लाईफस्टाईल

आई तू परत घरी येशील ना?, सीएसटी पूल दुर्घटनेनंतर महिलांमध्ये भीती

Leenal Gawade  |  Mar 15, 2019
आई तू परत घरी येशील ना?, सीएसटी पूल दुर्घटनेनंतर महिलांमध्ये भीती

‘अगदी काहीच पावलांवर  स्टेशन आहे माझी रोजची ट्रेन मिळाली तर मग घरी वेळेवर जाईन आणि लगेचच कामाला लागीन.. .काम करणाऱ्या महिलांच्या मनात हे विचार सतत घोळत असतात. विशेषत: नोकरदार महिला ज्या कामावर वेळेवर पोहचण्यासाठी पहाटे उठतात. ट्रेन, बस, मेट्रो असा प्रवास करतात. पण नोकरी सांभाळता सांभाळता ते घरही अगदी छान मॅनेज करतात. कालही या महिला त्यांची घरातील जबाबदारी पूर्ण करुन त्यांच्या ड्युटीसाठी हॉस्पिटलच्या दिशेने जात होत्या. अगदी काहीच वेळात त्या हॉस्पिटलला पोहोचणार होत्या आणि रुग्णसेवेची जबाबदारी स्विकारणार होत्या. पण तितक्यात सीएसटीच्या कल्याण दिशेने मस्जिदच्या बाजूला बाहेर पडणारा पूल कोसळला. या घटनेत ६ जणांचा मृत्यू झाला. त्यात तीन महिलांचा समावेश होता. या तिन्ही महिलांनी आपल्याला असा मृत्यू येईल, असा विचारही केला नसेल. आज आपण स्वत:हून घरी जाणार नाही तर आपले निर्जीव शरीर घरी जाईल हा विचारही त्यांच्या मनाने शिवला नसेल. खरचं अशा घटना मनाला चटका लावून जातात. घरातून बाहेर पडताना आई तू घरी परत येशील ना?,अशी म्हणण्याची वेळ सध्या आलेली आहे.

म्हणून महिलांनी वापरायला हवे ‘पँटीलायनर’

नेमकी घटना काय?

मुंबईतील सीएसटीचा परीसर … वेळ संध्याकाळी साधारण ८.३० च्या सुमारास एक मोठा आवाज आला.हा आवाज कसला यासाठी लोकांनी मागे वळून पाहिले तर सीएसटी स्टेशनकडे जाणारा अंजुमन- इस्लाम शाळेकडील फुटओव्हर ब्रीजचा काही भाग खाली कोसळला होता आणि त्यासोबत त्या ब्रीजवर असलेले पादचारी एवढ्या उंचीवरुन खाली कोसळले होते. काही वेदनेने विव्हळत होते.काही निपचित पडले होते. काहींच्या डोक्यातून रक्त येत होते. त्या क्षणी जितकी लोक आजुबाजूला होती. ती क्षणाचाही विलंब न लावता घटनास्थळी पोहोचली. साधारण ३० ते ४० जण या दुर्घटनेत अडकली होती. घटनेनंतर काही मिनिटातच २ महिलांचा मृत्यू झाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. या महिला जीटी हॉस्पिटलच्या परिचारीका अर्थात नर्स असल्याचे कळले.  अर्पूवा प्रभू (३५), रंजना तांबे (४०) अशी या महिलांची नावे आहे. तर यात जीटी हॉस्पिटलच्या आणखी एका परिचारीकेचा मृत्यू झाला. गंभीर जखमी झालेल्या भक्ती शिंदे (४०) यांचाही मृत्यू झाला. या तिघीही त्यांच्या नाईट ड्युटीसाठी आल्या होत्य. सीएटीवरुन उतरुन जीटी हॉस्पिटलला जात होत्या. एकूण या दुर्घटनेत ६ जणांचा मृत्यू झाला तर ३४ जण जखमी झाले.

 ‘सुबह का भुला शाम को घर लोटे’

सुबह का भुला शाम को लोट आए तो उसे भुला नही कहते?  या हिंदी म्हणीतही घरी परतण्याची आशा आहे. पण खऱ्या आयुष्यात संध्याकाळी मी कुठे असेन? मी घरी नीट जाईन ना? असे प्रश्न पडू लागतात. मुंबईचेच उदाहरण घ्यायचे झाले तर गेल्या काही वर्षांपासून अशा काही घटना घडत आहेत की, मनात भीती आल्यावाचून राहणार नाही. बॉम्बस्फोट, चेंगराचेंगरी, ब्रीज कोसळण्याच्या घटना या सतत घडत आहेत. या घटना घडल्यानंतर होणाऱ्या चर्चा आता नकोशा वाटू लागल्या आहेत. कालांतराने ही सीएसटी पादचारी पुलाची ही घटना विसरली जाईल. पण या सगळ्या घटनांमध्ये मृत पावलेल्यांच्या कुटुंबाचे काय? कोणाची आई, कोणाची बहीण तर कोणाची बायको या घटनेमध्ये मृत पावली त्यांच्या कुटुंबाचा आपण कधी विचार करतो का? कधीच नाही.

पुरुषांपेक्षा महिलांना झोप गरजेची

आयुष्य आनंदाने जगा

महिला किंवा पुरुष या दोघांनाही आम्ही इतकेच सांगू इच्छितो की, आयुष्य हे एकदाच मिळते. आयुष्य आनंदाने जगा. प्रत्येक क्षण आनंदात घालवा. हेव्यादाव्यांमध्ये वेळ घालवण्यापेक्षा आयुष्य जगा. कारण अशा घटना झाल्यानंतर आपल्याला आयुष्याचे आणि आपल्या जवळच्या व्यक्तीचे महत्व कळते. इतर गोष्टीत वेळ घालवण्यापेक्षा माणसांना माणसांसारखे वागवा आणि जगा. 

तुम्हालाही मायग्रेन त्रास आहे का? मग करा हे उपाय

(फोटो सौजन्य- Instagram)

Read More From लाईफस्टाईल