#BBM2 (बिग बॉस मराठी सीझन 2) नुकताच सुरु झाला आहे. आता अनेकांना उत्सुकता आहे ती हिंदीतल्या BigBoss:season 13 ची . यंदा या सीझनमध्ये कोण नवे सेलिब्रिटी दिसणार याची उत्सुकता अनेकांना आहे. काही सेलिब्रिटींची नावे देखील समोर आलेली आहेत. या संदर्भात कोणतीही अधिकृत घोषणा झाली नसली तरी काही सेलिब्रिटींची नावे स्पर्धक म्हणून समोर आहेत. शिवाय या स्पर्धेत करण्यात आलेले बदलही सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
मलायकासोबतच्या नात्यावर अर्जुन काय म्हणाला ते वाचा
स्पर्धकांच्या यादीत आहेत या सेलिब्रिटींची नावे
आता तुम्हाला उत्सुकता असेल या नव्या सीझनमध्ये स्पर्धक कोण असणार याची बरोबर ना! तर मिळालेल्या माहितीनुसार टीव्ही आणि चित्रपट या दोन्ही क्षेत्रातील सेलिब्रिटी यामध्ये असणार आहेत. सध्या तरी टीव्ही स्टार करण पटेल (ये हे मोहब्बते), विवेक दहिया (ये हे मोहब्बते), झरीन खान आणि EX Rodies नवज्योत गुरुदत्ता यांची नावे पुढे आली आहेत. या सीझनमध्ये हे काही चेहरे दिसण्याची शक्यता असल्याचे म्हटले जात आहे. शिवाय अन्य काही सेलिब्रिटी पाईपलाईनमध्ये असल्याचे म्हटले जात आहे.त्यामुळे अन्य मोठे सेलिब्रिटीही या नव्या सीझनमध्ये दिसण्याची शक्यता आहे.
कधी सुरु होतोय #BigBossseason13
आता हा सीझन लगेचच सुरु होत नाही. तर याला थोडा अवकाश आहे. म्हणजे सप्टेंबरपर्यंत तुम्हाला थांबावे लागणार आहे. आणि त्याला आतापासून 4 महिने आहेत. त्यामुळे यामध्ये कितीबदल होतील सांगता येत नाही. पण सलमान मात्र या सीझनमध्ये अढळपदावर आहे. तो या शोचे सूत्रसंचलन करणार आहे. साधारण सप्टेंबरमध्ये हा सीझन सुरु होणार असून 12 जानेवारी 2020 रोजी या सीझनचा विजेता घोषित केला जाणार आहे. त्यामुळ तुम्हाला थोडी वाट पाहावी लागेल.
कॅन्सरच्या उपचारानंतर समोर आला सोनाली बेंद्रेचा नवा लुक
होतील काही बदल
सध्या तरी 100 दिवसांच्या फॉरमॅटमध्ये काहीच बदल करण्यात आलेला नाही. पण सध्या बिग बॉसच्या नव्या घराबाबत असे सांगितले जात आहे की हे घर लोणावळामध्ये नसेल तर मुंबईत असणार आहे. गोरेगाव येथील फिल्मसिटीमध्ये या नव्या घराचा सेट उभारण्यात येणार आहे. पण यावर्षी या घराची थीम काय असणार आहे याबाबत मात्र अजून काहीच कळू शकले नाही.
बिग बॉस मराठीमध्ये रंगली टास्कची धम्माल
गेल्यावर्षीचा सीझन होता भन्नाट
क्रिकेटर श्रीशांत, दीपिका कक्कर, नेहा पेंडसे, करणवीर बोहरा, अनुप जलोटा,जसलीन मथारु, रोमिल चौधरी, निर्मल सिंह, सबा खान आणि सोमी खान हे स्पर्धक होते. या स्पर्धकांमध्ये रंगलेली चढाओढ देखील अनेकांना आवडली होती. अनुप जलोटा आणि जसलीन मथारु यांच्या लव्हस्टोरी आणि विरहाची नाहक चर्चाही याच सीझनमध्ये रंगली. या सीझनची विजेत्या ठरलेल्या दीपिका कक्करने योग्य खेळ खेळून 100 दिवस बिग बॉसच्या घरात अनेक कठीण प्रसंगासह घालवले. आणि तिने विजेत्यापदावर आपले नाव कोरले. त्यामुळे आता या सीझनमध्ये कोण ठरेल विजेता? काय असतील चॅलेंजेस?कोणाला मिळेल प्रेक्षक पसंती या सगळ्यासाठी आपल्याला सप्टेंबरपर्यंत थांबावे लागणार आहे. तोपर्यंत मराठीचा सीझन 2आहेच म्हणा. शिवाय अन्य भाषांमध्येही BigBoss सुरु आहे. 2006 साली परदेशात सुरु झालेल्या Big Brother ला कॉपी करत हा शो भारतामध्ये सुरु झाला आहे.
(फोटो सौजन्य- Instagram)