भारती सिंह आणि हर्ष लिंबाचिया लवकरच आईबाबा होणार आहेत. त्यांच्या घरातील ही गोड बातमी त्यांनी अगदी अनोख्या पद्धतीने चाहत्यांसोबत शेअर केली होती. सहाजिकच जेव्हा जेव्हा हे दोघं पापाराझींच्या समोर येतात तेव्हा त्यांना प्रेगन्सी जर्नीबाबत अनेक प्रश्न विचारले जातात. भारती सिंहदेखील बिनधास्तपणे तिच्या प्रेगन्सीच्या प्रवासाबातच्या अनेक गोष्टी सांगताना दिसते. एका मुलाखतीत तिने तिला मुलगा नाही तर मुलगी हवी असं सांगितलं होतं. आता तिने चक्क तिला सी-सेक्शची भीती वाटतेय हा खुलासा केला आहे.
डिलिव्हरीसाठी हॉस्पिटलमध्ये जाताना या ‘25’ गोष्टी तुमच्या मॅटर्निटी बॅगमध्ये अवश्य ठेवा
भारती सिंहला का वाटतेय सी-सेक्शनची भीती
भारती सिंह सध्या तिच्या आरोग्याची आणि बाळाच्या वाढीसाठी योग्य प्रयत्न करत आहे. यासाठी तिने तिच्या जीवनशैलीत अनेक बदल केले आहेत. तिचा आहार, विहार तिने पूर्ण बदलला आहे. शिवाय रोज व्यायाम करण्यावर ती भर देत आहे. या सर्व गोष्टी करण्यामागे एकच कारण आहे ते म्हणजे तिला सी-सेक्शनची भीती वाटतेय. नॉर्मल डिलिव्हरीसाठी भारतीने जीवनात नवे बदल करून घेण्यास सुरूवात केली आहे. एका मुलाखतीत तिने शेअर केलं होतं की, ” मला नॉर्मल डिलिव्हरी हवी आहे. सिझेरिअनच्या नावानेच मला थोडी भीती वाटते. कारण मी ऐकलं आहे की,सी-सेक्शनमध्ये खूप त्रास होतो. मी एक वर्किंग आई आहे आणि त्यामुळे मला डिलिव्हरीमध्ये कोणत्याही प्रकारचे कॉम्प्लिकेशन्स नको आहे” यासाठी भारती दररोज व्यायाम करते. डॉक्टर तिला जसा सल्ला देतात त्या सर्व गोष्टी ती व्यवस्थित फॉलो करत आहे. ज्यामुळे तिला विश्वास आहे की तिची प्रसूती सहज आणि सुलभ होऊ शकते. सी-सेक्शन दूर ठेवण्यासाठी ती योगासने करण्यासोबत दररोज एक तास चालण्याचा व्यायाम करत आहे. भारतीने जीवनशैलीत केलेला हा बदल नक्कीच कौतुकास्पद आहे.
प्रेगन्सीआधी भारतीने कमी केलं होतं वजन
भारती सिंह अचानक बारीक दिसू लागली आणि मग काहीच दिवसात तिने प्रेगन्सीची बातमी दिली. याचाच अर्थ भारतीने प्रेगन्सीसाठी वजन कमी करण्याचा प्रयत्न केला होता. यासाठीने भारतीने एवढी मेहनत घेतली की तिने तिचे जवळजवळ पंधरा किलो वजन कमी केलं होतं.त्यामुळे भारती तिच्या फिटनेसबाबत खूपच जागरूक झालेली दिसून येत आहे.भारतीचे ट्रान्सफॉर्मेशन अनेकांसाठी प्रेरणा देणारं ठरलं होतं. आता भारती सिंह आई होणार आहे. त्यामुळे बाळंतपणासोबत स्वतःचे आणि बाळाचे आरोग्य सुरक्षित राहावे यासाठी ती स्वतःमध्ये पुन्हा काही बदल करू लागली आहे. या सर्व प्रयत्नांना यश मिळेल का आणि भारतीची डिलिव्हरी नॉर्मल होईल का हे येणाऱ्या काही दिवसांमध्ये नक्कीच उघड होईल. असं घडलं तर अनेक गरोदर महिलांसाठी भारती पुन्हा एकदा प्रेरणादायक ठरू शकते.