Recipes

अशी करा चविष्ट भोगीची भाजी रेसिपी मराठी | Bhogi Bhaji Recipe In Marathi

Dipali Naphade  |  Jan 10, 2022
भोगीची भाजी अशी करा अधिक चविष्ट, रेसिपी मराठीत (Bhogi Bhaji Recipe)

मकरसंक्रांत हा सण संपूर्ण भारतात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. महाराष्ट्रात हा सण तीन दिवस साजरा करण्याची पद्धत आहे. पहिला दिवस भोगी, दुसरा दिवस मकरसंक्रांत आणि तिसरा दिवस किक्रांत म्हणून साजरा केला जातो. हा सण वर्षाचा पहिला सण असल्यामुळे या उत्साहाचा गोडवा काही औरच असतो. मकरसंक्रांतीच्या दिवशी एकमेंकांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा सोबत तिळगूळ देण्याची पद्धत आहे. यासोबत तिळगुळ घ्या आणि गोड बोला असंदेखील आवर्जून म्हटलं जातं. या प्रथेमागे सर्वांनी एकत्र येणं आणि तिळगुळाप्रमाणे गोडीनं राहणं हा हेतू आहे. एवढंच नाही तर मकरसंक्रांतीच्या आदल्या दिवशी म्हणजे भोगीच्या दिवशी देवाला बाजरीची भाकरी आणि मिक्स भाजीचा नैवेद्य दाखवला जातो. या दिवशी असा नैवेद्य करून सर्वांनी एकत्र बसून खाणं हे देखील एका खास उद्देशाने केलं जातं.

म्हणून मकर संक्रांतीला असतं तिळाचं महत्त्व (Importance Of Sesame Seeds During Sankranti In Marathi)

भोगीची भाजी आणि बाजरीची भाकरी

मकरसंक्रांत हिवाळ्यात येते. हिवाळ्यात हवेत खूप गारवा असतो. अशा  वातावरणात शरीराला उर्जा मिळण्यासाठी पुरेशा उष्णतेची गरज असते. यासाठीच सणाला भोगीची भाजी घरोघरी तयार केली जाते. हिवाळ्याच्या काळात मिळणाऱ्या सर्व ताज्या भाज्यांचा वापर भोगीच्या भाजीत केला जातो. या भाजीत विशेषतः वांगे, गाजर, हरभरा, घेवडा, तीळ आणि शेंगदाण्यांचा वापर केला जातो. आयुर्वेदानुसार या भाज्या खाण्यामुळे शरीरात उष्णता निर्माण होते. ज्यामुळे शरीराला पुरेशी उब आणि ऊर्जा मिळते. बाजरी हे धान्यदेखील उष्ण  आहे. म्हणूनच फक्त थंडीच्या काळातच बाजरीची भाकरी खाल्ली जाते. शिवाय भोगीच्या मिक्स भाजीसोबत ही भाकरी अगदी चविष्ठ लागते. भोगीला बाजरीची भाकरी करताना वरून तीळदेखील लावले जातात. हिवाळ्यात धनधान्य मुबलक प्रमाणात उपलब्ध असतं शिवाय याकाळात तुम्हाला प्रचंड भूक लागते. यासाठीच भोगीला ही भाजी आणि भाकरी खाल्ल्यास  शरीराला चांगला फायदा होतो. पण बऱ्याच जणांना ही भाजी करता येतेच असं नाही. तर खास तुमच्यासाठी ही भोगीच्या भाजीची रेसिपी

हलव्याच्या गोड दागिन्यांनी करा यंदाची संक्रांत अधिक गोड

भोगीच्या भाजीची रेसिपी

भोगीची भाजी करण्यासाठी लागणारे साहित्य 

कशी करावी भाजी 

You Might Like These:

संक्रांतीला नेसण्यासाठी काळ्या रंगाच्या साड्यांचे ‘18’ प्रकार
अशी बनवा चमचमीत घेवड्याची भाजी रेसिपी
शेपूची भाजी खाण्याचे फायदे

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

Read More From Recipes