मनोरंजन

Bigg Boss 15: विशाल कोटीयन आहे घरचा विनोदी बातमीदार, पहिल्याच दिवसापासून होतेय चर्चा

Leenal Gawade  |  Oct 5, 2021
विशाल कोटीयन करतोय प्रेक्षकांचे मनोरंजन

 हिंदीतील बहुप्रतिक्षित असा रिॲलिटी शो Bigg Boss 15 सुरु होऊन अवघे दोन दिवस झाले असतील आणि या घरात राडा व्हायला सुरुवात झाली आहे. या घरात आलेल्या 15 स्पर्धकांमध्ये स्पर्धा रंगावी यासाठी जे काही प्रयत्न मेकर्स करत आहेत. त्यामुळे घरात आता सगळीकडे वातावरण टाईट व्हायला सुरुवात झाली आहे. ओटीटी प्लॅटफॉर्मवर सगळ्यात भांडलेला प्रतीक सेहजपाल या घरात आल्यापासून घरात वाद व्हायला सुरु झाली आहे. प्रतीक विरुद्ध संपूर्ण घर असा सामना रंगलेला असताना आता या घरात एका स्पर्धकाने अनेकांचे लक्ष आकर्षित करुन घेतले आहे. इतकेच नाही तर बिग बॉसच्या कॅमेऱ्यातही तो कैद झाला आहे. विशाल कोटीयन ज्याच्या नसानसात मुंबई बसली आहे अशा विशालला विनोदी बातमीदार बनत बातमी देताना पाहून खूप जणांना तो आवडू लागला आहे.

Bigg Boss Marathi : ही जोडी तुटायची नाय…. विशाल-विकासची मैत्री सगळ्यांना आवडणारी

दिवसाचे अपडेट 

घरात काय सुरु आहे. याचे अपडेट त्याच्या शब्दात योग्य पद्धतीने देण्याचे काम जर कोण करत असेल तर तो या घरातील विशाल कोटीयन आहे. अगदी आल्या दिवसापासून आपण कोण आहोत असे दाखवणारा हा दगडी चाळीतला स्पर्धक कोणाची भीड मुरवत ठेवत नाही.मनाला येईल ते बोलतो. त्याचा हाच अंदाज सगळ्यांना भावू लागला आहे. घरात जाऊन अवघे दोन दिवस झाले आहे. पण तो रोज सकाळी आणि संध्याकाळी येऊन कॅमेऱ्यावर ज्यापद्धतीने येऊन सगळ्या दिवसाचा रिपोर्ट बोलतो ते पाहून हसू येणार नाही असे मुळीच होत नाही.Bigg Boss च्या घरात केवळ भांडणं अपेक्षित नसतात. तर त्यासोबतच अपेक्षा असते ते म्हणजे मनोरंजनाची आणि टास्क खेळण्याची विशालमध्ये मनोरंजन अगदी ठासून भरलेले आहे. इतकेच नाही. तर त्याच्यामध्ये एक अँग्री यंग मॅन देखील दडलेला आहे. जो अफसाना खानला समजावताना दिसून आला. त्यामुळे त्याला यामुळे अधिक जास्त प्रसिद्धी मिळेल अशी अपेक्षा आहे. 

स्पष्ट वक्तेपणा

इतकेच नाही तर विशाल कोटीयन हा कोणासोबत नाते चांगले राहण्यासाठी हा खेळ खेळत नाही. तर आपले विचार अगदी पहिल्या दिवसापासून स्पष्ट मांडत आला आहे. सलमान खानसोबत असतनाही तो उथळ नाह तर करुनही दाखवतो घरात आल्यावर दाखवून दिले. मौनी काही खास कारणांसाठी घरात आल्यावर तिने विचारलेल्या प्रश्नांचे उत्तरही त्याने अगदी स्पष्टपणे दिले. कोणालाही न घाबरता त्याने त्याला आवडत नसलेल्या लोकांची नावे घेतली. त्याने मालिकेत बिरबलचे पात्र साकारले होते. त्यामुळे बिरबलची हुशारी आणि चलाख बुद्धी त्याच्याकडे असेल यात कोणतीही शंका नाही.

Bigg Boss 15 : जंगलमध्ये टिकू शकतील का हे नवे स्पर्धक, असा रंगला ग्रँड प्रिमिअर

प्रतीक आणि घरच्यांमध्ये घमासान

OTT प्लॅटफॉर्ममध्ये गाजलेला स्पर्धक प्रतीक सहेजपाल हा देखील अनेकांच्या डोक्यात गेला आहे. त्याने ज्यापद्धतीने खेेळ तिथे खेळला अगदी तसाच खेळ तो या ठिकाणी खेळायला पाहात आहे.  त्यामुळे त्याचा अंदाज अनेकांना आला आहे. काही बाबतीत त्याचे निर्णय योग्य असले तरी देखील घरात खूप जण त्याचे घरात मुळात ऐकताना दिसत नाही. अगदी पहिल्याच दिवशी काही गोष्टींवरुन घरातल्यांविरुद्ध प्रतीक असे पाहायला मिळाले. त्यामुळे झाले असे की, प्रतीक उगाचच घरात बिचारा झाला आहे. त्याचा फायदाही त्याला होण्याची शक्यता आहे.

Read More From मनोरंजन