चेहरा परफेक्ट आणि सुंदर दिसण्यासाठी सगळ्यात महिला थोड्या बहुत फरकाने मेकअप करतात. मेकअप करणे काहीही चुकीचे नाही. पण मेकअपसंदर्भात अनेक समज- गैरसमज आहेत. पण सर्वार्थाने मेकअपसंदर्भात पडणारा एक प्रश्न म्हणजे सतत मेकअप केल्यामुळे चेहरा खरंच खराब होतो का? या प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न आज आम्ही करणार आहोत. जर तुमच्या रोजच्या जीवनात मेकअप अनिवार्य असेल तर तुम्ही देखील काही गोष्टींची काळजी घेतली तर तुम्हाला याचा त्रास मुळीच होणार नाही.
लिप बामचे 10 फायदे तुम्हाला माहीत आहेत का?
सतत मेकअपचे दुष्परिणाम
- सतत मेकअप करणे तुमच्यासाठी फारच गरजेचे असेल तर ठीक आहे. पण काही जण मात्र कोणतेही कारण नसताना अगदी फाऊंडेशनपासून सगळ्या बारीक बारीक गोष्टींचा विचार करत मेकअप करतात पण मेकअप सतत केल्यामुळे तो तुमच्या पोअर्समध्ये जाऊन बसतो. हे पोअर्स योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने स्वच्छ झाले नाहीत तर मात्र तुम्हाला पिंपल्स येण्याची शक्यता असते.
- मेकअपमध्ये केमिकल्स नसले तरी देखील एखादी गोष्ट सतत चेहऱ्याला लावल्यामुळे तुमची त्वचा कोरडी होऊ लागते. त्वचेला आवश्यक असलेला श्वास आणि मोकळीकता मिळाली नाही त्वचा शुष्क पडू लागते.अशी त्वचा अनाकर्षक दिसू लागते. अशा चेहऱ्यावरील तेज कमी होऊ लागते.
- कितीही चांगल्या दर्जाचे मेकअप प्रोडक्ट वापरत असलात तरी त्याचा योग्य वापरही कळणे फार गरजेचे असते. किती आणि कोणत्या ठिकाणी मेकअप लावायला हवे हे माहीत नसेल आणि ते चुकीचे आणि जास्त लावले गेले तरी तुमची त्वचा खराब होऊ शकते.
- त्वचा जितकी मोकळी असेल तितकी ती अधिक चांगली राहते.चेहऱ्यावर सतत मेकअप असेल तर तुम्हाला आलेला घामही तसाच त्वचेवर राहतो.तो तसाच छिद्रातून आत मुरतो.
- त्वचा काळवंडणे हा मेकअप करण्याचा आणखी एक तोटा आहे. सतत मेकअप केल्यामुळे तो त्वचेत कधी खोलवर जातो ते आपल्याला कळत नाही. त्यामुळे त्वचेच्या खाली एक थर तयार होतो. ज्यामुळे तुमचा उजळपणा कमी होऊ लागतो.
- सतत मेकअप करत असाल तर तुम्हाला एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात येईल ती अशी की, तुमचा डोळ्यांना केलेला मेकअप काहीही केल्या पूर्ण निघत नाही. तो भाग तसाच काळा दिसत राहतो. त्यामुळे डोळ्यांचा मेकअप पूर्णपणे निघून जात नाही आणि डोळे अधिक काळे करतो.
- मेकअपच्या सतत वापरामुळे तुमच्या त्वचेवर सुरकुत्या येण्याचीहीस शक्यता असते. त्यामुळे मेकअपचा सतत प्रयोग टाळावा.
- मेकअपच्या अति वापरामुळे त्वचेवरील नैसर्गिक ग्लो जातो. शिवाय जर तुमच्या त्वचेवर पिंपल्स आधीच असतील तर ते मेकअपमधील तैलीय घटकामुळे पिंपल्स वाढू शकतात.
आता सारखा मेकअप करत असाल तर काही गोष्टी लक्षात ठेवा आणि त्यानुसार त्वचेची काळजी घ्या.
प्रौढ व्यक्तींनी बेबी प्रॉडक्ट वापरणं योग्य की अयोग्य
फेशिअल आणि क्लिन अपमध्ये नेमका काय आहे फरक
चेहऱ्याचे मॉश्चरायझर कमी होऊ द्यायचे नसेल तर तुम्ही MyGlammचे प्रोडक्ट निवडू शकता. ज्यामुळे तुमची त्वचा होईल अधिक चांगली