Fitness

प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी भोपळी मिरची आहे फायदेशीर

Dipali Naphade  |  Apr 1, 2020
प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी भोपळी मिरची आहे फायदेशीर

सध्या देशभरात महामारी म्हणून घोषत झालेल्या कोरोना व्हायरसची (coronavirus) दहशत पसरली आहे. कोरोना व्हायरसमुळे अनेक ठिकाणी मृत्यूनेही थैमान घातलं आहे. पण याचा सर्वात जास्त परिणाम होतो त्या व्यक्तींवर ज्यांची प्रतिकारशक्ती कमी आहे. त्यामुळे अशा काळात अशा पदार्थांचे सेवन करणे आवश्यक आहे ज्याने आपली प्रतिकारशक्ती वाढून इम्यून सिस्टिम अधिक बळकट होईल. आपल्या घरात असणारे असे पदार्थ आहेत ज्याने आपली प्रतिकारशक्ती वाढू शकते. त्यापैकी एक भाजी म्हणजे भोपळी मिरची. सध्या भाज्यांची वानवा असली तरीही कांदा, बटाटा, भोपळी मिरची अशा भाज्या  प्रत्येकाच्या घरात असतातच कारण या भाज्या लवकर खराब होत नाहीत. भोपळी मिरची ही आपल्या शरीरातील प्रतिकारशक्ती वाढवण्यास उत्तम आहे. तसंच आपलं वजन कमी करण्यासाठीही याचा उपयोग होतो. लाल, पिवळी, हिरवी अशा तिनही रंगांमध्ये भोपळी मिरची बाजारात मिळते. आपल्याला जास्त वेळ निरोगी राहण्यासाठी याचा उपयोग होतो. भाजी, नूडल्समध्ये अथवा भातात गार्निशिंगसाठी अशा कोणत्याही स्वरूपात आपल्याला या भाजीचा उपयोग करून घेता येतो. त्यामुळे जाणून घेऊया प्रतिकारशक्ती वाढणारी ही भोपळी मिरची अजून कशी फायदेशीर ठरते. 

प्रतिकारशक्ती वाढवते

भोपळी मिरची आम्ही वर सांगितल्याप्रमाणे इम्युनिटी सिस्टिम मजबूत करण्यासाठी मदत  करते. यामध्ये विटामिन सी चे प्रमाण अधिक असते. त्यामुळे प्रतिकारशक्ती तंत्र मजबूत करण्यासह आप्लया मेंदूसाठीही याचा फायदा होतो. याशिवाय मेंदूवर येणारा ताण, तणाव, दमा आणि कॅन्सर यासारख्या आजारांवरही ही उपायकारक ठरते. त्यामुळे नियमित भोपळी मिरचीचे सेवन आपल्या आहारामधून होणे गरजेचे आहे. 

कच्च्या हळदीचा चहा पिऊन वाढवा प्रतिकारशक्ती

लठ्ठपणा होईल कमी

Shutterstock

ज्या व्यक्तींना आपला लठ्ठपणा आणि वजन कमी करायचं आहे त्यांच्यासाठी भोपळी मिरची फायदेशीर ठरते. भोपळी मिरचीमध्ये अतिशय कमी प्रमाणात कॅलरीज असतात. त्यामुळे याचे सेवन केल्यावर वजन वाढण्याची शक्यता फारच कमी प्रमाणात असते. तसंच मेटाबॉलिजम चांगलं करण्यासाठी याची मदत होते आणि वजन त्यामुळे कमी होते. 

पोषक तत्वांचं प्रमाण अधिक

भोपळी मिरचीमध्ये विटामिन ए, विटामिन सी, फलेवानॉईड्स, अल्कानॉईड्स अशा प्रकारची पोषक तत्व आढळतात. भोपळी मिरचीमध्ये आढळणारे अल्कालॉईड्स हे अँटीइन्फ्लेमेरी आणि अँटिऑक्सिडंट्सचे काम करतात. त्यामुळे प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत मिळते. ही सर्व पोषक तत्व शरीराला मिळण्यासाठी इतर पदार्थ शोधण्यापेक्षा एकच भोपळी मिरची फायदेशीर ठरू शकते. त्यामुळे आठवड्यातून किमान दोन ते तीन वेळा तरी कोणत्या ना कोणत्या पदार्थांमधून भोपळी मिरचीचे सेवन करावे. 

‘या’ गोष्टी ज्या वाढवतील तुमची प्रतिकारशक्ती आणि ठेवतील तुम्हाला एकदम फिट!

हृदयासाठी फायदेशीर

Shutterstock

फ्लेवेनॉईड्स असल्यामुळे भोपळी मिरची तुम्हाला हृदयरोगाच्या समस्यांपासून दूर ठेवते. संपूर्ण शरीराला योग्य ऑक्सिजनचा पुरवठा होण्यासाठी याची मदत होते. ज्यामुळे हार्ट पंपिंग होण्यामध्ये कोणतीही बाधा येत नाही आणि तुम्हाला कोणताही त्रास होत नाही. 

कोरोनाविरूद्ध प्रतिकारशक्ती वाढवायची असेल तर प्या हे ज्युस

शरीरातील लोहाची कमतरता होते दूर

शरीरामध्ये लोह अर्थात आयरनची असणारी कमतरता यातील विटामिन सी मुळे दूर होण्यास मदत मिळते. यामध्ये  विटामिन सी चं योग्य प्रमाण असतं. त्यामुळे भोपळी मिरचीचे सेवन केल्याने लोहाची कमतरता आपल्या शरीरामध्ये जाणवत नाही. तसंच अॅनिमिक होण्यापासूनही संरक्षण मिळते. ज्या व्यक्तींना लोहाची कमतरता असेल त्यांच्यासाठी भोपळी मिरची नक्कीच एक वरदान आहे. 

देखील वाचा – 

Immunity Boosting Kadha Recipe In Marathi – घरीच तयार करा हा आयुर्वेदिक काढा आणि राहा

Read More From Fitness