बॉलीवूड

ड्रग्ज प्रकरणात दीपिका पदुकोण निशाण्यावर, वायरल झाले चॅट

Leenal Gawade  |  Sep 21, 2020
ड्रग्ज प्रकरणात दीपिका पदुकोण निशाण्यावर, वायरल झाले चॅट

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा छडा लावताना पोलिसांना मिळालेल्या ड्रग्ज कनेक्शनमुळे NCB कडून अनेक कलाकारांची चौकशी करण्यात येणार आहे. यामध्ये आणखी एक नाव जोडले गेले आहे ते म्हणजे बॉलिवूडची शांति दीपिका पदुकोणचे. रिया चक्रवर्तीला NCB ने ताब्यात घेतल्यानंतर तिने चौकशीदरम्यान तिने अनेक बड्या सेलिब्रिटींची नावांचा खुलासा केला. सारा अली खान, रकुलप्रीत, सिमोन खंबाटा ही काही नाव पुढे आल्यानंतर अनेकांना धक्का बसला होता. पण आता अधिक खोलवर चौकशी केल्यानंतर दीपिका पदुकोणचेही ड्रग्जशी असलेले संबंध दाखवणारे काही चॅट वायरल होत आहेत. त्यामुळेच दीपिकाला NCB कडून समन्स बजावण्यात आला आहे.नेमकं हे संपूर्ण प्रकरण काय ते आता जाणून घेऊया. 

दीपिकाचे चॅट वायरल

बॉलिवूडशी असलेले ड्रग्ज कनेकक्शन रिया चक्रर्तीमुळे समोर आल्यानंतर तिने अनेक सेलिब्रिटींच्या नावाचा उल्लेख यामध्ये केला आहे. अनेक बड्या हस्तींच्या नावाचा उल्लेख यामध्ये असल्यामुळे सेलिब्रिटींच्या सगळ्या हालचालीवर NCB लक्ष ठेवून आहे. आता यामध्ये दीपिका पदुकोण हिचे नाव देखील जोडले गेले आहे. दीपिकाच्या नावाचा यामध्ये नाव येण्यासाठी तिचे चॅट कारणीभूत आहे. तिने टॅलेंट मॅनेजर करिश्मा शहा हिच्याशी चॅट केले आहे. करिश्मा ही जया शहा (सुशांत राजपूतच्या मॅनेजरशी संबधित)असोशिएट आहे. या चॅटमध्ये दीपिका करिश्माकडे ड्रग्जची मागणी करत आहे. समोरील व्यक्ती तिला.ड्रग्ज वांद्रयात आहे असे सांगत आहे. दीपिका जे चॅट करत आहे त्यामध्ये गांजा आणि हशचा उल्लेख केला जात आहे. त्यामुळेच दीपिका वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. दीपिकाला आता NCB कडून चौकशीसाठी बोलावण्यात येणार असल्याचे कळत आहे. दरम्यान सुशांतची मॅनेजर श्रुति मोदी आणि करिश्मा यांची देखील पुन्हा चौकशी होणार असे कळत आहे.

डोळे अधिक सुंदर दिसण्यासाठी यामी गौतमचा फंडा

दीपिका आहे गोव्यात

Instagram

काहीच दिवसांपूर्वी दीपिका शूटिंगसाठी गोव्याला रवाना झाली आहे. करण जोहरच्या एका चित्रपटासाठी ती गोव्याला गेली असून गोव्यामध्ये करण जोहर त्याचे संपूर्ण कुटुंब आणि इतर कलाकारही आहेत. आता NCB कडून समन्स बजावल्यानंतर दीपिका मुंबईत कधी येते याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. शिवाय या सगळ्या प्रकरणामध्ये ती खरंच दोषी आहे का? की तिचे नाव गोवण्यात आले आहे या सगळ्या गोष्टींवरुन चौकशीनंतरच पडदा उठणार उठेल.

हिना खानने शेअर केला बिग बॉस 14 च्या सेटवरचा हा व्हिडिओ

दीपिकाही ड्रग्जच्या आधीन?

करण जोहर यांच्या घरी झालेल्या एक पार्टीचा एक व्हिडिओ आजही सोशल मीडियावर चांगलाच गाजत आहे. यामध्ये असलेले सेलिब्रिटींचे चेहरे दिसत आहे.करण जोहरच्या या पार्टीमध्ये सगळे कलाकार हे मद्यधुंद अवस्थेत दिसत आहे. काहींनी या पार्टीमध्ये ड्रग्जचे सेवन करण्याचाही दावा केला आहे. त्यामुळे करण जोहरच्या त्या पार्टीची चौकशीही होणार असल्याचे कळत आहे. दीपिका पदुकोणच्या नावासोबत श्रद्धा कपूर आणि सारा अली खान यांचे नावही पुढे आले आहे. त्यामुळे आता या कलाकारांची चौकशी NCB कडून केली जाईल अशी शक्यता वर्तवली जात आहे. 

दीपिका पदुकोण सारख्या स्टार अभिनेत्रीनंतर आता कोणाचे नाव यामध्ये पुढे येईल? दीपिकाचे काय होईल? या सगळ्याच गोष्टी आपल्याला चौकशीअंती समजतील.

सारा अली खानचे नाव का येत आहे ड्रग्ज प्रकरणात, काय म्हणाली रिया

Read More From बॉलीवूड