लग्नसराई

मुंबईतील हे बेस्ट वेडिंग फोटोग्राफर्स तुम्हाला माहीत आहेत का (Photographers In Mumbai)

Trupti Paradkar  |  Oct 22, 2019
मुंबईतील हे बेस्ट वेडिंग फोटोग्राफर्स तुम्हाला माहीत आहेत का (Photographers In Mumbai)

लग्नसोहळा हा प्रत्येक कपलसाठी खूपच खास असतो. यासाठीच या सोहळ्यातील प्रत्येक क्षण आयुष्यभर जपून ठेवण्यासाठी लग्नात बेस्ट फोटोग्राफर्सची निवड केली जाते. भविष्यात पुन्हा पुन्हा ते क्षण अनुभवण्यासाठी फोटो आणि व्हिडिओ तुमच्या नक्कीच मदतीचे असतात. आजकाल लग्नाच्या फोटोग्राफीमध्ये अनेक  आधूनिक बदल झाले आहेत. ज्यामुळे तुमचा लग्नसोहळा एखाद्या सेलिब्रेटीप्रमाणे अविस्मरणिय होऊ शकतो. मात्र त्यासाठी लग्नाआधीच तुम्हाला याबाबत पुरेशी माहिती माहीत असणं गरजेचं आहे. यासाठीच आम्ही तुम्हाला सध्याचे फोटोग्राफी ट्रेंड आणि मुंबईतील काही बेस्ट फोटोग्राफर्सची लिस्ट देत आहोत.

वेडिंग फोटोग्राफीचे नवे ट्रेंड (Latest Photography Trends)

लग्नाचे फोटो काढण्यासाठी आजकाल नवनवीन ट्रेंड मार्केटमध्ये येत आहेत. तुमच्या लग्नसोहळ्याची थीम काय आहे यावरून तुम्ही यापैकी काही ट्रेंड फॉलो करू शकता.

प्री-वेडिंग फोटोशूट (Pre-Wedding Photoshoot)

लग्नसोहळ्यातील प्रत्येक विधींचे फोटो काढले जातातच. मात्र आजकाल प्री-वेडिंग फोटोग्राफीचा ट्रेंड आहे. लग्न ठरल्यापासून ते लग्नापर्यंतचा काळ हा  सुवर्णकाळ असतो असं म्हणतात. कारण या काळात वधू आणि वराच्या आयुष्यात अनेक नव्या गोष्टी घडत असतात. सहजीवनाची सुरुवात करण्यापूर्वी एकमेकांना जवळून ओळखण्यासाठी अनेकदा ते भेटतात, बोलतात, रूसतात, भांडतात आणि पुन्हा एकमेकांचा रूसवा काढतात.  अशा या गोड आठवणी आयुष्यभर लक्षात ठेवण्यासाठी प्री-वेडिंग फोटोग्राफी केली जाते. या काळात वेगवेगळ्या फेमस लोकेशनवर जाऊन प्री-वेडिंग फोटोज काढले जातात. काही लोक तर एखाद्या सिनेमाप्रमाणे त्यांची लव्हस्टोरी सांगणारा एखादा रोमॅंटिक व्हिडिओज शूट करतं. ज्यामुळे वधू आणि वराची एकमेकांशी खऱ्या अर्थाने ओळख होते. 

Instagram

डेस्टिनेशन वेडिंग फोटोशूट (Destination Wedding Photoshoot)

आजकाल डेस्टिनेशन वेडिंगला खूप मागणी आहे. त्यामुळे लग्नसोहळ्याचे विधी शहरापासून दूर एखाद्या रमणीय ठिकाणी केले जातात. यासाठी अनेक ठिकाणं प्रसिद्ध आहेत. जर तुम्ही डेस्टिनेशन वेडिंग करणार असाल तर नेहमीच्या लग्नसोहळ्यापेक्षा थोडी हटके  वेडिंग फोटोग्राफी केली जाते. ज्यामध्ये त्या ठिकाणानुसार पेहराव आणि मेकअप करण्यावर भर दिला जातो. डेस्टिनेशन वेडिंगमध्ये साखरपुडा, हळद, संगीत, लग्नातील विधी अशा विविध विधींसाठी वेगवेगळी थीम डिझाईन केली जाते. ज्यामुळे तुमचे फोटो नक्कीच खास होऊ शकतात.

