हल्ली चित्रपट आणि मालिकांमध्ये एक वेगळा ट्रेंड दिसू लागला आहे तो म्हणजे स्वत:पेक्षा फारच लहान असलेल्या मुलींना डेट करण्याचा किंवा त्यांच्याशी लग्न करण्याचा. आता थोडं डोकं खाजवा तुम्हाला आताच्या आता काही मालिका आणि चित्रपट आठवतील ज्यामध्ये अशा प्रकारच्या जोड्या दाखवण्यात आला आहे. असे करणे कितीही चुकीचे वाटत असले तरी प्रेक्षकांनी मात्र अशाप्रकारच्या प्रेमाला पसंती दिली आहे असे म्हणायला हवे.
‘मेकअप’मध्ये दिसणार रिंकुचा नवा अवतार
‘दे दे प्यार दे’जोरात
वयस्क पुरुष आणि त्याच्या मुली इतक्या वयाची मुलगी अशी लव्हस्टोरी असलेला अजय देवगण आणि रकुल प्रीतचा ‘दे दे प्यार’ हा चित्रपट सध्या सुस्साट सुरु आहे. खरंतरं ट्रेलर आल्यानंतर हा चित्रपट फार चालेल अशी काहीच आशा नव्हती. कारण अशा लव्हस्टोरीला कोणीच पसंती देणार नाही असे वाटले होते. पण झाले याच्या नेमके विरुद्ध कारण या लव्हस्टोरीला लोकांनी पसंती दिली आहे असे चित्रपटाने केलेल्या कमाईवरुन वाटत आहे.
शुक्रवारी हा चित्रपट रिलीज झाला आणि हा हा म्हणता तो लोकांनी पाहिला. चार दिवसात कोणतीही अपेक्षा नसताना या चित्रपटाने 50 कोटींचा गल्ला जमवला आहे आणि अजूनही या चित्रपटाची घोडदौड सुरु आहे. अजय देवगण, रकुल प्रीत आणि तब्बू या चित्रपटात प्रमुख भूमिकेत आहेत. अजय देवगण हा आपल्या मुलीच्या वयाच्या रकुल प्रीतच्या प्रेमात पडतो. तिला घेऊन तो ज्यावेळी घरी येतो. त्यावेळी त्याच्या घरी घडणारी कॉमेडी यामध्ये दाखवण्यात आली आहे.
रिंकू-आकाश जोडी दिसणार पुन्हा एकत्र
विक्रांत सरंजामे आणि ईशा (तुला पाहते रे) मालिकेतही अशीच लव्हस्टोरी
सध्या मराठी घराघरांमध्ये पाहिली जाणारी मालिका म्हणजे तुला पाहते रे… विक्रांत सरंजामे हा 50चा तर ईशा ही अगदीच कॉलेजची मुलगी. या दोघांचे प्रेम आणि त्यांचे लग्न आधी आधी अनेकांना चांगले वाटले. पण एक चुकीचा मेसेज यामधून जातो असे देखील अनेकांना वाटले होते. पण आता या मालिकेने वेगळेच वळण घेतले आहे. विक्रांत सरंजामे (सुबोध भावे) या मालिकेत ग्रे शेड मध्ये असून त्याने त्याच्या बायकोचा म्हणजे राजनंदिनीचा केलेला खून याचा उलगडा हे या मालिकेचे उद्दिष्टय असल्याचे समोर आले आहे. पण एकूणच काय या मालिकेत एक लव्हस्टोरी आहे ज्यातील पुरुष हा वयाने फारच मोठा आहे.
कार्तिक आणि साराची का झाली ताटातूट?
माझ्या नवऱ्याची बायको
मराठीमधील आणखी एक मालिका ज्यात असेच काही कॉम्बिनेशन दाखवण्यात आले आहे.आता यात थोडा ट्विस्ट इतकाच आहे. विवाहित पुरुषासोबत तरुणी दाखवण्यात आली आहे. या अशा आशयाच्या मालिकांनाही हल्ली उत्तम प्रतीचा टीआरपी मिळताना दिसत आहे.
मराठी वगळता या आधी देखील हिंदीमधील अनेक मालिकांमधून अशा प्रकारच्या लव्हस्टोरी दाखवण्यात आल्या आहेत. उदाहरणादाखल द्यायच्या झाल्या तर ‘कसौटी जिंदगी की’, कसम से या काही त्या मालिका आहेत. समाज नियमाच्या विरुद्ध जाणाऱ्या या मालिका अनेकांच्या रोषाला कारणीभूत ठरतात. पण टीआरपीच्या स्पर्धेत त्या नेहमीच पुढे असतात असे पाहायला मिळाले आहे. त्यामुळेच हा लव्हस्टोरीतील हा बदलता ट्रेंड प्रेक्षकपसंतीचा आहे असे म्हणावे लागेल.
(फोटो सौजन्य- Instagram)
Read More From बॉलीवूड
फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांच्यावरील बायोपिक ‘सॅम बहादूर’च्या चित्रीकरणास सुरुवात
Vaidehi Raje