एखादे काम पूर्णत्वास येण्यासाठी ‘आत्मविश्वास’ हा खूप महत्वाचा असतो. कधी कधी अशी परिस्थिती उद्भवते की, त्यामुळे स्वत: वरील आत्मविश्वास कमी होऊ लागतो. अशावेळी तुम्हाला काही प्रेरणादायी आणि तुमचा आत्मविश्वास वाढवणारे कोट्स किंवा सुविचार वाचनात आले की, त्यामुळे आत्मविश्वास वाढण्यास मदत मिळते. तुमचं मनोबल वाढवणारे आत्मविश्वास सुविचार मराठी (Confidence Quotes In Marathi) खास तुमच्यासाठी निवडून ठेवले आहेत. तुमच्या जवळच्या व्यक्तीला आत्मविश्वास कमी झाल्यासारखे वाटत असेल तर हे काही सुविचार तुम्हाला नक्कीच मदत करु शकतात. याशिवाय विश्वासावरील मराठी कोट्स हे देखील तुमच्या आयुष्याला कलाटणी देतील.
Table of Contents
Confidence Quotes In Marathi | आत्मविश्वास सुविचार मराठी
आत्मविश्वास सुविचार मराठी (Confidence Quotes In Marathi) ने वाढवा तुमच्यातील आत्मविश्वास.. विद्यार्थ्यांनी हे सुविचार नेहेमी वाचावे. कारण विद्यार्थ्यांना आत्मविश्वास वाढवणारे मराठी सुविचार वाचून एक ऊर्जा येते, आणि यश मिळवण्यास ताकद देते.
- आत्मविश्वास हा सूर्यासारखा असतो,
तुम्ही जितकी मेहनत कराल,
तितकाच तो अधिक चमकतो - विश्वास हा स्वत:वर ठेवला
तर ताकद बनते,
आणि दुसऱ्यांवर ठेवली तर कमजोरी - आवड आणि आत्मविश्वास असेल,
तर कोणतीही गोष्ट अवघड नाही - आपण जिथे आहात,
त्यापलीकडे जाण्याचा प्रयत्न करा,
प्रयत्न कधीही अयशस्वी होत नाही - तुम्ही कोण आहात आणि तुम्हाला कोण व्हायचंय
यातल अंतर कळलं तर तुम्ही काय करता ते कळतं - ज्याची सुरुवात शून्यातून होते,
त्याला हरण्याची भीती नसते - कोणीही तुमच्यासोबत नसेल,
तर घाबरुन जाऊ नका कारण
उंच उडणारे गरुड हे कमीच असतात - कष्ट इतक्या शांततेत करा
की यश हमखास धिंगाणा घालेल - स्पष्टतेशिवाय आत्मविश्वास
हा नेहमीच आपत्ती ठरतो - सर्वात मोठे यश
हे सर्वात मोठ्या अपयशानंतरच मिळते.
Self Confidence Quotes In Marathi | कुटुंबाचा आत्मविश्वास वाढवणारे मराठी सुविचार
कुटुंबावरही अशी वेळ येते ज्यावेळी आत्मविश्वास कमी होते. कुटुंबाचा आत्मविश्वास वाढवणारे मराठी सुविचार (Self Confidence Quotes In Marathi) पाठवू शकता. मराठी स्टेटस ठेवून तुम्ही तुमच्यातील विश्वास वाढवू शकता
- संकटं टाळणं हे माणसाच्या हातात नसतं
पण त्या संकटाचा सामना करणे
नक्कीच असते - अशक्य हा शब्द आपल्या
शब्दकोशातून काढून टाका - इच्छाशक्ती चांगली असेल
तर मदत तुमच्याकडे चालून येते - दु:खाची चव घेण्यापेक्षा
ते पचवण्यात अधिक गोडी आहे - तुम्ही खचून जाणाऱ्यातले नाही,
त्यामुळे आहे त्याला सामोरे जा आणि जिंका - मनात आत्मविश्वास असेल
तर तुम्ही काहीही करु शकता
मग तुम्हाला कशाचीही भीती वाटणार नाही - मी काहीतरी चांगलं करेन हा विश्वास
आणि मी काहीतरी चांगलं करेनच हा झाला आत्मविश्वास - घाबरण्यासारखा वाईट कोणताही व्हायरल नाही
आणि त्याला सामोरे जाण्यासारखे कोणतेही चांगले वॅक्सिन नाही - सूर्य मावळचो नवा दिवस घेऊन येण्यासाठी
त्यामुळे आज जरी मनासारखे झाले नाही
