Bigg Boss Marathi चा चौथा आठवडा आता सुरु झाला आहे. घरात सगळ्यांचे रंग आता स्प्ष्टपणे दिसू लागले आहे. खूप जणांचा स्वभाव आता सगळ्यांना कळून आला आहे. घरात काहींची मैत्री दिसून येतेय. तर काहींमध्ये अजूनही दुश्मनी दिसत आहे. पण आता या घरात काही मनं जवळ येताना दिसत आहे. आम्ही सोनाली-विशालबद्दल अजिबात बोलत नाही. तर या घरात शांत शांत असणारी स्नेहा आणि जय यांच्यामध्ये काहीतरी नक्कीच सुरु आहे असे दिसून येत आहे. जय या घरातील असा चेहरा आहे ज्याच्यासोबत नक्कीच कोणालाही आपले अफेअर असावे असे वाटेल. असा हा जय सध्या स्नेहामध्ये जास्त गुंतलेला दिसून येत आहे. काही दिवसांपासून त्यांच्यामध्ये जे काही सुरु आहे त्यामुळे ‘कुछ तो गडबड है’ असं म्हणायची वेळ आली आहे. पण तरीसुद्धा हे खेळात टिकून राहण्यासाठी तर केले जात नाही ना असा संशयही येत आहे.
Bigg Boss Marathi : विशाल- विकासच्या मैत्रीत टास्कमुळे दुरावा, प्रेक्षक चिंतेत
जय आणि स्नेहाचा बाँड
घरात कधी कोणाचे समीकरण कधी बदलेेल सांगता येत नाही. या घरामध्ये काही असे एलिजेबल बॅचलर आहेत त्यांना पाहता त्यांच्यामध्ये प्रेम होईल अशी सगळ्यांनाच अपेक्षा असते. घरात पहिल्या आठवड्यात जयला थोडी जास्त पसंती मिळाली.त्यामुळे त्याच्याकडे सगळ्यांचेच जास्त लक्ष होते आणि अजूनही आहे. घरात जय हा टास्कमध्ये नेहमीच चांगला दिसून आला आहे. पण त्याचे फ्लर्टिंगही तितकेच चांगल्या पद्धतीने दिसून आले आहे. सध्या तो घरात स्नेहासोबत जास्त दिसत आहे. स्नेहाशी तो फ्लर्टिंग करताना दिसत आहे. जय स्नेहाची तारीफ करताना तिला जास्त प्राधान्य देताना दिसत आहे. शनिवारी झालेल्या चावडीमध्येसुद्धा महेश मांजरेकरांनी घरात प्रेमाचे वारे वाहू लागलेत अशी एक हिंट दिली. घरातल्यांना हे विशाल आणि सोनाली असे वाटले. पण बाहेर बसणाऱ्या प्रेक्षकाला हा जय आणि स्नेहाचा मामला आहे असे स्पष्ट दिसून येत आहे.
घरातही होतेय चर्चा
इतकेच नाही तर घरातल्या काही मंडळीनाही याचा अंदाज आलेला आहे. पण त्याबद्दल फार काही बोलताना कोणी दिसून येत नाही. पण तरी घराच्या बाहेर याची चर्चा होऊ लागली आहे. पण बरेचदा घरात प्रेम किंवा अशा काही गोष्टी दिसू लागल्या की, त्या कार्यक्रमाचा टीआरपी वाढतो. घरात सगळ्यांचे लक्ष आपल्याकडे क्रेंद्रित करण्यासाठी अशा लव्हस्टोरी या उगाचच क्रिएट केल्या जातात. अशाच प्रकारे जय आणि स्नेहा तर हा खेळ खेळत नाही ना असा प्रश्न पडत आहे. त्यामुळे लोकांचे लक्ष केंद्रित करण्यासाठी आणि जास्तीत जास्त लोकांच्या नजरेत राहण्यासाठी हे असे केले जात नाही ना? असेही म्हटले जात आहे.
दूध का दूध पानी का पानी
यंदाच्या चावडीवर महेश मांजरेकर यांनी यावेळी अनेकांचे डोळे उघडले आहेत. गेल्या आठवड्यात चुगली सांंगितल्यानंतर अनेकांनी चुगलीचा विरोध केला होता. विशेषत: या घरातील मीरा, जय, उत्कर्ष, गायत्री,स्नेहा हे कोणाचेही ऐकत नाही. एकमेकांविरोधात त्यांनी अनेक गोष्टी बोललेल्या आहेत. त्यामुळे त्यांनाच त्यांची चुगली व्हिडओ सकट दाखवण्यात आली.त्यामुळे आता तरी त्यांचे डोळे उघडतील आणि असे वाटत आहे. पण तरीही हा व्हिडिओ पाहिल्यानंतर त्यांच्यामध्ये काही फरक पडेल असे वाटत नाही
त्यामुळे आता स्नेहा आणि जयचे हे वागणे फक्त या रिअॅलिटी शो साठी आहे की तो खरंच तिच्यासोबत फ्लर्ट करतोय हे आता कळूनच येईल.
Bigg Boss Marathi : घरात पडू लागली आहे फूट, स्नेहा तयार करतेय का नवा गट
Read More From Uncategorized
चार वर्षांनंतर ‘पठाण’मधून परत येण्यासाठी शाहरूखने घेतली मेहनत, ट्रेनरने केला खुलासा
Trupti Paradkar
भारतीय स्किन टोनवर शोभतात हे ब्लश
Dipali Naphade