सौंदर्य

असं लावावं अंडर आय क्रिम, जाणून घ्या स्टेप बाय स्टेप पद्धत

Trupti Paradkar  |  May 18, 2021
असं लावावं अंडर आय क्रिम, जाणून घ्या स्टेप बाय स्टेप पद्धत

प्रत्येकीला आपण नेहमीच सुंदर दिसावं असं वाटत असतं. मात्र छोट्या छोट्या त्वचेच्या समस्या  तुमच्या सौंदर्यात बाधा आणत असतात. जसं की, डोळ्यांखाली काळी वर्तुळं झाल्यामुळे तुमचा चेहरा निस्तेज दिसू लागतो. डार्क सर्कल्समुळे तुम्ही मेकअप न करता कुठेही जाऊ शकत नाही. मेकअपने डार्क सर्कल्स झाकणं हा एक तात्पुरता उपाय असला. तरी मुळापासून ही समस्या दूर करता यायला हवी. आजकाल यासाठी बाजारात अंडर आय क्रिम विकत मिळतं. नियमित अंडर आय क्रिम वापरल्यास तुमचे डार्क सर्कल्स कमी होतात. नियमित स्किन केअर रूटिनमध्ये यासाठी अंडर आय क्रिमचा समावेश करायला हवा. मात्र त्यासाठी अंडर आय क्रिम नेमकं कसं लावावं याची स्टेप बाय स्टेप पद्धत तुम्हाला माहीत असायला हवी. 

अंडर आय क्रिम लावण्याची स्टेप बाय स्टेप पद्धत

चेहऱ्याच्या संपूर्ण त्वचेमध्ये अंडर आय जवळील त्वचा फारच नाजूक आणि संवेदनशील असते. ज्यामुळे या भागात कोरडेपणा, सुरकुत्या,  डार्क सर्कल्स, पफीनेस अशा अनेक समस्या लगेच निर्माण होतात. यासाठीच डोळ्यांखालील त्वचेची विशेष काळजी घ्यायला हवी. तु्म्ही नियमित अंडर आय क्रिम वापरून या त्वचेची  काळजी घेऊ शकता. यासाठीच जाणून घ्या अंडर  आय क्रिम वापरण्याची स्टेप बाय स्टेप पद्धत

स्टेप १ – अंडर आय क्रिम लावण्यापूर्वी चेहरा, डोळे आणि डोळ्याखालील त्वचा स्वच्छ करा. कारण क्रिम लावण्यापूर्वी त्वचेवर धुळ, माती, घाम, प्रदूषण अथवा मेकअपचं कण मुळीच असता कामा नये. कारण असं असेल तर क्रिम तुमच्या त्वचेत मुरणार नाही. शिवाय अस्वच्छतेमुळे तुमच्या त्वचेला अॅलर्जी होण्याची शक्यता वाढेल. यासाठीच अंडर आय क्रिम वापरण्यापूर्वी मेकअप रिमूव्हरने डोळ्याखालील त्वचा पुसून घ्या. 

स्टेप २ – तुमच्या हाताच्या बोटावर मटारच्या दाण्याएवढी अंडर आय क्रिम घ्या. लक्षात ठेवा अंडर आय क्रिममध्ये चांगल्या परिणामासाठी उपयुक्त घटक वापरण्यात येतात. यासाठीच प्रमाणापेक्षा जास्त क्रिम लावण्याची मुळीच गरज नाही.

स्टेप ३ – तुमच्या बोटाच्या टोकाच्या मदतीने अंडर आय क्रिम तुमच्या  डोळ्याखाली त्वचेवर  डॉट डॉट या  पद्धतीने लावून घ्या. सुरुवात नेहमी डोळ्यंच्या कोपऱ्यातून करा. आता डोळ्याच्या कोपऱ्यापासून भुवयांच्या डोकापर्यंत क्रिम तुमच्या अंडर आय भागावर लावून घ्या. 

स्टेप ४ – अंडर आय क्रिम तुमच्या त्वचेत व्यवस्थित मुरेपर्यंत बोटांनी ते डॅब करत राहा. 

स्टेप ५ – लक्षात ठेवा अंडर आय क्रिम तुमच्या डोळ्यांमध्ये जाता कामा नये. कारण जर ते डोळ्यात गेलं तर तुमच्या डोळ्यात जळजळ जाणवेल. 

स्टेप ६ – तुम्ही अंडर आय क्रिम त्वचेत मुरल्यावर कोणतेही स्किन केअर प्रॉडक्ट या त्वचेवर लावू शकता.

स्टेप ७ – दररोज सकाळी आणि रात्री झोपण्यापूर्वी तुमच्या स्किन केअर रूटिनमध्ये अंडर आय क्रिमचा समावेश करा.  

फोटोसौजन्य – 

अधिक वाचा –

उन्हाळ्यात छातीखाली येत असतील रॅश तर करा सोपे उपाय

तुम्ही वापरत असलेला हेअर ब्रश तुमच्या केसांसाठी योग्य आहे का

सुंदर केसांसाठी हे होममेड हेअरऑईल आहेत फारच फायदेशीर

Read More From सौंदर्य