मनोरंजन

छपाकच्या सेटवर दीपिकाच्या भावनांचा का फुटला बांध

Trupti Paradkar  |  May 30, 2019
छपाकच्या सेटवर दीपिकाच्या भावनांचा का फुटला बांध

कान्समधून परत आल्यावर दीपिकाने छपाकच्या शूटिंगला सुरूवात केली आहे. दीपिकाने छपाकचं पहिल्या शेड्यूलचं शूटिंग पूर्ण केलं आहे. मात्र शूटिंगच्या पहिल्याच दिवशी दीपिका भावनिक झाल्याचं समोर आलं आहे. या शूटिंग दरम्यान दीपिकाला ढसा ढसा रडू कोसळलं. दीपिका भावूक झाल्यामुळे दिग्दर्शिका मेघना गुलजारने काही काळासाठी चित्रपटाचं शूटिंग थांबवलं होतं. दीपिका शूटिंगच्या सेटवर आल्या आल्या भावनिक झाली होती. मात्र तिच्यासाठी शूटिंग थांबवलं गेल्यामुळे दीपिकाने स्वतःला सावरलं. दीपिका नॉर्मल झाल्यावर पुन्हा शूटिंगला सुरूवात झाली.

छपाकमध्ये दीपिकाची आव्हानात्मक भूमिका

दीपिका पादुकोण लवकरच मेघना गुलजार यांच्या छपाक चित्रपटात दिसणार आहे. छपाक चित्रपट लक्ष्मी अग्रवालच्या जीवनावर आधारित आहे. लक्ष्मी अग्रवाल अॅसिड अटॅक पिडीत आहे. छपाकमध्ये दीपिका लक्ष्मीची भूमिका साकारत आहे. या चित्रपटात दीपिकाच्या सोबत विक्रांत मेसी झळकणार आहे. काही दिवसांपासून दीपिकाच्या छपाकमधील भूमिकाची चर्चा चालू आहे. छपाक हा चित्रपट एक इमोशनल चित्रपट आहे. त्यामुळे जर दीपिका शूटिंग करताना इतकी भावूक होत असेल तर हा चित्रपट पाहताना प्रेक्षकांना नक्कीच रडू कोसळेल. छपाक चित्रपट 10 जानेवारी 2020 ला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून पहिल्यांदाच दीपिका निर्मिती क्षेत्रातदेखील उतरत आहे. त्यामुळे हा चित्रपट दीपिकासाठी फारच खास असणार आहे.

दीपिकाजवळ आहेत इतके ब्रॅंड

दीपिका पदूकोन देशातील नंबर वन सेलिब्रेटी बॅंड देखील आहे. सेलिब्रेटी ब्रॅंडची वॅल्यूवर नजर असलेल्या डफ अॅंड फेल्पसच्या आकडेवारीनुसार दीपिकाची ब्रॅंड वॅल्यू 10 करोड डॉलर म्हणजेच 700 करोड आहे. मागील वर्षी  सर्वात जास्त कमाई करणाऱ्या सेलिब्रेटीजमध्येदेखील दीपिका पहिल्या क्रमांकावर होती. फोर्ब्सच्या यादीनुसार दीपिकाने मागच्या वर्षी 113 करोडची कमाई केली होती. आता सेलिब्रेटी ब्रॅंड वॅल्यूच्या तुलनेत तिने क्रिकेटपटू एम. एस धोनी, अभिनेता अमिर खान आणि पती रणवीर सिंग यांना सुद्धा दीपिकाने मागे टाकलं आहे. दीपिका पदुकोनने मागील वर्षी जवळजवळ 21 निरनिराळ्या उत्पादनांसाठी ब्रॅंड अॅंम्बेसेडरचं काम केलं होतं. त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणावर आणि इतक्या ब्रॅंडसाठी काम करणारी जगभरात दीपिका एकमेव सेलिब्रेटी ठरली आहे.


दीपिकाचा फोकस बिझनेस गुंतवणूकीकडे

दीपिकाच्या वाढत्या ब्रॅंड वॅल्यूप्रमाणेच तिने स्टार्ट अपमध्ये गुंतवणूक करण्यास सुरूवात केली झाली आहे. फर्निचर आणि ब्युटी प्रॉडक्ट्स सोबतच ती आता योगर्टच्या बिझनेसम्ध्येदेखील गुंतवणूक करत आहे. व्यावसायिक सूत्रांनूसार दीपिकाच्या ज्या स्टार्ट अप बिझनेसमध्ये गुंतवणूक करते त्या बिझनेसची गुंतवणूक दीर्घ काळासाठी केलेली असते.  

ऐकलंत का, बॉलीवूडच्या या नवीन हॉट जोडीबद्दल

BigBoss:season 13 असणार खास, हे सेलिब्रिटी असणार स्पर्धक

अर्जुन कपूरचं ट्रोलरला सणसणीत उत्तर, मलायकाबरोबरच्या नात्यावर केलं भाष्य

फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम

 

 

Read More From मनोरंजन