बॉलीवूड

Class of 83: बॉबी देओल नाही तर यामुळे चित्रपट ठरतो खास

Leenal Gawade  |  Aug 23, 2020
Class of 83: बॉबी देओल नाही तर यामुळे चित्रपट ठरतो खास

 नेटफ्लिक्सवर नुकताच रिलीज झालेला ‘Class of 83’ हा बॉबी देओलचा चित्रपट सध्या चर्चेचा विषय आहे. चित्रपट किंवा सीरीज पाहण्यासाठी तुम्ही OTT प्लॅटफॉर्मचा आधार घेत असाल तर नेटफ्लिक्सवर पहिल्या क्रमांकावर हा चित्रपट सध्या आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून बॉबी देओल पुन्हा एकदा लीड रोलमध्ये दिसला आहे. 1983-84 सालात असलेली परिस्थिती, माफिया वॉर, भ्रष्टाचारी राजकारणी अशी स्टोरीलाईन असलेला हा चित्रपट आहे. तुम्ही अजूनही हा चित्रपट पाहिला नसेल तर जाणून घ्या या चित्रपटाचा रिव्ह्यू

जेव्हा या कलाकारांना भूमिका साकारण्यासाठी करावे लागले स्वतःमध्ये अफलातून बदल

बॉबीमुळे नाही तर या कारणामुळे चित्रपट ठरतो खास

Instagram

तर हा चित्रपट सुरु होतो तो म्हणजे पोलीस ट्रेनिंगपासून. 1983 सालातील पोलीस ट्रेनिंगचा काळ दाखवण्यात आला आहे. त्यात काही विद्यार्थी हे इतरांपेक्षा थोडे वेगळे असतात. हुशार म्हणण्यापेक्षा त्यांच्या बॅचमध्ये सगळ्यात मागे. अस्लम, वर्दे, जाधव, शुक्ला हे चार मित्र एकमेकांसाठी काहीही करणारे असतात. बॅचमध्ये सगळयात मागे असल्याचा राग ते ट्रेनिंगसाठी कधीही न येणाऱ्या डीनवर काढतात. त्या डीनचा काढा काढण्यासाठी त्याच्यावर हल्ला करायचे ठरवतात. विजय सिंह (बॉबी देओल) याच्या बंगल्यात जाऊन हल्ला करतात पण तो कट विजय सिंह उलटून लावतो आणि तिथेच बॉबी देओलचा रोल सुरु होतो. पनिशनेंट पोस्टवर त्याची बदली पोलीस ट्रेनिंगसाठी झालेली असते जी त्याला मान्य नसते.  त्यामुळेच तो कधीही ट्रेनिंग किंवा त्या परीसरात दिसत नाही. या हल्ल्यानंतर तो ट्रेनिंगसाठी येतो. पण त्या विद्यार्थ्यांना काढून टाकत नाही. तर त्यांना खास ट्रेनिंग देतो. पुस्तकापलीकडे जाऊन खऱ्या आयुष्यात पोलिसांनी काय करायला हवे ते सांगतो. 

80चे दशक गँगवारचे आहे. काळसेकर नावाच्या कुख्यात गुंड्याचा काटा काढण्यासाठी विजय सिंह जातो. पण त्याचा डाव त्याआधीच उलटवून टाकला जातो.  पाटेकर ( अनुप सोनी) याच्या राजकारणामुळे आणि गुंडांना पोसण्याच्यावृत्तीमुळेच विजय सिंह या मिशनमध्ये हरतो. आपल्या विरोधात गेल्यामुळे पाटेकर विजय सिंहची बदली या पोलीस ट्रेनिंगमध्ये करतो. अर्थात विजयच्या मनात काळसेकरचा काटा काढायचा हे ठरलेले असते. त्याने ट्रेनिंग दिलेल्या या चार पोलिसांना तो तयार करतो. वेगवेगळ्या गँगशी संबधित लोकांना या नव्या पोलिसांच्या माध्यमातून संपवायला घेतो. पण असे करत असताना यातून वाचायचे कसे हे देखील त्या पोलिसांना दाखवले जाते. त्यामुळे कशाचीही तमा न बाळगता हे तरुण पोलीस अगदी बिनधास्त खून करत सुटतात आणि नेहमी चौकशीतून वाचतात. पण कधी-कधी चांगल्या कामाची केलेली सुरुवात ही वाईटाकडे झुकत जाते. अगदी तसेच हे चार पोलीस अधिकारी उन्मत्त होऊ लागतात. जाधव,वर्दे, शुक्ला हे काही गँगने केवळ पैसा दिला म्हणून त्यांच्या पाठिशी उभे राहतात. अनेक ठिकाणी निर्दोष लोकांचे खून होऊ लागतात. त्यामुळे या भ्रष्ट अधिकाऱ्यांना सरळ करण्यासाठी तो पुन्हा एकदा उभा राहतो. त्यामध्ये चांगला अधिकारी असलेला अस्लम मारला जातो. त्यामुळे त्याचा बदला घेण्यासाठी पुन्हा वर्दे आणि शुक्ला एकत्र येतात. एक सॉलिड प्लॅन बनवून ते काळसेकरचा काटा काढतात. 

बॉलीवूडमध्ये धमाकेदार पदार्पण करण्याची स्टारकिडची ‘प्रक्रिया’ सुरू

बॉबी पेक्षा ठळक दिसतात इतर कलाकार

चित्रपटात महत्वाची भूमिका ही बॉबी देओलची असली तरीसुद्धा त्याहून अधिक चांगल्या पद्धतीने जाधव, वर्दे, शुक्ला आणि अस्लम खान हे दिसतात. त्यांचा स्क्रिनटाईम हा बॉबीपेक्षाही जास्त आहे. बॉबी देओलच्या आयुष्यात असलेले या पोस्टिंगचे दु:ख आणि कौटुंबिक दु:ख हे कधीकधी नको होतं. त्यामुळेच बॉबीपेक्षा उरलेले कलाकार अधिक उठून दिसतात, असे असले तरी हा चित्रपट नक्कीच वेगळ्या अनुभवासाठी पाहण्यासारखा आहे. 

चित्रपट रेटिंग :  3.5 /5 

निर्माते : गौरी खान, शाहरुख खान 

दिग्दर्शक: अतुल सब्रवाल 

स्टारकास्ट : बॉबी देओल, अनुप सोनी, विश्वजीत प्रधान, राघव देसाई, अभिषेक भालेराव, भुपेंद्र जडावत, समीर परांजपे 

सुशांत सिंहच नाही तर या बॉलिवूड कलाकारांच्या मृत्यूचाही नाही उलगडला पेच

Read More From बॉलीवूड