आरोग्य

चक्कर येणे घरगुती उपाय, सोप्या पद्धतीने करा उपचार (Chakkar Yene Upay In Marathi

Dipali Naphade  |  Sep 9, 2021
vertigo-home-remedies

अनेक जणांकडून आपण चालता चालता चक्कर येऊन पडले अथवा अचानक उभं राहिल्यावर भोवळ आली असं म्हणताना ऐकताना. चक्कर आल्यानंतर शारीरिक संतुलन ठेवण्याची समस्याही अनेक जणांना असते. पण असं नियमित होत असेल तर तुम्हाला व्हर्टिगो (Vertigo In Marathi) असण्याचीही शक्यता असते. बऱ्याच जणांना कधीतरी नुसती चक्कर येते किंवा अचानक गरगरतं. पण चक्कर येणे कारणे नक्की काय आहेत आणि व्हर्टिगो असेल तर त्याचा पुढे गंभीर परिणाम होण्याची शक्यता असते हे जाणून घेणे गरजेचे आहे. चक्कर येणे घरगुती उपाय (Chakkar Yene) आपण या लेखातून पाहणार आहोत. तुम्हालाही चक्कर येण्याचा त्रास असेल तर तुम्ही त्यावर आम्ही देत असणाऱ्या घरगुती उपायांचा (Home Remedies For Vertigo) नक्की उपयोग करून पाहा. पण तत्पूर्वी चक्कर येणे कारणे काय आहेत ते जाणून घेऊया.

चक्कर येणे कारणे (Causes Of Vertigo In Marathi)

Chakkar Yene Karane

व्हर्टिगोचे दोन प्रकार असतात, पेरिफेरल (Peripheral Vertigo) आणि सेंट्रल (Central Vertigo). त्यामुळे त्याची कारणेही त्याप्रमाणेच असतात. चक्कर येत (Chakkar Yene) असेल तर त्याची नक्की काय कारणे असू शकतात पाहूया.  

सेंट्रल व्हर्टिगोचीदेखील (Vartigo In Marathi) काही कारणे आहेत. ती काय आहेत ते पाहूया. 

चक्कर येणे लक्षणे (Chakkar Yene Symptoms In Marathi)

चक्कर येण्याची कारणे आपण पाहिली आता याची नेमकी लक्षणे काय असतात ते आपण जाणून घेऊया. डोकं गरगरणे आणि मळमळणे हे चक्कर येण्याचे अत्यंत कॉमन लक्षण आहे. मात्र याशिवायदेखील काही लक्षणे आहेत. जी तुम्हाला व्हर्टिगो असल्यास, दिसून येतात 

चक्कर येणे घरगुती उपाय (Home Remedies For Vertigo In Marathi)

चक्कर येणे घरगुती उपाय

डोकं गरगरणे, चक्कर येणे (Chakkar Yene) अथवा मळमळणे या हलक्या फुलक्या लक्षणांंवर आपण घरगुती उपाय करू शकता. लक्षात ठेवा की, घरगुती उपाय चक्कर येणे (Chakkar Yene) कमी करू शकते, पण तुम्ही वेळीच डॉक्टरांचा सल्लादेखील घ्यावा. जाणून घेऊया चक्कर येणे घरगुती उपाय.

पेपरमिंट ऑईल (Peppermint Oil)

साहित्य 

वापरण्याची पद्धत 

कसे ठरते फायदेशीर चक्कर येण्याच्या लक्षणांमध्ये डोकेदुखी असते हे आम्ही वरच तुम्हाला सांगितले आहे. पेपरमिंट ऑईलने तुमची डोकेदुखी थांबण्यास मदत मिळते. त्यामुळे चक्कर येण्याचा त्रास असेल तर तुम्ही याचा उपयोग करून घेऊ शकता. डोकेदुखी थांबवून चक्कर थांबविण्याचा प्रयत्न नक्कीच करू शकता. चक्कर येणे घरगुती उपाय यासाठी हा उत्तम उपाय आहे.

नारळाचे पाणी (Nariyal Pani)

साहित्य 

वापरण्याची पद्धत 

कसे ठरते फायदेशीर 

नारळाचे अथवा शहाळ्याचे पाणी हे शरीरासाठी नेहमीच फायदेशीर ठरते. शरीरातील उष्णता कमी करून चक्कर येण्याचे प्रमाण कमी करण्याचे काम नारळाचे पाणी करते. तसंच यामध्ये नैसर्गिक ऊर्जेचे प्रमाण अधिक असल्याने शरीरातील साखरेची पातळी कमी झाली असेल तरीही ती योग्य प्रमाणात ठेऊन तुम्हाला यातून सावरण्याचे काम नारळाचे पाणी करते. 