ड्रोन वेडिंग फोटोग्राफी अथवा व्हिडिओग्राफी (Drone Wedding Photography)

काही शहरांमध्ये ड्रोन चा वापर करण्यास मनाई असली तरी आजकाल लग्नसोहळ्यांमध्ये ड्रोनने शूटिंग केलं जातं. विषेशतः डेस्टिनेशन वेडिंग करताना तुम्ही ज्या ठिकाणाची निवड केली आहे तिथला निसर्ग आणि तुमची वेडिंग थीम ड्रोनमुळे उत्तम पद्धतीने कव्हर करता येते. 

वाचा – मुंबईतील 5 बेस्ट बँक्वेट हॉल (Top Banquet Halls in Mumbai)

लग्नाच्या दिवशी लाईव्ह स्लाईड – शो (Live Wedding Slideshow)

आजकाल असाही एक ट्रेंड मोठ्या प्रमाणावर प्रचलित होत आहे. लग्नविधी तुम्ही काही निमंत्रकांच्या साक्षीने केले आणि संध्याकाळी अथवा दुसऱ्या दिवशी रिसेप्शन ठेवलं असेल. तर रिसेप्शनला तुम्ही तुमच्या लग्नातील सोहळ्याचे फोटो स्लाईडशोच्या माध्यमातून इतरांना दाखवू शकता. ज्यामुळे त्यांनाही लग्नात सहभागी झाल्याचा आनंद मिळू शकेल.

लग्नाआधी टीझर प्रदर्शित करणं (Wedding Teaser)

लग्नसोहळा जसजसा जवळ येऊ लागतो तसतशी वधू आणि वराच्या मनातील हूरहूर वाढू लागते. जर तुम्ही तुमच्या मनातील हूर हूर इतरांना सांगू इच्छिता तर तुम्ही एखाद्या चित्रपटाप्रमाणे कांऊटडाऊन देण्यासाठी  पोस्टर, टीझर काही दिवस आधी प्रदर्शित करू शकता. जसं की सोशल मीडियावर लग्नासाठी दहा दिवस बाकी, पाच दिवस बाकी असे फोटो टाकून शेवटच्या दोन दिवस आधी टीझर आणि ट्रेलरप्रमाणे तुमचे प्री-वेडिंग व्हिडिओज तुम्ही प्रदर्शित करू शकता.  

मुंबईतील बेस्ट फोटोग्राफर्स (Best Wedding Photographers In Mumbai)

जर तुम्हाला तुमचा लग्नसोहळा आयुष्यभर लक्षात राहील असा करायचा असेल तर त्यासाठी उत्तम फोटोग्राफरची निवड करणं गरजेचं आहे. कारण आधूनिक तंत्रज्ञान आणि कौशल्याचा वापर करून काढलेले तुमचे फोटो आणि व्हिडिओज तुमचा लग्नसोहळा नक्कीच अविस्मरणीय करू शकतात. 

1. दी वेडिंग फोटोग्राफी (The Wedding Story)

दी वेडिंग स्टोरी हे मुंबईतील  एक बेस्ट फोटोग्राफर आणि सिनेमॅटोग्राफर आहेत. जे तुमचा लग्नसोहळा अगदी बेस्ट करू शकतात. रोमॅंटिक फोटोग्राफीमध्ये स्पेशलिटी असल्यामुळे दी वेडिंग फोटोग्राफी तुमच्या लग्नसोहळ्याती क्षणांना एका सुंदर कथेप्रमाणे जगासमोर मांडते. जेव्हा तुम्ही तुमच्या लग्नाचे फोटो पाहाल तेव्हा कदाचित तुम्हाला यावर विश्वासच बसणार नाही की हे तुमचे फोटो आहेत.  दी वेडिंद फोटोग्राफीने अनेक सेलिब्रेटीजचे विवाहसोहळे कव्हर केलेले आहेत. 

