मनोरंजन

लॉकडाऊनमुळे जुन्या मालिका आल्या पुन्हा ट्रेंडमध्ये

Leenal Gawade  |  Apr 6, 2020
लॉकडाऊनमुळे जुन्या मालिका आल्या पुन्हा ट्रेंडमध्ये

भारतात लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर सगळी मुंबई एका रात्रीत थांबून गेली. काही दिवस मालिकांनी शूट झालेले त्यांचे भाग प्रसारीत केले. पण त्यांचेही एपिसोड संपल्यानंतर त्यांना जुने भाग पुन्हा दाखवल्यावाचून पर्याय उरला नाही. आता जुने एपिसोड तरी किती पाहायचे ना? यावर शक्कल काढत नव्वदच्या काळातील अनेक प्रसिद्ध मालिका पुन्हा प्रसारीत करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि आता मग काय बघता बघता या मालिकाच लोकांना अधिक आवडू लागल्या आहेत. जी मुलं नव्वदच्या दरम्यान जन्माला आली होती. त्यांच्या बालपणीतल्या आठवणींमध्ये या मालिका नक्की असतील पण नव्या पिढीला या मालिका माहीत नसूनही या जुन्या मालिकांनी भूरळ घातली आहे. त्यामुळेच लॉकडाऊनमध्ये या जुन्या मालिकांना पुन्हा एकदा अच्छे दिन आले असून त्या सगळीकडे ट्रेंड होत आहेत. जाणून घेऊया या मालिका नेमक्या कोणत्या?

या एका सवयीमुळे रामाच्या भूमिकेसाठी अरुण गोविल झाले रिजेक्ट

रामायण आणि महाभारत

Instagram

भारतात रामायण आणि महाभारताला पौराणिक दृष्टया फार महत्व आहे. ज्यावेळी या दोन मालिका दूरदर्शन वाहिनीवर सुरु झाल्या ( 90 च्या दशकात). त्या दिवसापासून या मालिकेला लोकांनी डोक्यावर धरले. यातील प्रत्येक कलाकार प्रसिद्ध झाले. त्यावेळी रविवारी प्रसारीत होणाऱ्या भागासाठी लोकं घरातील सगळी कामं आटोपून टीव्हीसमोर बसायचे. आता या दोन्ही मालिका पुन्हा प्रसारीत करणार म्हटल्यावर पुन्हा एकदा घरात महाभारताचे आणि रामायणाचे संगीत कानी पडू लागले आहे.  ही मालिका जास्तीत जास्त लोकांनी पाहावी आणि कोरोनाच्या दिवसात घरी राहावे यासाठी मालिकेचे जास्तीत जास्त प्रसारण केले जात आहे. त्यामुळे आता 2020मध्येही तुम्हाला अनेक घरातून या मालिकांचे आवाज येतील. 

 वेळ: सकाळी 9 वाजता डीडी भारती (रामायण) 

      दुपारी 12 वाजता ( महाभारत)

अनुराग कश्यपच्या ‘बमफाड’ मधून अजून एका स्टारकिडची बॉलीवूडमध्ये एंट्री

देख भाई देख

Instagram

नव्वदच्या काळात अनेक विनोदी मालिकादेखील आल्या. या मालिकांनीही प्रेक्षकांना भूरळ घातली. त्यापैकीच एक मालिका म्हणजे ‘देख भाई देख’. फरीदा जलाल, शेखर सुमन, भावना भावसार, सुषमा शेठ,  नवीन निशुल यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या मालिकेचेही पुर्न: प्रसारण केले जात आहे. ही मालिका पुन्हा दाखवणार म्हटल्यावर अनेकांना आनंद झाला. कारण त्याचे शीर्षकगीत, त्यातील प्रत्येकाचे विनोद आणि एकूणच विनोदी दिवाण कुटुंब सगळ्यांच आजही लक्षात आहेत. या लॉकडाऊनच्या निमित्ताने पुन्हा एकदा त्यांना टीव्हीवर पाहण्याचा आनंद हा काहींसाठी वेगळाच आहे. त्यामुळे ही मालिकाही पुन्हा ट्रेंड होत आहे. 

वेळ: संध्याकाळी 6 वाजता, डी डी नॅशनल

शक्तिमान

Instagram

आता या सुपरहिरोविषयी काय सांगावे. आता नव्या सुपरहिरोने  लहानमुलांच्या मनात जागा केली असली. ज्यांचा जन्म 90-91 दरम्यानचा आहे त्यांच्यासाठी शक्तीमान हा त्यांचा सुपरहिरो होता. गोल गोल गिरकी घेणारा शक्तिमान आणि त्याचा अंधेरा कायम रहेगा असं म्हणणारा सम्राट किलविश यांची फाईट लहानमुलांच्या आवडीची होती. लहान मुलांची आवड लक्षात घेत त्यांना घरी टिकवून ठेवण्यासाठी या सुपरहिरोलाही पुन्हा आणण्यात आले आहे. शक्तिमानही पुन्हा एकदा सुरु झाले आहे. 

वेळ: दुपारी 1 वाजता, दूरदर्शन

 

दूरदर्शनशी निगडीत असलेले हे सगळे चॅनेल्स फ्री असून तुम्ही त्यांचा आनंद लुटू शकता. एकूणच काय जुनं ते सोनं असंच आता म्हणावं लागेल.

चेन्नई एक्सप्रेसच्या निर्मात्याची मुलगी कोरोना पॉजिटिव्ह

Read More From मनोरंजन