आवळा रस (Amla juice)

साहित्य 

वापरण्याची पद्धत 

कसे ठरते फायदेशीर 

आवळ्यामध्ये विटामिन सी असते जे शरीराला योग्य ऊर्जा देण्याचे काम करते. आवळ्याच्या रसाने डोकेदुखी आणि चक्कर येणे थांबते. त्यामुळे तुम्हाला जर नियमित चक्कर येण्याचा त्रास असेल तर तुम्ही किमान महिन्यातून दोन वेळा तरी हा घरगुती उपाय नक्की करून त्याचा परिणाम पाहा. 

ग्रेपफ्रुट ऑईल (Grapefruit Oil)

साहित्य 

वापरण्याची पद्धत 

कसे ठरते फायदेशीर 

यामध्ये काही शंका नाही की, ग्रेपफ्रुटचे अनेक फायदे आहेत. ग्रेपफ्रुटप्रमाणेच त्याच्या तेलाचाही फायदा होतो. यामध्ये अँटिइन्फ्लेमेटरी गुण असून सूज समस्या असल्यास, त्यातून सुटका मिळण्यास मदत मिळते. कानामध्ये सूज आल्याने चक्कर येण्याची समस्या होते हे आपण वर जाणून घेतले आहे. त्यामुळे तुम्ही सूज कमी होण्यासाठी याचा उपयोग करून घेऊ शकता. वर्टिगोचे हलके लक्षण असल्यास तुम्ही नक्कीच याचा उपयोग करून घेऊ शकता. 

तुळशीचे तेल (Tulsi Oil)

साहित्य 

वापरण्याची पद्धत 

कसे ठरते फायदेशीर 

तुळस एक आयुर्वेदिक वनस्पती आहे आणि तुळशीचे अनेक फायदे आहे. तुळशीच्या पानाने सौंदर्य खुलते.  ताप, सर्दी खोकला, उल्टी, पोटासंबंधित तक्रारींसाठी तुळस नेहमीच एक गुणकारी औषध म्हणून काम करते. तुळशीचे तेलही तितकेच लाभदायक ठरते. चक्कर येणे (Chakkar Yene) समस्या असेल तर मायग्रेनची तिव्रता कमी करण्याचे काम तुळशीचे तेल करते. डिफ्जुरमध्ये घालून उपयोग करण्यासह तुम्ही डोक्याला तुळशीचे तेल लाऊनही याचा उपयोग करून घेऊ शकता. चक्कर येणे घरगुती उपायांचा शोध घेत असाल तर याचा उपयोग करून पाहा. 

क्लारी सेज ऑईल (Clery Sej Oil)

साहित्य 

वापरण्याची पद्धत 

कसे ठरते फायदेशीर 

क्लारी सेज तेल हे अँटिइन्फ्लेमेटरी प्रभाव असणारे तेल आहे. यानुसार शरीरातील सूज कमी होऊन चक्कर कमी करण्यास मदत करते. कानामध्ये सूज येऊन चक्कर येत असेल तर तुम्ही याचा नक्की उपयोग करून घेऊ शकता. 

दालचिनी (Cardamom)

साहित्य 

वापरण्याची पद्धत 

कसे ठरते फायदेशीर 

डोकं दुखून चक्कर येत असेल तर तुम्ही या दालचिनीच्या चहाचा नक्की उपयोग करून घेऊ शकता. दालचिनीमध्ये पॉलिफेनॉल्स अँटिऑक्सिडंट्स असतात जे रक्तदाबावर नियंत्रण (Blood Pressure Control) मिळवून हृदयाशी संबंधित आजारापासूनही रक्षण करण्यास मदत करते. त्यामुळे चक्कर येत असेल तरीही तुम्ही याचा फायदा करून घेऊ शकता. 

आले (Ginger) 

साहित्य 

वापरण्याची पद्धत 

कसे ठरते फायदेशीर 

निरोगी शरीरासाठी आल्याचे फायदे अनेक आहेत. एनसीबीआयच्या संकेतस्थळावर दिल्याप्रमाणे आले हे चक्कर येत असेल तर उत्तम उपाय आहे. आल्यामध्ये असणारा अँटीनॉशिया गुण हा चक्कर येण्यापासून वाचवतो आणि उलटी आणि मळमळ होत असेल तर दूर ठेवण्यास मदत करतो. 

