आरोग्य

काळा आणि पिवळा गुळ काय आहे दोघांमधील फरक, फायदे-तोटे

Leenal Gawade  |  Oct 7, 2021
गुळामधील फरक

 गुळ हा प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य आहे. प्रत्येकाच्या जेवणात गुळ हा असतोच. बाजारात वेगवेगळ्या प्रकाराचे गुळ मिळतात.  चिकीचा गुळ, साधा गुळ, काळा गुळ असा गुळ मिळतो.  तुम्ही नेमका कोणत्या प्रकारातील गुळ वापरता याचा कधीही विचार केला आहे का? काळा आणि पिवळा गुळ या दोघांमध्ये काही फरक आहे का? तुम्ही नेमका कोणता गुळ वापरायला हवा त्याचे फायदे आणि तोटे हे आज आपण जाणून घेणार आहोत. चला तर जाणून घेऊया काळा आणि पिवळा गुळ यामधील फरक फायदे- तोटे

काळा गुळ

सेंद्रीय गुळाला काळा गुळ असे म्हटले जाते. उसाचा रस जर तुम्ही शुद्ध अशा स्वरुपातील प्यायला असेल तर तुम्हाला एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात येईल ती म्हणजे उसाचा रस हा कधीच पिवळ्या रंगाचा नसतो. तर उसाचा रस हा कायम थोडासा काळा असतो. काळा रस हा उत्तम आणि खरा मानला जातो. त्यामुळे अगदी शुद्ध पद्धतीने केलेल्या गुळाला काळा गुळ असे म्हटले जाते. खूप जण आहारात काळ्या गुळ्याचा समावेश करतात. काळ्या गुळासोबत चणे, काळ्या गुळाचा चहा असे सेवन केले जाते. एखाद्या रेसिपीमध्ये काळ्या गुळाचा वापर केला तर ती रेसिपी अधिक काळी दिसू लागते. त्यामुळे खूप जण काळा गुळ घेण्याचे टाळतात. सेंद्रीय पद्धतीने तयार केलेला गुळ हा थोडासा तपकीरी, काळा आणि हाताला मऊ असतो. त्याचे तुकडे करणे सहज सोपे जाते.

त्वचेच्या समस्या कमी करण्यासाठी सकाळी उपाशीपोटी करा हा उपाय

पिवळा गुळ

Instagram

बाजारात  कुठेही मिळणारा गुळ जर कोणता असेल तर तो पिवळ्या रंगाचा गुळ असतो. हे पिवळ्या रंगाचे गुळ प्रोसेस केलेले असते. यामध्ये बऱ्याच प्रक्रिया करुन हा गुळ तयार केला जातो. पिवळा गुळ वाईट असतो. असे मुळीच नाही. फरक हा इतकाच आहे की या गुळावर अनेक प्रकिया झालेल्या असतात. त्यामुळे या गुळामधील अनेक पोषकतत्वे कमी झालेली असतात. त्यामुळे गुळापासून मिळणारा फायद हा पूर्णपणे मिळत नाही. अशा गुळाच्या अधिक सेवनामुळे काही त्रासही होण्याची शक्यता असते.

पावसाळ्यात हमखास ताव मारायला हवा या पदार्थांवर

गुळाचे फायदे तोटे

 काळा आणि पिवळा म्हणजेच रासायनिक गुळाविषयी जाणून घेतल्यानंतर एक  गोष्ट स्पष्ट होते की काळ्या गुळामध्ये अधिक पोषक घटक असतात. त्यामुळे यामधील तोटे जाणून घेण्यापेक्षा गुळामध्ये नेमके काय फायदे असतात. त्याचे सेवन का करायला हवे ते जाणून घेऊया 

  1. सेंद्रीय गुळामध्ये लोहाचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे ज्यांना ॲनिमिया आहे त्यांना तो अधिक फायदेशीर ठरतो. 
  2. पचनक्रियेवर चांगला परिणाम करण्यासाठी सेंद्रीय गुळ फायद्याचा असतो. जर तुम्ही सेंद्रीय गुळाचे सेवन केले तर तुम्हाला पोटाचे आरोग्य चांगले ठेवण्यास मदत मिळते. 
  3. शरीरात उष्मांक वाढवण्याची गरज असेल तर गुळ हा फायद्याचा आहे. 
  4.  गुळामध्ये अनेक अँटीऑक्सिडंट घटक असतात. ज्यामुळे त्वचा आणि केस चांगले राहण्यास मदत मिळते. 
  5. रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठीही गुळ हा फारच फायद्याचा आहे. याशिवाय आरोग्यासाठी गुळाचा चहा पिण्याचे फायदे ही अनेक आहेत.

आता गुळाचे सेवन करण्यापूर्वी तुम्ही नेमका कोणता गुळ वापरायला हवा ते जाणून घेणे महत्वाचे आहे. 

घरी झटपट बनवा पौष्टिक आणि चविष्ट मेथीचे लाडू

Read More From आरोग्य