वेडिंग फोटोग्राफीचा खर्च –

तुम्हाला लग्नसोहळा कसा करायचा आहे यावर तुमच्या वेडिंग फोटोग्राफीचा खर्च अवलंबून आहे. 

2. रिल्स अॅंड फ्रेम्स (Reels and Frames)

आनंद राठी यांनी सुरू केलेली रिल्स अॅंड फ्रेम्स ही एक नामांकित आणि पुरस्कारप्राप्त फोटोग्राफी आणि फिल्म्स ही कंपनी आहे. आनंद राठी यांनी अमेरिकेतून एमबीए केलेलं आहे. मात्र त्यांना या क्षेत्राविषयी जास्त आवड होती म्हणून त्यांनी प्रोफेशनल फोटोग्राफीला सुरूवात केली. आज ते मुंबईतील एक लोकप्रिय  वेडिंग फोटोग्राफर म्हणून ओळखले जातात. सोनम कपूरचा लग्नसोहळा त्यांनी कव्हर केला होता. 

वेडिंग फोटोग्राफीचा खर्च-

लोकप्रिय ब्रॅंड असल्यामुळे या कंपनीतून जर तुम्हाला लग्नसोहळा शूट करून घ्यायचा असेल तर कमीतकमी चार लाखांपासून त्यांच्या पॅकजला सुरूवात होते.

3. शेड्स फोटोग्राफी इंडिया (Shades Photography India)

अश्विन आणि झलक या जोडीने सुरू केलेली शेड्स फोटोग्राफी इंडिया फोटोग्राफी तुमच्या लग्नातील विधींमध्ये चारचॉंद नक्कीच लावेल. फोटोग्राफी हे या दोघांचंही पॅशन आहे. ज्यामुळे तुमच्यासोबत मिळून मिसळून ते तुमच्यासाठी तुमच्या मनाप्रमाणे फोटग्राफीचा प्लॅन तयार करतात. 

वेडिंग फोटोग्राफीचा खर्च –

तुमच्या सोयीनुसार फोटोग्राफी केली जाते ज्यामुळे फोटोग्राफीचा खर्च तुमच्या संकल्पनेनुसार ठरवण्यात येतो. 

4. दी चीजकेक प्रोजेक्ट (The Cheesecake Project)

स्टुटी दासगुप्ता आणि तिची टीम तुमच्या लग्नाच्या आठवणी जपण्याचं काम अगदी कौशल्याने करते. जर तुम्ही याआधी कधीच कॅमेरा फेस केला नसेल अथवा तुम्हाला कॅमेरा फेस करण्याची भिती वाटत असेल. तर मुळीच काळजी करू नका कारण ही टीम तुमचे अगदी सहजपणे फोटो काढण्यात तरबेज आहे. ज्यामुळे तुम्ही मुळीच कंटाळत नाही. 

वेडिंग फोटोग्राफीचा खर्च –

या कंपनीचं वेडिंग फोटोग्राफीचं बजेट जवळजवळ साडेचार लाखांपासून सुरू होतं. 

5. ड्रिम डायरिज (Dream Diaries)

या फोटोग्राफी कंपनीच्या नावातच तुमच्या स्वप्नांची झलक तुम्हाला दिसू शकते. तुमच्या लग्नाचे फोटो अगदी स्वप्नवत वाटावेत इतके सुंदर ते काढतात. या टीममध्ये प्रोफेशनल सिनेफोटोग्राफर्स आणि फोटोग्राफर्स आहेत. ज्यामुळे ते तुमच्या वेडिंगचा आणि प्री-वेडिंगचा व्हिडिओ  अगदी प्रोफेशनल पद्धतीने करतात. 

वेडिंग फोटोग्राफीचा खर्च –

साधारणपणे वेडिंग फोटोग्राफीचा खर्च तीन लाखांपासून पुढे सुरू होतो.

