त्वचेची काळजी

टॅटू काढणं पडू शकतं महागात, जाणून घ्या हे धोके

Trupti Paradkar  |  Oct 6, 2020
टॅटू काढणं पडू शकतं महागात, जाणून घ्या हे धोके

स्टायलिश दिसण्यासाठी अथवा जवळच्या मित्रमैत्रिणींनी काढला म्हणून तुम्हीदेखील अंगावर टॅटू काढून घेणार असाल तर ही माहिती तुमच्या नक्कीच फायद्याची आहे. कारण टॅटूमुळे तुम्ही स्टायलिश नक्कीच दिसाल पण त्याचा तुमच्या शरीरावर एक भयंकर दुष्परिणाम होणार आहेत हे तुम्हाला माहीत असायला हवं.ल क्षात ठेवा परमनंट टॅटू काढणं तुमच्या ह्रदयासाठी महागात पडू शकतं. कारण याबाबत करण्यात आलेल्या एका नव्या संशोधनात असं आढळून आलं आहे की, टॅटू काढलेल्या लोकांना ह्रदय समस्या होण्याचा धोका जास्त असतो. याचं कारण असं क टॅटू काढलेल्या त्वचेखालील ग्रंथींचे नुकसान झाल्यामुळे अशा त्वचेवर घाम येत नाही. ज्यामुळे तुमच्या शरीराचे तापमान नियंत्रित राहत नाही आणि ह्रदयाचे नुकसान होऊ शकते. कारण शरीराचे कार्य सुरळीत सुरू राहण्यासाठी तुमच्या शरीराचे तापमान नियंत्रित राहणे फार गरजेचं आहे. जर्नल ऑफ अप्लाइड फिजिओलॉजीमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या संशोधनानुसार टॅटू काढलेल्या त्वचेवर घाम येण्याची क्षमता कमी होते.

Instagram

टॅटू काढलेल्या त्वचेवर का येत नाही घाम

घाम येणं ही शरीराची एक नैसर्गिक व्यवस्था आहे. कारण घामामुळे तुमच्या शरीराचे तापमान नियंत्रित राहण्यास मदत होते. शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्यासाठीच आपल्या शरीरावर रोमछिद्रे असतात. ज्यातून सतत घाम पाझरत असतो आणि घामामुळे तुमचे शरीर थंड होते आणि शरीराचे तापमान नियंत्रित राहते. टॅटू काढल्यामुळे त्वचेखाली घाम निर्माण करणाऱ्या ग्रंथींचे नुकसान होते. कारण टॅटू काढताना तुमच्या त्वचेवर एका मिनीटामध्ये जवळजवळ तीन हजारांपेक्षा जास्तवेळा सुई टोचली जाते. त्वचेवर असे वेदन झाल्यामुळे त्वचेखालील ग्रंथीचे नुकसान होते आणि त्यांचे कार्य मंदावते. याचाच परिणाम असा होतो की अशा त्वचेवर घाम कमी प्रमाणात येतो. घामाचे प्रमाण कमी झाल्यामुळे तुमच्या शरीराचे तापमान वाढत जाते. काही संशोधनात असंही आढळलं आहे की टॅटू काढलेल्या त्वचेवर येणाऱ्या घामात सोडिअमचे प्रमाण जास्त असते. याचा अर्थ अशा त्वचेखाली घाम निर्माण करणाऱ्या ग्रंथीचे कार्य व्यवस्थित सुरू नाही असा होतो. 

Instagram

टॅटूमुळे ह्रदय विकार होण्याची शक्यता वाढते

टॅटू काढल्यामुळे तुमच्या त्वचेवर खूप कमी घाम येतो. ज्याचा परिणाम तुमच्या शरीराच्या तापमानावर आणि पर्यायाने ह्रदयावर होतो. टॅटू काढलेल्या लोकांना हार्ट अटॅक येण्याची शक्यता जास्त असते. कारण हार्ट अटॅक तेव्हा येतो जेव्हा तुमच्या शरीराचे तापमान जास्त प्रमाणात वाढते. हार्ट अॅटकमुळे जीवाला धोका असल्यामुळे लवकर उपचार मिळणं गरजेचं असतं. शिवाय जरी अशा परिस्थितीतून रूग्ण वाचला तरी आयुष्यभर त्याचे ह्रदय कमजोरच राहते. म्हणूनच परमनंट अथवा संपूर्ण शरीरावर टॅटू काढून घेणं तुमच्या ह्रदयाच्या आरोग्यासाठी हितकारक नाही. त्यामुळे स्टायलिश दिसण्यासाठी टॅटू काढा पण त्यामुळे तुमच्या शरीर आणि आरोग्यावर काही परिणाम होणार नाही याची अवश्य काळजी घ्या. कारण फक्त फॅशन म्हणून एखादी गोष्ट करण्यापूर्वी त्यामुळे जर तुमच्या आरोग्याचं नुकसान होणार असेल तर याबाबत वेळीच सावध राहणं गरजेचं आहे. 

फोटोसौजन्य – इंस्टाग्राम

अधिक वाचा –

मेकअपने असा कव्हर करा तुमचा टॅटू, नाही दिसणार नामोनिशाण

Tattoos: टॅटू काढताय… मग त्याआधी ही माहिती अवश्य वाचा (Cover Up Tattoo Design In Marathi)

आकर्षक ओठ करणारी ‘लिप ब्लशिंग’ ट्रिटमेंट नक्की काय आहे

Read More From त्वचेची काळजी