निरोगी आरोग्यासाठी स्वच्छता ही फारच महत्वाची असते. त्वचेच्या बाबतीतही अगदी तसेच आहे. त्वचेची काळजी घेताना तुम्हाला त्वचेसाठी कोणत्याही वस्तू आणि कशाही वापरुन चालत नाही. त्याची स्वच्छता ही फार जास्त महत्वाची असते. अगदी रोजच्या वापरातील टॉवेल हा देखील स्वच्छ असावा लागतो. टॉवेलचा उपयोग आपण सतत तोंड पुसण्यासाठी करतो. या टॉवेलची स्वच्छता राखणे काही जणांना अगदी नकोसे होऊन जाते. परिणामी अशा लोकांनी त्वचेसंदर्भात अनेक त्रास होण्याची शक्यता असते. टॉवेल संदर्भात तुम्ही या चुका करत असाल तर तुम्हालाही त्वचेचे गंभीर त्रास होण्याची शक्यता आहे.
पिरेड्समध्ये सूजतात का तुमच्याही मांड्या, जाणून घ्या
अस्वच्छ टॉवेलमुळे होऊ शकतात हे त्रास
- कोणाचाही टॉवेल वापरणे हे त्वचेसाठी मुळीच चांगले नाही. जर तुम्ही एखाद्याचा वापरलेला टॉवेल वापरत असाल तर त्यामुळे तुम्हाला पुळ्या आणि पुटकुळ्या येऊ शकतात.
- एखाद्याच्या त्वचेवर आधीच पिंपल्स असतील आणि अशांचा टॉवेल तुम्ही वापरत असाल तर तुम्हाला याचा त्रास होण्याची शक्यता असते.
- प्रत्येकाचे शरीर वेगळे असते. काही जणांना याचा त्रास होत नाही. पण जर तुम्ही टॉवेल सतत धूत नसाल आणि तसाच वापरत असाल तरी देखील तुमच्या त्वचेला काही अॅलर्जीज होण्याची दाट शक्यता असते.
- अस्वच्छ टॉवेलमुळे त्वचेला बुरशी येण्याची ही शक्यता असते.जर तुम्हाला आधीच पिंपल्स असतील आणि असा खराब टॉवेल वापरत असाल तर ती जखम चिघळते. ती जखम भरली नाही तर त्याला बुरशी सदृश्य डाग येण्याची शक्यता असते.
- खूप जण जेवल्यानंतर तोच टॉवेल वापरुन तोंड पुसतात. तोंड व्यवस्थित पुसलेले नसेल तर तो मसाला तोंडाला लागण्याची शक्यता असते. असा मसाला त्वचेच्या दृष्टिकोनातून मुळीच चांगला नाही. त्यामुळे त्याचा वापर करु नका.
डोळ्याखालील सुरकुत्या करा घरगुती उपायांनी कमी, परिणाम होईल त्वरीत
टॉवेलची अशी घ्या काळजी
- तुम्ही त्वचेला जसे जपता तसे टॉवेलला जपणेही फारच गरजेचे असते. तुम्ही वापरत असलेला टॉवेल शक्यतो कोणासोबतही शेअर करु नका. तुमचा स्वतंत्र टॉवेल तुम्ही वापरा. त्यामुळे तुम्हाला त्रास होणार नाही.
- एखादा स्वच्छ धुतलेला टॉवेल फार तर एक दिवस वापरावा. त्यानंतर तो धुणे हे कधीही चांगले. त्यामुळे त्यामध्ये अडकलेली घाण निघून जाते. आणि पुन्हा वापरासाठी स्वच्छ टॉवेल मिळतो.
- टॉवेल हा नेहमी कोरडा करुन मग वापरा. ओला टॉवेल त्वचेला वापरु नका. त्यामुळे वापरलेला टॉवेल कडक उन्हात वाळू द्या. तो कोरडा असेल तरच वापरा.
- बाहेर गेल्यानंतर आपल्यासोबत कायम एक टॉवेल ठेवा जो तुम्ही कधीही आणि कुठेही वापरु शकाल.
- जर चेहऱ्यासाठी टॉवेल शोधत असाल तर टर्किश टॉवेलची निवड करा. कारण ते त्वचेवर फारच कोमल असतात. ज्यांच्या स्पर्श हवाहवासा वाटतो.
अशा प्रकारे त्वचेची काळजी घेण्यासाठी टॉवेलची काळजी घ्या.