6. नॉटिंग बेल (Knotting Bells)

जर तुमच्या मनात सनईचे सुर घुमू लागले असतील आणि मंगलाष्टका चक्क कानात ऐकू येत असतील तर आता जास्त वेळ मुळीच दवडू नका. मुंबईतील नॉटिंग बेल ही कंपनी तुमच्या वेडिंग फोटोग्राफीसाठी अगदी बेस्ट आहे. तुमचा लग्नातील आनंद ते अशा पद्धतीने  कॅप्चर करतील की तो तुम्ही कधीच विसरू शकणार नाही. शिवाय यांचं बजेट कमी असल्यामुळे ते तुम्हाला खिषालाही परवडेल. 


वेडिंग फोटोग्राफाचा खर्च –

तुमच्या लग्नाच्या फोटोग्राफीचा खर्च अंदाजे दोन लाखांपर्यंत असू शकतो. 

7. जोडी क्लिकर्स (Jodi Clickers)

आजकाल वेडिंग फोटोग्राफीमध्ये विविध ट्रेंड येत आहेत. ज्यामुळे स्टील फोटोज प्रमाणे वधू आणि वरांमध्ये व्हिडिओजचं क्रेझ दिवसेंदिवस वाढतच आहे. जोडी क्लिकर्स कंपनी तुमच्या या क्षणांना अगदी एखाद्या सिनेमाप्रमाणे शूट करते.  ज्यामुळे तुमच्या या आठवणी नक्कीच खास आणि बेस्ट होतील. 

वेडिंग फोटोग्राफीचा खर्च  – अंदाजे दोन लाखांपर्यंत

8. रिकॉल पिक्चर्स (Recall Pictures)

रिकॉल पिक्चर्सला वेडिंग फोटोग्राफीसाठी अनेक मोठमोठे पुरस्कार मिळालेले आहेत. या कंपनाची उद्देश जीवन एखाद्या सणाप्रमाणे साजरा करणे हेच आहे.  ज्यामुळे आजही रिकॉल पिक्चर्स वेडिंग फोटोग्राफर्सच्या टॉप लिस्टमध्ये आहे.

वेडिंग फोटग्राफीचा खर्च – 

या कंपनीचा वेडिंग फोटोग्राफीचा खर्च अंदाजे दोन ते सव्वा दोन लाख असू शकतो.

9. दी फोटो डायरी (The Photo Diary)

दी फोटो डायरी ही कंपनी मोनीशा आजगांवकर या तरूणीने सुरू केलेली आहे. या व्यवसायात अनेक वर्ष उत्तम काम केल्यामुळे ती भारतातील सर्वोत्कृष्ठ महिला वेडिंग फोटोग्राफर म्हणून ओळखली जाते. माणसांच्या भावभावना फोटोत उतवरण्यामध्ये तिचा विशेष हातखंडा आहे. 

वेडिंग फोटोग्राफीचा खर्च –

तुमच्या मागणी आणि लग्नविधीतीस थीमनुसार फोटोग्राफीचा खर्च ठरवला जातो. 

10. रिचा कासेलकर (Richa Kashelkar)

रिचा कासलेकर ही एक उत्कृष्ठ फोटोग्राफर आहे. आर्टिटेक्चरची नोकरी सोडून तिने फोटोग्राफीचा छंद जोपासण्यास सुरूवात केली. गेली अनेक वर्ष ती या क्षेत्रात उत्तम यश मिळवत आहे. तिच्या मते प्रत्येक लग्नसोहळा ती तिच्या ह्रदयातून शूट करते. ज्यामुळे तो तुमच्या ह्रदयाच्या कोपऱ्यात आयुष्यभर राहतो. 

वेडिंग फोटोग्राफीचा खर्च –

तुमच्या लग्नाच्या थीमवरून तुमचा फोटोग्राफीचा खर्च ठरवला जातो.

