बॉलीवूड सेलिब्रेटींची क्रेझ जगभरात असल्यामुळे त्यांना सतत हॉलीवूडच्या मोठ मोठ्या चित्रपटांच्या ऑफर्स येत असतात. हॉलीवूडमध्ये काम करणं हे अनेकांसाठी सन्मानाचं असल्यामुळे आजवर अनेक बॉलीवूड कलाकारांनी हॉलीवूड चित्रपटात काम केलं आहे. मात्र बॉलीवूडचे कलाकार नेहमीच त्यांच्या चित्रपट आणि भूमिकांबाबत सिलेक्टिव्ह असतात. ज्यामुळे ते भूमिका निवडताना नेहमीच त्यांच्या चाहत्यांना काय आवडेल, त्या भूमिकेमुळे त्यांच्या करिअरवर काय परिणाम होईल याचाही विचार करतात. बॉलीवूडचे असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी हॉलीवूडच्या या मोठ्या ऑफर्संना चक्क नकार दिला आहे. यासाठीच जाणून घेऊ या आजवर कोण कोणत्या बॉलीवूड स्टार्संनी हॉलीवूडच्या ऑफर्स नाकारल्या आहेत.
गोविंदा –
बॉलीवूडचा सुपरस्टार गोंविंदाने जेव्हा जेम्स कॅमरनने ऑफर केलेला अवतार हा हॉलीवूड चित्रपट नाकारला होता तेव्हा याबाबत खूप चर्चा रंगली होती. हा चित्रपट 2009 मधला जगभरातील एक जास्त चर्चेत असलेला चित्रपट ठरला होता. गोविंदाने होकार दिला असता तर त्याच्या चाहत्यांना गोविंदाला एका नव्या अवतारात पाहता आलं असतं. मात्र गोविंदाने ही ऑफर नाकारली. मात्र त्याने एका मुलाखतीत सांगितल्याप्रमाणे या चित्रपटाचे नाव त्यानेच जेम्स कॅमरनला सूचवले होते
ह्रतिक रोशन –
बॉलीवूड अभिनेता ह्रतिक रोशन त्याच्या अभिनय, अॅक्शन आणि डान्ससाठी जगभरात लोकप्रिय आहे. एवढंच नाही तर चाहते त्याला ग्रीक गॉड असंही म्हणतात. मात्र ह्रतिकनेही हॉलीवूडमध्ये काम करण्यास नकार दिलेला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 2006 मध्ये ह्रतिकला पिंक पॅंथर च्या सिक्वलमध्ये भूमिका ऑफर झाली होती. मात्र तेव्हा ह्रतिक बॉलीवूड चित्रपटांमध्ये इतका बिझी होता की त्याने चक्क हॉलीवूडमध्ये काम करण्यास नकार दिला होता.
दीपिका पादुकोण –
बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पादुकोणचे चाहतेही जगभरात आहेत. ज्यामुळे तिलाही 2015 मध्ये फ्लुरिअस 7 या हॉलीवूड चित्रपटाची ऑफर मिळाली होती. मात्र तेव्हा दीपिका शाहरूखसोबत हॅप्पी न्यु इअर या बॉलीवूड चित्रपटात काम करत होती. ज्यामुळे तिला हा चित्रपट करण्यास नकार द्यावा लागला होता. फास्ट अॅंड फ्युरिअसच्या या भागाला जगभरात खूप लोकप्रियता मिळाली होती आणि हॅप्पी न्यु इअर बॉक्स ऑफिसवर चांगलाच आपटला होता.
प्रियांका चोप्रा –
प्रियांका लग्नानंतर अमेरिकेत चांगलीच रूळली आहे आणि ती आता हॉलीवूडच्या अनेक चित्रपटांमध्येही झळकत आहे. मात्र असं असूनही एक काळ असा होता जेव्हा प्रियांकाने हॉलीवूडच्या चित्रपटाला नकार दिला होता. बेवॉच, क्वांटिको आणि वी केन बीच्या आधी तिला इनोर्टलची ऑफर मिळाली होती. मात्र तेव्हा प्रियांका बॉलीवूडच्या सात खून माफ या चित्रपटाच्या शूटिगमध्ये बिझी होती. ज्यामुळे तिला हॉलीवूडची ही ऑफर घेता नाही आली.
नसीरउद्दीन शाह –
नसीरउद्दीन शाह यांच्याकडून अभिनयाचे धडे आजही अनेक कलाकार गिरवत असतात. मात्र या दिग्गज कलाकारांनेही बॉलीवूडच्या चित्रपटात काम करण्यास नकार दिला होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांना हॅरी पॉटरमध्ये प्रोफेसर अलबस डंबलडोरची ऑफर मिळाली होती. मात्र काही कारणांमुळे नसीरउद्दीन यांना या चित्रपटात काम करणं शक्य झालं नाही. पुढे ही भूमिका रिचर्ड हॅरिस यांनी साकारली, त्यांच्या निधनानंतर ती मायकल गॅंबनने पुढे साकारली. जगभरात ही भूमिका हॅरी पॉटरच्या इतर पात्रांप्रमाणेच अजरामर झाली आहे.
शाहरूख खान –
बॉलीवूडच्या किंगखाननेही हॉलीवूडमध्ये काम करण्यास नकार दिला होता. शाहरूखला स्लमडॉग मिलेनिअर या चित्रपटात गेम शो होस्ट प्रेम कुमारची ऑफर मिळाली होती. मात्र तेव्हा प्रसिद्धीच्या शिखरावर असलेला बादशाहने या चित्रपटात काम करण्यास नकार दिला. ज्यामुळे पुढे अनिल कपूरने ही भूमिका साकारली होती.
फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम
अधिक वाचा –
लाल सिंह चड्ढा प्रदर्शित होईपर्यंत बंद असणार आमिर खानचा फोन
तब्बूमुळे रखडलं आहे कार्तिक आर्यनच्या ‘भूल भूलैया 2’ चं शूटिंग
अट मान्य असेल तरच लग्न करेन, प्रियांका चोप्राने केला निकसह लग्नाचा खुलासा
Read More From बॉलीवूड
फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांच्यावरील बायोपिक ‘सॅम बहादूर’च्या चित्रीकरणास सुरुवात
Vaidehi Raje