तरी उद्या तसे नक्कीच होईल - पैज लावायची असेल तर ती
स्वत: सोबत लावा
हरलात तर काही तरी नवे शिकाल
आणि जिंकलात तर पुढे वाटचाल कराल
Confidence Msg In Marathi | मित्रांना आत्मविश्वास देणारे संदेश
कधी कधी तुमच्या मित्रांनाही आत्मविश्वासाठी गरज असते. मित्रांना आत्मविश्वास देणारे संदेश (Confidence Msg In Marathi) खास तुमच्या खास मित्रांसाठी
- स्मितहास्य ही अशी वक्र रेशा आहे
जी तुमच्या समस्या कमी करुन
तुमचा आत्मविश्वास वाढवते - मातीतला ओलावा जसा झाडांच्या
मुळांना धरुन ठेवतो,
तसा तुमच्यातील आत्मविश्वास तुम्हाला धरुन ठेवतो - जुन्या वाटेवर अडचणी आल्याशिवाय
नवीन वाट आपल्याला सापडत नाही
ती वाट शोधणे महत्वाचे असते - नशीब हातात येत नाही
हाताला तुमच्या नशीबाकडे नेणे गरजेचे असते - तुम्ही रोज नव्याने नवीन चूक करत असाल
तर तुम्ही प्रगती करत आहात हे नक्की! - तुमच्या आजच्या कृतीने
तुमचा उद्याचा दिवस ठरत असतो,
चांगले वागाल तर चांगलेच मिळेल - आत्मविश्वास असा वाढवा
जो तुम्हाला प्रगती करण्यास मदत करेल - आत्मविश्वास ही अशी शक्ती आहे,
जी तुम्हाला पायऱ्यांवरुन शिखरावर पोहोचवते - शून्यातून विश्व निर्माण करण्यासाठी
आत्मविश्वास हवा, तो तुम्हीच निर्माण करु शकता - अपयशाने खचू नका
त्या अपयशाला मागे टाकण्यासाठी अधिक जिद्दी व्हा
Confidence Status In Marathi | वॉट्सअपसाठी आत्मविश्वास सुविचार स्टेटस
स्वत:सोबत इतरांचा आत्मविश्वास तुम्हाला वाढवायचा असेल तर वॉट्सअपसाठी आत्मविश्वास सुविचार स्टेटस (Confidence Status In Marathi) पाठवा. प्रेरणादायी कविता या देखील तुम्हाला आत्मविश्वास देतील.
- तुम्हाला आयुष्यात एकच गोष्ट
यश मिळवण्यापासून अडवू शकते
ती म्हणजे हरण्याची भीती - कोणी कौतुक करो वा टीका
दोन्ही तुमच्या फायद्याचेच
कौतुक प्रेरणा देते
आणि टीका सुधारण्याची एक संधी - यशाची उंची गाठताना
कामाची लाज बाळगू नका
आणि कष्टाला घाबरु नका - यश हे तुमच्या प्रयत्नांना चिकटलेले असते.
- जीवनात मागे बघाल तर
अनुभव मिळेल,
पुढे बघाल तर आशा मिळेल
आणि आजुबाजूला बघाल सत्य आणि अंर्तमनात
बघाल तर आत्मविश्वास मिळेल. - आपली खरी स्वप्न तीच असतात
जी आपल्याला रात्रभर जागवतात
आणि सकाळी उठल्यावर काम करण्यास भाग पाडतात - जो पर्यंत आत्मविश्वास स्वरुपी सेनापती
पुढे होत नाही तोपर्यंत
आपल्या आतील शक्ती तोपर्यंत त्याचे तोंड पाहात नाही - पुढे काय होणार माहीत नाही
पण आत्मविश्वास असा हवा की,
जे होईल ते परफेक्ट होणार - कष्ट ही अशी चावी आहे,
जी नशिबात नसलेल्या गोष्टींचे सुद्धा
दरवाजे उघडते - यशाकडे जाणारा मार्ग हा
केवळ आत्मविश्वासामुळेच उघडतो
आता तुमच्यातील आत्मविश्वास वाढवा आणि इतरांनाही तो द्या. बघा कसा फरक पडेल तुमच्या आयुष्यात.
Read More From xSEO
Sankashti Chaturthi Wishes, Quotes, Status In Marathi | संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा
Dipali Naphade
अष्टविनायक दर्शन संपूर्ण माहिती | Ashtavinayak Darshan Information In Marathi
Vaidehi Raje