्ण कुटुंबाला एकत्र आणणारे गाणे म्हणजे गल्ला गुडिया. हळदीची मजा दुप्पट करण्यासाठी हे गाणं तर आपल्या प्लेलिस्टमध्ये हवंच. या गाण्याचे बीट्स तुम्हाला एक वेगळीच नशा चढवतात हे मात्र नक्की. 

अधिक वाचा – ब्रेकअप झाल्यानंतर हमखास रडवतात ही ११ ब्रेकअप गाणी (Marathi Breakup Songs)

नचदे ने सारे 

कतरिना कैफवर चित्रित झालेले हे गाणेदेखील हळदीसाठी अप्रतिम आहे. बार बार देखो या चित्रपटातील हे गाणे हळदीसाठी नक्कीच चांगले ठरते. संपूर्ण कुटुंब या गाण्यावर नाचू शकते. तुम्ही तुमच्या प्लेलिस्टमध्ये आताच हे गाणे समाविष्ट करून घ्या. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

Read More From मनोरंजन