चक्कर येत असेल तर लिंबाचा रस (Lime Juice For Vartigo)

साहित्य 

वापरण्याची पद्धत 

कसे ठरते फायदेशीर 

कधी कधी उन्हातून आल्यावरही चक्कर येते. ऊन सहन होत नाही. अशावेळी लिंबाच्या रसातील विटामिन सी हे शरीरासाठी फायदेशीर ठरते. येणारी चक्कर घालविण्यासाठी तुम्ही लिंबाचा रस यावेळी घ्यावा. तुम्हाला हवे असेल तर साखरही तुम्ही यामध्ये मिक्स करू शकता. चक्कर येत असल्यास यावर हा उत्तम घरगुती उपाय आहे.

अक्युपंक्चर (Acupuncture)

अक्युपंक्चर हा देखील चक्कर येण्यावर एक उत्तम घरगुती उपाय आहे. याचा कसा उपयोग करायचा ते जाणून घेऊया. 

वर्टिगो असणाऱ्या रुग्णांसाठी योग्य आहार (Diet For Vertigo In Marathi)

Diet For Vertigo In Marathi

ज्यांना सतत चक्कर येण्याचा त्रास असतो अशा व्यक्तींना फॅट आणि कार्बोहायड्रेट्स कमी प्रमाणात घेण्याचा सल्ला देण्यात येतो. पण अशा व्यक्तींनी त्यांच्या आहारात फायबरची मात्रा वाढवावी. चक्कर येणे कमी करण्यासाठी असा आहार उत्तम ठरतो. 

योग्य व्यायाम (Exercise For Vertigo In Marathi)

चक्कर येण्यापासून तुम्हाला वाचायचे असेल तर तुम्ही नियमित काही व्यायाम करणे आवश्यक आहे. त्यासाठी कोणते व्यायाम करावेत जाणून घ्या. 

स्टँडिंग अपराईट (Standing Upright) – याला रोमबर्ग एक्सरसाईज असेही म्हणतात. यासाठी तुम्ही भिंतीला पाठ टेकवा आणि सरळ उभे राहा आणि आधारासाठी पुढे खुर्ची घ्या. तुमचे हात अगदी ताठ सरळ ठेवा. तुम्ही 30 सेकंद या अवस्थेत उभे राहा आणि असे पाच वेळा करा. 

पुढे आणि मागच्या दिशेने झुलणे (Swaying Back And Forth) – स्टँडिंग अपराईटप्रमाणे भिंतीच्या आधाराने उभे राहा. आपले पाय खांद्याच्या बरोबरीने वर घ्या आणि हात खाली ठेवा. आता आपले शरीर पुढे मागे करून तळहाताचा आधार घेत झुला. या परिस्थितीत तुमचे हिप्स व्यवस्थित सरळ रेषेत यायला हवेत. 

डाव्या बाजूकडून उजव्या बाजूला झुकणे (Toe Touching Exercise) – आता तुम्ही दोन्ही पाय फाकवा आणि डाव्या बाजूकडून पहिले उजव्या बाजूला अंगठ्याला हात लावा आणि मग तसेच दुसऱ्या बाजूनही कार. यादरम्यान तुमचा दुसरा हात सरळ रेषेत वरच्या बाजूला यायला हवा.

प्रश्नोत्तरे (FAQ’s)

1. वर्टिगोची समस्या साधारण कधीपर्यंत राहते?

चक्कर काही मिनिट्ससाठी येऊ शकते अथवा काही तासांसाठीही ही समस्या राहू शकते. पण काही मिनिट्समध्ये ही समस्या कमी होते. 

2. चक्कर सहज थांबवता येऊ शकते का?

हो तुम्ही घरगुती उपाय करूनही चक्कर थांबवू शकता. लक्षण जाणवू लागल्यावर त्वरीत इलाज करा. तसंच अत्यंत तीव्र उन्हात जाऊ नका. अचानक कोणत्याही ठिकाणी बसून उठू नका वा झोपेतून झटकन उठून बसू नका. 

3. चक्कर येत असेल तर मधाचे सेवन करता येऊ शकते का?

चक्कर येत असेल तर तुम्ही मधाचादेखील उपयोग करून घेऊ शकता. मधाचे चाटण तुम्हाला चक्कर येत असेल तर नक्कीच उपयोगी ठरते. 

Read More From आरोग्य