11.दी लाईटस्मिथ (The Lightsmiths)

राहूल आणि विभूती यांनी मिळून या कंपनीची निर्मीती केली आहे. वेडिंग फोटग्राफीमध्ये आज हे नाव टॉप लिस्टमध्ये घेतलं जातं. लग्न हा आयुष्यभराचा इवेंट असतो. लग्नाच्या दिवसापासून या इव्हेंटला सुरूवात होते. म्हणूनच हा सोहळा अगदी दिमाखात आणि लक्षात राहील असा असावा. जो फोटोच्या  माध्यमातून तुम्ही नक्कीच जपून ठेऊ शकता.

वेडिंग फोटोग्राफीचा खर्च –

तुमच्या लग्नसोहळ्याच्या फोटोग्राफीचा खर्च तुमच्या लग्नाच्या थीमवर अवलंबून असतो.

12. फेदर ट्री बाय अविराज (Feather Tree By Aviraj)

अविराज सालुजा यांचं फेदर ट्री हे फोटोग्राफीक वेंचर म्हणजे एक पूर्णवेळ प्रोफेशनल वेडिंग फोटोग्राफी करणारी कंपनी आहे. फेदर ट्रीची टीम म्हणजे मैत्रीचं एक उत्तम उदाहरण  आहे. कारण ते तुमच्या लग्नसोहळ्यात अगदी तुमच्या मित्रमैत्रिणीप्रमाणेच वावरतात. ज्यामुळे तुम्ही निशंकोचपणे तुमच्या फोटोपोझ जेऊ शकता. 

वेडिंग फोटोग्राफीचा खर्च – 

वेडिंग फोटग्राफीसाठी कमीत कमी तीन ते साडेतीन लाखांचं बजेट ठेवायला हवं. 

13. सेवन बाय टू (Seventy by Two)

हार्दिक गाडा आणि केवल गाला या दोघांनी मिळून ही कंपनी सुरू केली. अगदी चार जणांच्या टीमने लहान स्वरूपात सुरू झालेली ही कंपनी आज मोठ्या प्रमाणावर कार्यरत आहे. ही कंपनी केवळ बेस्ट फोटोग्राफर्समध्येच गणली जाते असं नाही तर ते तुमच्या स्वप्नांना एखाद्या मित्राप्रमाणे पूर्ण करते. 

वेडिंग फोटग्राफीचा खर्च –

यासाठी तुम्हाला अंदाजे दोन ते सव्वा दोन लाख खर्च येऊ शकतो.

14. अनुपा शाह फोटोग्राफी (Anupa Shah Photography)

अनुपा शाहचा वाईल्ड लाईफ फोटोग्राफीच्या  आवडीतून सुरू झालेला हा प्रवास आज मोठ्या प्रमाणावर वेडिंग फोटोग्राफीच्या पॅशनमध्ये बदलला आहे. आज ती भारतातील टॉपच्या महिला फोटोग्राफर्स पैकी एक आहे. डेस्टिनेशन वेडिंग फोटोग्राफीसाठी तिला पुरस्कारही मिळालेले आहेत. 

वेडिंग फोटोग्राफीचा खर्च –

लग्नाच्या फोटोग्राफीचा खर्च तुम्हाला जवळजवळ एक लाख इतका असू शकतो.

15. दी वेडिंग पिक्चर्स (The Wedding Pictures)

लग्नसोहळा हा कायमस्वरूपी लक्षात ठेवण्यासाठी विविध ट्रेंडमध्ये फोटोशूट केलं जातं. मात्र या  सर्वासोबतच तो सोहळा, ते क्षण अनुभवतानाही तुम्हाला तितकाच आनंद वाटायला हवा. यासाठी अगदी सहजपणे फोटोग्राफी करण्यात दी वेडिंग पिक्चर्सची टीम तरबेज आहे.

वेडिंग फोटोग्राफीचा खर्च –

अंदाजे खर्च तुमच्या फोटोग्राफीच्या गरजेनुसार ठरू शकतो. 

Read More From लग्नसराई